फसवणूक

Submitted by बागेश्री on 31 October, 2012 - 06:09

तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही...
मग त्याला हवं तसं घडवण्यात वर्षे लोटतात...

आता तुम्ही प्रिय असता,
कारण तुम्ही जगासारखे असता...

मग कधी निवांत क्षणांत, तुमचं खरं रूप हळूच बाहेर येतं, शेजारी येऊन बसतं...
ते लाडकं असतं- फक्त तुम्हाला!
त्याची आर्त नजर तुम्हाला छेदून जाते..

थोडीशी खूडबूड झाली, की
त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार...

पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार पटला. आणि शाम यांनी सुचविल्याप्रमाणे काहीवेळा आपण स्वतःसाठी बदलतो हे ही काहीवेळा खरंय. आजुबाजूला शांतता राहण्यासाठी आपला स्वभाव बोलका असला तरी आपणही गप्प असावे लागते तसंच काहीसं.

स्वतःच स्वतःशी करीत असलेली प्रतारणा "त्या" स्वतःला ध्यानात येते तेव्हा... त्याची नजर आर्तंच होते.

बागेश्री, खूप आवडलं.
आहे ते नक्की पोचतय... अगदी टोचण्याइतकं, पोचतय.
पण मग अजुन फुलवरा चालला असता का.. पेक्षा इतक्या तरल कल्पनेला झेपला असता का?
माहीत नाही. ललित आवडलंच.

अवांतर प्रतिक्रिया काहीतरी चवीष्ट चघळायला मिळेल या हेतूने वाचण्यात वेळ वाया घालवला.. तिथे निराशा झाली, फारसे काही चुरचुरीत आणि खमंग हाती लागले नाही.. Sad

पण मूळ लेखात/कवितेत मांडलेला आशय फार आवडला.. छान लिहिले आहेस बागेश्री.. Happy

सामोपचार,

इतका वेळ भाग घेतला नव्हता पण आता अति करताहात म्हणून सांगतो

"तुम्ही चालवलेली माझ्या नावाची बोंब त्वरीत थांबवा, अन्यथा आपला संपर्क क्रमांक द्या, काय ते समक्ष फोनवर होऊन जाऊद्या"

@मनिमाऊ 31 October, 2012 - 18:09

जगासाठी स्वतःलाच बदलून स्वतःचीच फसवणूक का करायची??? >>> विनिता, आपण फक्त आपल्यासाठी जगत नाही ना म्हणुन. >>>> आपण आपल्यासाठी नाहीच जगत, म्हणूनच ज्यांच्याबरोबर जगतो त्यांनी आपण आहोत तसे स्विकारावे, तरच ते सहजीवन! नाही का मनिमाऊ Happy खोटे मुखवटे पांघरले की ते काही काळाने फाटतातच

बागेश्री, लेख विचार करायला लावणारा आहेच हो Happy

पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही...>> असा विचार करतो म्हटले तर स्वतःतील तोतयेगीरी कधी जायचीच नाही.

आपण आपल्यासाठी नाहीच जगत, म्हणूनच ज्यांच्याबरोबर जगतो त्यांनी आपण आहोत तसे स्विकारावे, तरच ते सहजीवन! >>> विनीता म्हणजे त्याने/तिने कॉम्प्रमाइज करायचे ना? मी बदलले तर माझ्या 'मी'ची फसवणुक. तसंच माझं 'मी'पण जगु देण्यासाठी त्याने/तिने बदलायचं तर मग त्याची/तिची स्वतःच्या 'मी'शी/ स्वतःच्या विचारांशी फसवणुक झाली. तु फसवणुक शब्दशः घेवु नकोस गं. Happy

स्वतःच्या विचारां / 'स्व' शी प्रतारणा करुन दुसर्‍याच्या मनासारखं ( अगदी मर्जीविरुद्ध नाही, कधी कधी आनंदाने, प्रेमामुळे सुद्धा) वागता वागता आपण बदलुन जातोच की. ती प्रतिमा माझ्या खर्‍याखुर्‍या 'मी' शी मिळतीजुळती नसते. अगदी मनाने स्वतःहुन नविन भुमिका/प्रतिमा अ‍ॅक्सेप्ट केली तरी त्या खर्‍याखुर्‍या स्वची आठवण कधी तरी येतेच की. तेच तर म्हणायचं आहे बाग्जला ( बहुतेक Wink ).

यू सेड इट मनू....
मग असे बदलता बदलता मूळ स्वरूप खूप खूप पाठीमागे राहून जातं! योग्य अयोग्यच्या चौकटीही अपरिहार्य..
बदलणं हाच स्थायीभाव होतो, कधी आपल्या प्रियजनांसाठी तर कधी आपल्याचसाठी... पण ते बदललेलं स्वरूप जर 'गरज/ किंवा पर्याय नाही' म्हणून स्वीकारलेलं असलं तरी तोतया म्हणवून घेण्यास त्रास पडतोच

बघा बागेश्री, धागा हायजॅक नाही केला तर अशी सकारात्मक पोस्ट मॉर्टेम्स व्हायला लागतात जी वाचून मूळ लेखनाची मजा जाते Wink Light 1

बेफी विषय काढलात म्हणून मत सांगते
अशा चर्चा खरेच परवडतात, स्वतःशी पुन्हा वेगळ्या अँगलने संवाद घडतो. उगाच धुरळा उडवल्यापेक्षा Happy

माझ्याइतकं कोण अनुभवलेलं असणार हे Wink
(गुंता हे माझं स्फुट होतं त्यात हा उल्लेख आलेला.) खूप छान अवस्था असते, कधी कधी मात्र ही फसवणूक गंभीर होत जाते. आवडेशकुमार

लेखन अप्रतीमच
चर्चा वाचली मनोरंजक आहे

तरीही काही सांगावेसे वाटते .........

मुख्य मुद्दा : हे ललित आहे ... काव्य नाही!! याची मांडणी फक्त कविता लिहावी तशी परिच्छेद न लिहिता एका खाली एक ओळ अशी आहे इतकेच !
काही लोक तर एका ओळीत एकच शब्द लिहितात तोही त्याच्यासाठी अख्खी ओळ खर्च करायची आवश्यकता नसताना

जाता जाता : बागेश्री नेहमी मुक्तछंद किंबहुना स्फुट लिहिते ती जे लिहिते ते नेहमीच अप्रतीम आणि अंतर्मुख करणारं असतं पण या आधी मी तिचे बरेच लेखन कविता ह्या विभागात वाचल्याचे स्मरते आहे.
मुक्तछंद /स्फुट ह्यास किंवा ते ज्याना लिहावं वाटतं त्याना अजिबातच विरोध नाही आहे पण मला तरी आजकाल त्यास काव्य म्हणण्याचा / मानण्याचा जो प्रमाणबाह्य अतिरेक झालाय तो अजिबात आवडत नाही इतकेच सान्गावे वाटते

असो ...जाउद्या !!
-वैवकु

टीप : माझ्यापुरते,.माझे अत्यंत वैयक्तिक व ठाम मत !!
कोणाचाही /कशाचाही विरोध दर्शवत नाहीये मी ..........गैरसमज नसावा

Happy

मुख्य मुद्दा : हे ललित आहे ... काव्य नाही!! याची मांडणी फक्त कविता लिहावी तशी परिच्छेद न लिहिता एका खाली एक ओळ अशी आहे इतकेच !<<<

वैवकु,

हे ललित म्हणूनच प्रकाशित केलंय की मग?

सॉरी बेफीजी
जरा उशीराह्का होईना लक्षात आले होते त्यामुळे मी या आधीचा प्रतिसाद एडीटच करत होतो की तितक्यात तुम्हाला तुमचा प्रतिसाद देण्याची तसदी घ्यावी लागली ....क्षमस्व!!.

काय चिरफाड करता राव!>>>>>>>>>

चिरफाड काय म्हणताय ???... हा अस्वादाचा सर्वात स्टॅन्डर्ड प्रकार आहे तुम्हाला जमत नसेल तर द्या सोडून !!!
:रागः
( Wink :D..)

कुणीतरी हलकेच शाल खांद्यावर घालावी आणि मग उमजावं की आपण कुडकुडत होतो तसं छान पकडलंय या भावनेला थोड्याच ओळींमध्ये. आवडलं.

कुणीतरी हलकेच शाल खांद्यावर घालावी आणि मग उमजावं की आपण कुडकुडत होतो
>>>>>>>>>>

क्या बात है मुंगेरीलाल.. Happy

कधीतरी हलकेच पडावी अंगावर पाल आणि जाणवावे आपण उगाच झुरळाला घाबरत होतो.... Happy

मुंगेरीलाल,
फार आवडली मला तुमची ही कमेंट..
लिखाणातील सहजता जाणून घेतलीत, त्या बद्दल आभार Happy

वैभवा
आधीच ललित विभागात पोस्ट केले रे....
तुझे वैयक्तिक मत मात्र मनोमन पट्लेय..

सुपर्ब! मला खूप आवडलं. बागेश्री तुमचं लिखाण नेहमी आवड्तं.
फु.स. - काही प्रतिसादांना उत्तरं दिली नाहीत तर वाचकांचा लिखाणावरचा फोकस बदलणार नाही. इतर कुणी वादावादी करत असेल तर अ‍ॅडमिन आहेतच.

त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार...>>>
इतपर्यंतची वाक्यच इतकी जबरदस्त आहेत, शेवटच नसतं तरी चाललं असतं

सुंदर रचना

Pages