वेगळीच कार्यशाळा

Submitted by कौतुक शिरोडकर on 3 October, 2008 - 04:49

माझ्या एका मायबोलीकर मित्राने माझ्या कथेच्या मालकी हक्कावरून शंका व्यक्त केल्याने ही कल्पना सुचली.
आजच्या वर्तमानपत्रात कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातून तीन कैदी पळाल्याची बातमी आहे. या एकोळीवर रहस्य कथा लिहीता येईल का??? यावर आपला प्रतिसाद हवा आहे.
जर आपला होकार असेल तर मग प्रयत्न करायचा का ?????????

गुलमोहर: 

तीन कैदी पळणे.... नॉट अनकॉमन.... बरेच चित्रपट आहेत...

तेच तर आव्हान आहे .... जागो .. अनकॉमन ..कुणीहि लिहेल..... बरेच चित्रपट आहेत... तशा बर्‍याच आयडीया पण करु शकतो ... काय सागांव वेगळ्च्ं सुचलंच तर ... कौतुक ... कल्पना छान आहे ... प्रयत्न करतो... नविन चु़का तर कळतील
काय ...

देवनिनाद

जर आपला होकार असेल तर मग प्रयत्न करायचा का ???>>>
नुसते विचारू नका, लिहायला लागा...

लिव रे लिव,
कौतुक चे कौतुक करयल अम्हि आहोतच

मित्रांनो, प्रश्न हा आहे की कोण कोण लिहीणार या एकोळीवर ???? ज्याचा होकार त्याने द्यावा देकार.

जग हे कार्यशाळा
जग हे कार्यशाळा
कुणी न येथे निवांत जो तो बी बी उघडूनी बसला..

कुणी चालवे गीत शाळा
खुशाल काव्यरन्गी लोळा..
इकडून तिकडून चहूकडूनही होती गजला गोळा....

गजला शेरनी बी बी भरला
स्मरे एकोळी पहा कुणाला
एकोळीची कथा फुगवण्या पंप जोडूनी बसला...

कथा असो वा काव्य असू दे
स्पर्धे मधुनी मजा मिळू दे
शिरवळकर व्हा या बोलीचे, कुठे निघुनिया गेला.. ?

( कथा लेखक कुठे पळालेत सगळे.?)

जामोप्या, तुझी ही कविता पण मस्त आहे की Happy

जामोप्या, कविता नव्हे रे, कथा हवीय. अजून त्यासाठी प्रतिसाद नाही. कोणी आहे का एकोळीवर लिहीणारा .................???????