बारसे

Submitted by Yogesh_Dukale on 29 October, 2012 - 11:05

बारसे

पाहून तूला सोडतो मी उसासे ,
दे लक्ष्य माझ्याकडे जरासे

डोळ्यात तुझिया लक्ष्य लक्ष्य चांदणे,
जणू धावती माळ्यावरती हरणे

केस आहेत काळे नि कुरळे ,
किती लावशील त्यांचे सापळे

ओठ जणू नाजूक कमळे
पाहून त्यांना धीर माझा गळे

तुझ्याविना जगणे आहे मरणे ,
नशिबी आले रोज रोज झुरणे

नशीब बदलणे तुझ्याच हाती आहे
आशेने मी तुझ्याकडे पाहे

तू नाही म्हणशील तर ...........

पुन्हा सोडीन मी उसासे
आणि दुसऱ्या प्रेमाचे करीन बारसे.

- योगेश दुकळे
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users