बोंबलाच गोडं

Submitted by deepac73 on 26 October, 2012 - 00:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

६-८ ताजे बोंबील
६-८ लसुण पाकळ्यांची पेस्ट
१ मोठा चमचा तूप
२ लवंगा
१ छोटा चमचा हळद
१/२ वाटी ओले खोबरे, ४-५ काळे मिरे (चवीनुसार) आणि २-३ चमचे कोथिंबीर वाटून घ्या
मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. बोंबील धुवून २ इंचाचे तुकडे करून घ्या.
२. त्याला लसुण पेस्ट, हळद आणि मीठ लावून ३० मिनीटे ठेवा (जास्ती चालेल)
३. तूप गरम करून त्यात लवंगा टाका
४. आता त्यावर बोंबलाचे मिश्रण टाका
५. वाटण आणि २ वाट्या पाणी घाला
६. मिश्रण उकळून बोंबील शिजले की गरम भाताबरोबर वाढा

अधिक टिपा: 

ही "चित्रे" स्पेशल रेसिपी आहे. तापानंतर तोंडाला चव नसते तेव्हा देतात. सूपासारखी पण पीता येते.

माहितीचा स्रोत: 
साबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आल्याचा पण वापर नहिये?
बाकी मस्त या रविवारी केला तर असेच करीन
btw बोंबील सर्वात स्वस्त असते ना इतर fish पेक्षा Happy

भावना, बोंबलाचं गोडं नाव वाचलंस ना?
मग आणखी तिखट काय घालतेस? Wink
गंमत गं, अगदी थोडा तिखटपणा हवा असतो, तो मिरीने येतो.

हा गं साती.. ते गोडं लक्षातच नाहि आलं.. सगळ तिखटच खायची सवय ना.. Happy अन मच्छी म्हटली कि अस गोडं वगैरे नसते ना आमच्याकडे.. पण बोंबील आवडीचा आहे म्हणुन म्हटल रेसिपी पहावी.. करेन या पध्दतीने हि..पण तुपात नाहि.. छान वाटतेय रेसिपी.. Happy

खरं तर याची गोड चव नाही लागत. मि-याचा झण्ण स्वाद असतो. फक्त ते टिपिकल सीकेपी तिखट्जाळ नसतं म्हणून त्याला गोडं म्हणतो आम्ही Happy

ओह ...मला आधी नाव वाचून शॉक बसला ....मासा आणि गोड?

वेगळी रेसीपी. करून बघेन. नुस्ती मीरी टाकून तिखट चव येते का?