**************************************
**************************************
दरवर्षी जेंव्हा मी दिवाळीचे दिवे खरेदी करत असतो
तेंव्हा "ते" सगळे खुप प्रकर्षाने पुन्हा समोर येतात
आयुष्यातले पेच सोडवण्याचे
त्यांचे असंख्य निष्फळ प्रयत्न
त्या प्रयत्नांना मग हद्दपार करणारा
तो, ती किंव्हा अगदी तिसराचसुद्धा
किती सारखे असतात आपापल्या
अविर्भावात,अभिनयात अन अगदी अचंब्यातही.....
आपल्या गरीबीत-असहायतेत अन जगण्यातही
सिग्नलच्या जागा-अंधारल्या खोल्या-मालमोटारींचे आडोसे
पार्थिव जाणीवाही गिळणारा तिथला तहहयात अंधार
हे सगळ त्यांना हवस वाटेल अशी अगतिकता
कशी जन्म घेत असेल त्यांच्या हृदयांत
हे दिवाभिताच फलीत ते का बदलायला बघत नाहीत
मदतीची अपेक्षाच मेलेली म्हणून तर नक्कीच नाही
त्यांच स्वप्नांच भानच हरपलेल असत अस तर नाहीच
त्यांनी मार्क्स वाचला नसतो म्हणुन तर नाहीच नाही
त्यांचे दु:खाचे अदमांस वेगवेगळे असतात म्हणूनही नाही.....
तर त्यांच जगण्याच गांभीर्यच संपलेल असत बहुधा...म्हणून !!!!!!!!
****************************************
****************************************
छान ही सहजसाधी कविता मोठे
छान
ही सहजसाधी कविता मोठे भाष्य करते
अभिनन्दन
कविता आवड्ली छान आहे,पण मला
कविता आवड्ली छान आहे,पण मला दिवाभित या शब्दाचा अर्थ नाही समजला.
दिवाभित म्हणजे दिवसाला /
दिवाभित म्हणजे दिवसाला / उजेडाला घाबरणारं .. म्हणजे घुबड .... तो शब्द बहुतेक दिवाभीत असा असावा असे वाटते.
इथे अजुन अर्थ आहेत. http://www.definition-of.net/%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4...