अंधाराचे अंगाईगीत

Submitted by सुसुकु on 23 October, 2012 - 17:44

अंधाराचे अंगाईगीत

उगी उगी रडू नको माझी बाळी
रडू नको आता फार रात्र झाली

बघ इक्डे तिक्डे सारी वाडी काळी
झाडे काळीकुळी सावलीही काळी
उभी शांत जशी पुतळा ती खेळी
रडू नको आता फार रात्र झाली

चांद नाही बाही नाही त्याची पाळी
नोकर हा जसा फिरती ही भाळी
आज दिस सुटीचा उद्या पळापळी
रडू नको आता फार रात्र झाली

नाही आई शेजी असे कामा गेली
काम असेही अन तसेही ह्या अवेळी
जशी तू तशी मीही जीव हा जाळी
(जसा मी तशी तूही जीव हा जाळी)
रडू नको आता फार रात्र झाली

नाही अंधार नाही तो प्रकाश जाळी
नाही लक्ष्मी घरी कशी साजू दिवाळी
गीत अंधाराचे हीच अंगाई गाईली
रडू नको आता फार रात्र झाली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users