अशात तुमच्यावर परगावच्या येणाऱ्या पाहुण्याला घरापर्यंत मार्गदर्शन करायचा प्रसंग ओढवलाय का? माझ्यावर ही वेळ नेहेमी येते (बाहेरून येऊन पुण्यात स्थायिक झाल्यामुळे येणारे-जाणारे ‘पावणे’ भरपूर असतात. एके दिवशी अचानक फोन येतो.
“हॅलो, मी आलोय पुण्यात. आहात का घरी?”
“अरे वा.. अलभ्य लाभ. कुठे उतरलात? स्वारगेटला ना?”
“नाही, पिंपरीत उतरलोय मी”
“तिकडे कुठे?”
“कालच आलोय, भाच्याकडे उतरलोय. काम झालंय. म्हंटलं जाता-जाता भेटून जावं”
“बरं, बरं. या की मग. मी घरीच आहे”, बायकोला विश्वासात न घेता परस्पर या म्हंटल्याचं एक कलम तर नक्कीच लागलं, आता सांभाळून बोलायचं.
“कसं यायचं?” आली प्रश्न-पत्रिका माझ्या हातात... आपका समय शुरू होता है अब!
“सहकार-नगरची बस पकडा तिथून... आणि मग..”
“बस नाही हो, गाडी आहे आपली, मारुती. कसं कसं यायचं ते सांगा..” आजकाल सोम्या-गोम्याही गाडी घेतोय, आम्हीच आपले डोक्यावर पालथ्या कढया पेलत दुचाक्या पळवतोय ‘माझी गाडी, माझी गाडी’ करत.
“ओह.. मग सोप्पं आहे. बॉम्बे-पूना रोडनी संचेती पाशी आलात ना, की मग...”
“किती वेळ लागेल साधारण?”, आलाच प्रश्न, एका वाक्यात उत्तर द्या.
“निदान २५ मिनिटे...”
“अरे बापरे... लांब आहे की हो” तरीही तुम्ही तडमडणारच, माझ्या पत्रिकेतच आहे ते, आय नो.
“..........”
“तर मग, संचेतीपासून आत वळलात की...”, लहानपणी थांब तुला कापूस-कोंड्याची गोष्ट सांगतो असं नुस्त सांगून छळायचे तसं आता मीच मला छळून घेत होतो.
“एक मिनिट, बाळूशी बोला, तोच चालवतो गाडी”, आओ ठाकूर, बाळू तर बाळू.
(बाळू: तुम्हीच बोला अन मला सांगा की, माझी नाही ओळख..)
(पाहुणे: अरे पत्ता समजून घ्यायला काय ओळख पाहिजे? घे तूच फोन..)
“हां बोला”
“अरे बाळू, मी काका बोलतोय... काय म्हणतोस? आता मोठा झाला असशील ना तू”
“काका मी डायवर हाय, कसं याचं सांगा”, घासून चरे पडलेली डीव्हीडी फसकन बाहेर यावी, तसं मला खजील होतं क्षणभर.
“ओह.. बॉम्बे-पूना रोडनी संचेती पाशी आलास ना...” की तिथेच भरती व्हा असं ओठावर येतं अगदी.
“कर्वेनगरला याचं ना, मग ते उलट होईन ना”
“उलटं कुठे? पिंपरीहून निघालात की...”, मनात विचार येतो, का बुडवले मी प्राणायामाचे वर्ग? आत्ता पेशन्स नसता का राहिला याच्याशी बोलताना?
“आमी ढेक्कनलाय काका आता, पिम्परीस्न सकाळीच निगलो...काम करत करत”
“ऑ, बरं बरं. तुम्हाला कर्वेपुतळा माहिती आहे का?”
“पिंपरीतला?” पिंपरीत तुझ्या पप्पांनी उभारला होता कारे बाळंभटा?
“कोथरूडचा”
“तो कुठशीक आला?” प्रश्न ३.क योग्य ‘जोडे’ लावा.
“म्हणजे माहित नाही...”, माझा थंड निष्कर्ष.. वा, जमला की मला वेडा-वाकडा का होईना कुंभक की रेचक.
“..........”
“पौडफाटा?”
“म्हाईत हाय की” देव पावला.
“हं, तर पौडफाट्या वरून सरळ कर्वेपुतळ्याकडे यायचं” अक्षरशः ड्रॅग अन ड्रॉप करतोये मी या बाळ्याला.
“म्हंजे ते पुलावरून जायचं का?”, नको म्हणून कोकलतोय तरी गेलंच बाळ ‘वळणावर’
“नाही, नाही, पुलावर जायचंच नाही, सरळ यायचं, चढायचंच नाही पुलावर...” मनात येतं, जा लेका, तसाच सरळ मुळशीपर्यंत जा आणि टाटाच्या तळ्यात उतर गाडीसकट.
“पुलाचं काम चालूय का?” याचा मेल आयडी नक्कीच चांभार@चौकशी.कॉम असावा
“.........वाटेत एक मंदिर लागेल, डाव्या बाजूला मृत्युन्जयेश्वराचं... त्यावरून सरळ यायचं”
“लय लाम्बय”, लांब तू आहेस लेका, मी इथंच राहतोय ५ वर्षानपासून.
“पुढे कर्वेपुतळा येईल, तिथे थांबायचं डाव्याबाजूला”
“तिठं राहता का तुमी?” तिथं कर्वे राहतात कर्वे. चहा पण पाजतील तुला चौथऱ्यावर चढून गेलास तर.
“नाही, मी तिथे राहत नाही, पण मी स्वतः तिथे येतोय, कारण यापुढे मार्गदर्शन करायची शक्ती नाही माझ्यात”, मी स्पष्टच सांगतो.
“बरय मंग. थांबतो कर्वेमंदीरपाशी”, उपकार झाले दोस्ता.
“...........”
थोड्या वेळानी पुन्हा फोन.
“आलो आम्ही इथे, तुमी कुड्य?” बाळ्याच आहे पुन्हा राशीला. पावणे झोपले वाटतं मागच्या सीटवर वाटेत फुल-मस्तानी झोकून आणि बाळ्याला माझ्यावर ‘छु’ करून.
“कुठे आलात तुम्ही? मी इथेच आहे.”
“आमीबी इथंच हाये” अरे काय चाललंय? तुम्ही पण तिथे, मी पण तिथे. मग दिसत का नाही एकमेकाला? बाजूचा पोलीस आता माझ्याकडे उगीच सावज न्याहाळत घुटमळणारा ‘मंगळसूत्र’ चोर समजून संशयानं पाहायला लागतोय.
“काय दिसतंय तुम्हाला आजूबाजूला? खूण सांग ना एखादी”
“संदीप चप्पल मार्ट” काय पण जगातलं आठवं आश्चर्य, भाग्यच पुण्याचं इतकं प्रसिद्ध ठिकाण इथे?
“अरे मोठं काहीतरी आजूबाजूला दिसत असेल तर सांग बाबा” मग आजूबाजूला चौकशी. बहुतेक पाहुणे पण वामकुक्षी संपवून उठले असावे एव्हाना.
“गणपती-माथा मंदिर हाये इथं, तुमी कर्वे-मंदिर मनाले होते”, यांचा आख्खा कळप पार वारजे पूल ओलांडून पलीकडे गेला होता रे देवा. एक क्षण मला विम्बल्डन च्या टेनिस कोर्ट वर जाळीपाशी उंच स्टुलावर बसल्यासारखं वाटलं. यांना आता थांबवलं नाही तर मी रात्र उलटून गेली तरी संचेती ते वारजे नुस्त इकडून तिकडे मान हलवत आणि फोन वर बोलत बसणार अशी चिंता वाटायला लागली.
“कर्वे मंदिर नव्हे मर्दा, कर्वे पुतळा.... आणि मंदिर मृत्युंजयेश्वराचं होतं रे बाळ”, आता-मी@व्याकूळ.कॉम
“नवीन हाये का ते?” ...... नाही, बांधतो आता तुझ्या नावानं चंदा गोळा करून सकाळपर्यंत.
“आता कृपया आहे तिथेच थांब, मी येत आहे, माझी लाल रंगाची होंडा मोटारसायकल आहे, निळा टी-शर्ट आहे” एका दमात स्वतःचं अगदी ‘पोलिसी’ वर्णन करून मी फोन कट करतो, तोच हिचा फोन
“अरे कुठयेस तू? सारखा फोन एंगेज लागतोये तुझा...”
“माझा ना? लागणारच ना, एंगेजमेंटच आहे ना माझी आज, एंगेजच लागणार...”
“काय बडबडतोयस तू? त्यांचा फोन आला होता लँड-लाईन वर... काहीही खायला करू नका, लगेच निघणार आहे म्हणून”
“ठीक आहे, त्याचं जाऊदे, माझ्यासाठी करशील का काहीतरी खायला? सॉलिड भूक लागलीये मला पाहुणे-पाहुणे खेळून” एवढं बोलून मी हेल्मेटचा पट्टा लावत किक मारतो आणि गाडी उलट्या दिशेने फिरवतो.
मस्त खुसखुशीत लिखाण
मस्त खुसखुशीत लिखाण
मस्त जमलय, ( अस्सल पुणेकर
मस्त जमलय, ( अस्सल पुणेकर आहात कि ! )
मी चुकुनही पुण्यात पत्ते / रस्ता विचारायचे धाडस करत नाही.
नेहमी घडणारे प्रसंग चांग्लेच
नेहमी घडणारे प्रसंग चांग्लेच सादर करत आहात..
छानच.
मस्तच................. . . आत
मस्तच.................
.
.
आता माझ्या कडे कोणी आल्यावर सरळ सांगणार आहे मी.....मोबाईल मधे जीपीएस चालु कर.....आणि मला गुगल मॅप वर शोध..
त्यात कोल्हापूर कडे गेलात तर
त्यात कोल्हापूर कडे गेलात तर चौकातून 'खाली' जा म्हणतात. आम्हाला डावीकडे, उजवीकडे आणि सरळ इतकंच समजतं. खाली म्हणजे कुठे असं विचारलं तर 'अहो खाल्ल्या अंगाला' असं पुन्हा म्हणतात. पुन्हा विचारायची हिम्मत होत नाही, शेवटी कोल्हापूर आहे ते.
(No subject)
भारीच आहे अश्या प्रकारच्या
भारीच आहे
अश्या प्रकारच्या खूप आठवणी असतात.
त्यात कोल्हापूर कडे गेलात तर चौकातून 'खाली' जा म्हणतात. आम्हाला डावीकडे, उजवीकडे आणि सरळ इतकंच समजतं. खाली म्हणजे कुठे असं विचारलं तर 'अहो खाल्ल्या अंगाला' असं पुन्हा म्हणतात. >>>>>>

असच उत्तर एकदा दिरांना मिळाल होत. दिरांनी एकाला रस्ता विचारला तर तो माणुस म्हणाला इकडन अस नीट जावा. (माझे दिर म्हणाले मी नीटच जातोय तुम्ही रस्ता सांगा)
शेवटी दिरांना कळल की नीट जा म्हणजे सरळ जा.
>>मी नीटच जातोय >>
>>मी नीटच जातोय >>
मस्त लेख. हा असला प्रकार
मस्त लेख.
हा असला प्रकार दुसर्या बाजूने अनुभवला आहे.
पुण्यातल्या पेठांमधले रस्ते शोधणे केव्हढे दिव्य काम आहे.
लेख धम्माल.. मुंगु तुमचे लेख
लेख धम्माल..
पुरवून पुरवून आणि रिपिट मोडला वाचत असते...
मुंगु तुमचे लेख म्हंजे माझा एकटीने धमाल हसायचा चहा/कॉफी ब्रेक असतो
नेहमीच सगळ्या लेखासाठी सगळेच पंचेस सरस...
चांभार्@चौकशी.कॉम आणि मी@व्याकुळ.कॉम
जबरी... वाक्यावाक्याला हसले.
जबरी... वाक्यावाक्याला हसले. मजा आया, मुंगेरीलाल.
मस्त... शिवाजी महाराज के हाथ
मस्त...
शिवाजी महाराज के हाथ मे जो तल्वार है उस्की दिशामे आगे आओ., नीट जावा ... भन्नाट.
मस्त लिहिलंय... हे सगळे अगदी
मस्त लिहिलंय...
हे सगळे अगदी ओळखीचे लँडमार्क पुढे महात्मा सोसायटीत राहात असल्यामुळे.
मस्त लिहिलयं . सुमेधाव्ही आणि
मस्त लिहिलयं .
सुमेधाव्ही आणि अनु चे किस्से पण भारी !
अरे देवा! अगदी दुखरी नस हसत
अरे देवा! अगदी दुखरी नस हसत हसत दाबली गेली.
लेखन आवडलं.
एकतर अश्या अडलेल्या पाहुण्यांना (कळवून तसेच न कळवता आलेल्या) पत्ते सांगायचे नाहीतर घ्यायला ठेसनात जायचं म्हणजे दिव्य काम. सुटले एकदाची त्यातून. आणखी एक प्रकार म्हणजे रिक्षा करून आल्यावर मागच्यावेळी पंध्रा रूपये झाले आता वीस कसे घेता? यावर वाद आणि एका रिक्षावाल्यावरून सगळ्यांना नावे ठेवणे, तरी यांचा पाहुणचार करावा लागणे.
मस्त सेन्स ऑफ ह्युमर आहे
मस्त सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमचा हे लिखाण वाचताना जाणवतं, वाक्या-वाक्याला हसू येत राहिलं, आणि
चांभार्@चौकशी.कॉम आणि मी@व्याकुळ.कॉम>>>> ह्यावेळेस कडेलोट झाला...ऑफिसात वाचायची सोय राहिली नाही हो
सह्ही आहे .... फस्स्कन
फस्स्कन डिव्हीडी, चांभार्@चौकशी.कॉम आणि मी@व्याकुळ.कॉम...<<<
लैच भारी,
लैच भारी,
(No subject)
मस्तय हे पण
मस्तय हे पण
मस्त..आवडलं..
मस्त..आवडलं..:)
हे मस्त आहे
हे मस्त आहे
मस्त आहे. आमचाही नेहमीचा
मस्त आहे. आमचाही नेहमीचा अनुभव. प्रभात रोडच्या गल्लीत रहातो. त्यामुळे पता सांगण्याची कसरत नेहमी करावी लागते.
मुंगेरीलाल - तुमचे सगळेच लेख मस्त आहेत. आवडले.
मस्त!
हा लय भारी आहे.
हा लय भारी आहे.
मुंगेरीलाल ...मस्तच... तुमचा
मुंगेरीलाल ...मस्तच... तुमचा लेख वाचून दिवस मस्त जातो.....कामाच कितीहि प्रेशर असले तरी तुमचा लेख वाचतेच्...निखळ करमणूक्... हॅट्स ऑफ टू युअर सेन्स ऑफ हूमर
(No subject)
मस्त!!!
मस्त!!!
(No subject)
मस्त लिहले आहे
मस्त लिहले आहे
Pages