लाल भोपळ्याचे थालिपिठ

Submitted by दिनेश. on 22 October, 2012 - 04:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४/५ थालिपिठे होतील.
अधिक टिपा: 

ही भाजी उरली म्हणून थालिपिठे केली मी. पण भाजी सुद्धा छान लागते.
( भाजी मी आधी पण लिहिली होती. )

माहितीचा स्रोत: 
आशा भोसले आणि कालनिर्णय
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म स्त ..... मि परवा लाल भोपळा ऊकडुन त्यामध्ये थोडा गुळ आणि मावेल तेवढे पिठ घालु न गोड पुर्‍या के ल्या ... त्यापन मस्त झाल्या होत्या. ( लेकाच्या पोटात त्याने भोपळा तरि गेला )..

मि परवा लाल भोपळा ऊकडुन त्यामध्ये थोडा गुळ आणि मावेल तेवढे पिठ घालु न गोड पुर्‍या के >>लाल भोपळ्याच्या गोड पुर्‍या माझाही फेवरीट प्रकार. Happy

ओहो छान दिसताहेत Happy
दिनेशदा,
कांद्याशिवाय कसे लागेल?
कांदा बघुन म्हटले की कदाचित बारिक चिरावा लागणार. पण मग तुम्ही तिथे कंसात लिहिलेले पाहिले की बारीक चिरायची गरज नाही. खरचं कृती लिहिण्याचीही कृती तुमच्याकडुन शिकायला हवी. Happy

माधवी या परतण्यात कांदा भोपळा अगदी एकजीव होऊन जातो. कांदा बारीक चिरावा न लागणे आणि तो फारसा परतावा न लागणे, यामूळेच ही भाजी माझी आवडती आहे !

लाल भोपळ्याच्या गोड पुर्‍या>>>>

त्याला घारगे म्हणतात.

दिनेशदा मस्त क्रुती, करुन पहाते

करून बघेन. भाजीवालीने "काल पाऊस आहे. कुठे एवढं सगळं घेऊन दारोदार फिरत बसू" म्हणून तुम्हीच ही सर्व भाजी घ्या असं म्हणाली. म्हणून माझ्याकडे चार कच्ची केळी, कसलीतरी एक पालेभाजी, आणि चांगला मोठा अर्धा भोपळा दिलाय. शिवाय केळीची दहा बारा पाने. कालपासून आमच्याकडे ताटं घासायला नाहीत. Proud

लाल भोपळ्याच्या गोड पुर्‍या>>>>

त्याला घारगे म्हणतात.

>>>>

सासरी आल्यानंतर मी ह्या गोड पुर्‍यांचा उल्लेख केला तेव्हा साबा पण हेच म्हणाल्या. माझ्या आवडीसाठी एकदा त्यांनी केल्या तर त्या मला अपेक्षित होत्या तशा मऊ नव्हत्या. म्हटले पीठाचा काहीतरी गोंधळ झाला असेल म्हणून मऊ पुर्‍या झाल्या नसतील. पण अजून एका स्नेह्यांकडे घारगे खाल्ले ते ही कडकसेच होते. स्वयंपाकीण बाईंनाही एकदा गोड पुर्‍या करा म्हटले तर त्यांनी घारगे ह्या नावाने असला कडकडीतसाच काहीतरी प्रकार केला. तेव्हा पासून कळले की घारगे वेगळे व पुर्‍या वेगळ्या! Proud घारगे कडक असतात. पुर्‍या म्हणजे अगदी साध्या पुर्‍या करतो तसल्या मऊ असतात.

दिनेशदा. आधी त्या पालेभाजीला काय म्हणतात ते मलाही माहित नाही. Proud चाकवत असावा असा माझा अंदाज. स्वैपाकाच्या बाईला कर म्हणून सांगितल्यावर "आयुधपूजेनंतर" - नवरात्रीनंतर असे उत्तर आलय. करत असताना मी कृती लिहून घ्यायचे काम करेन. Happy

वा दिनेशदा मस्त रेसिपी दिलीत. नक्की करून पाहिन. इथे लाल भोपळा २ आठवड्यातून एकदा तरी आणलाच जातो.
नुसती लाल भोपळ्याची भाजी पण मस्त लागते ना मेथ्या, हिंग, कढिपत्ता, गुळ, ओलं खोबरं, भाजलेले दाणे घालून. अहाहा... तोंपासु Happy

थालिपीठ एकदम तोंपासु दिसतंय पण भोपळा आणि कांदा एकत्र कल्पना करता येत नाहीये कारण अगदी उपासाची जरी नाही तरी भोपळ्याची भाजी कायम खोबरं, तीळकूट, दाण्याचं कूट, गोडा मसाला ह्यापैकी काहीतरी घालूनच खाल्लीय Happy

मी खाल्लेले घारगे कधीच कडक नव्हते. जाडसर थापून तळल्यामुळे आतून मऊ असतात. काहीसे शिर्‍यासारखे लागतात ( घारग्याचा आतला भाग ) पुर्‍या मात्र नीट जमल्या नसतील तर कडक होतात. विशेषतः गार झाल्यावर. म्हणजे असा माझा अनुभव आहे Happy

वा मस्तच! दिनेशदा........परवा कोकणातून परत येताना तिथल्या एका नातेवाईकाने एक भला मोठ्ठा सोटा दिला आहे. त्याचे चार तुकडे करून वाटले , शेवटचा एक मला ठेवला आहे. ती काकडी आहे.......खास घावनासाठी. तर ही काकडी खिसून थोडी शिजवावी व त्याची घावनं घालावीत असा सल्ला मिळाला. तर अगदी ऑथेन्टिक काकडी घावनाची कृती माहिती आहे का?