Submitted by राजेंद्र देवी on 15 October, 2012 - 11:51
दृष्ट
वेडाविते मज भाळिची चंद्रकोर
अन नयन तुझे काळेभोर
वेडविते मज पापण्यांची फडफड
अन ओठांची ति मुरड
गोबऱ्या गालांवरी खुलते खळे
त्यात केसांची बटही रुळे
हृदयात काय होते हेही न कळे
जेव्हा नजरेस नजर मिळे
चालताना भावते ऐट तुझी
वळून पाहते धीट नजर तुझी
काय सांगू वाट लागते माझी
स्वप्नाला पण दृष्ट लागते तुझी
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके ओके आहे फारशी आवडली नाही
ओके ओके आहे
फारशी आवडली नाही क्षमस्व