सिग्नल

Submitted by बाबूराव on 10 October, 2012 - 04:17

त्याच्या चेह-यावर कसलेच भाव नस्ले तरी तो आतून अस्वस्थ होता.
बाहेरुन बघना-याला ते लक्शात आल नस्तं. रस्त्याच्या कडला
तो उभा होता. बॉम्बेचे रस्ता असल्यानं आठ लेन होत्या.
गाद्यांना चांग्लाच वेग होता.
त्यानं सिग्नलकड पाहिलं. ग्रिन होता.
अचानक त्याच्या हालचालि झाल्या.
चित्याने पाहिलं असतं तर तो लाजला अस्ता.
तो भंगरिसारखा उडाला आणि हवेत ३० डिग्रीचा कोन करुन
समोरच्या रस्त्यावर त्याने झेप घेतलि. त्याच वेळि मागुन फाष्त येनारा
ट्रेलर तिस-या लेनमधुन येत होता. सगळे घाइत असल्यानम कुनाच्या लक्शात
तो प्रकार आला नाहि, नाहितर दोन तिन तिथंच मेले असते.
ट्रेलरच्या केबीन आनि कंतेनरच्या मधल्या जागेतून तो अज्जात पास झाला
आनि दिवायदरवर लॅन्ड झाला आनि एकच उसळि घेउन रस्ता पार करुन गेला.

घड्यालात बघत तो म्हनाला सव्वा सेकंद !!
अजून त्याच्या हातात सात सेकंद होते. पायाला स्पीड देउन तो सिग्नलला पोहोचला
आनि सिग्नल रेड झाला.

शांतपने त्याने ब्रेक मारुन थांबलेल्या गाडिजवळ जात आत रोखून पाहील.
कुनीतरी शेट होता. त्याच्या नजरेला नजर देत तो म्हनाला

" अल्ला के नाम पे दे दे , भगवान के नाम पे दे दे !
तेरे बच्चे जिये ! तेरी शादि हो, तुझे नौकरि मिले ! "

बाबुराव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users