Submitted by भटक्या अनुराग on 10 October, 2012 - 01:22
मित्रानो नमस्कार,
ट्रेकर्स आणि भटक्यांना वाईट धक्का देणारी बातमी आहे.
लवकरच म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये अलंग किल्याला शिड्या बसविण्याचा निर्णय वनखात्याने घेतलेला आहे...कोकणडा, रतनगडानंतर आता किल्ले अलंगवर हे संकट कोसळले आहे...!!!
विषय:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यात कसले आलयं संकट? ज्यांना
त्यात कसले आलयं संकट? ज्यांना चढून जाता येणार नाही अश्या ईतर कोणी तिथे जाउच नये अशी इच्छा का बरे???
अगदी संकट नसलं तरी गड सोपा
अगदी संकट नसलं तरी गड सोपा होणार आता...
हो सेनापती. आणि उगाच जीव
हो सेनापती. आणि उगाच जीव धोक्यात घालण्यापेक्षा, शिड्या काय वाईट ?. तश्याही अनेक गडांवरच्या शिड्या, धोकादायक ( तूटक्या / गंजक्या ) अवस्थेत आहेत.
ट्रेकर्स आणि भटक्यांना वाईट
ट्रेकर्स आणि भटक्यांना वाईट धक्का देणारी बातमी आहे.ट्रेकचे थ्रील सपले म्हनुन
मी ट्रेकर आहे आणि भटक्या
मी ट्रेकर आहे आणि भटक्या देखील.. माझ्यासाठी थ्रील संपलेले नाही आणि बातमी धक्क देणारी देखील नाही. ३ वर्षापुर्वी शिड्या लावायचे ठरले होते.. अंमळ उशीरच झाला नेहमीप्रमाणे!!!
ज्यांना थ्रील हवाय ते अलंगवर मागच्या वाटेने जाउ शकतात पुर्ण वळसा घालून नैतर पुर्वेच्या बाजुने लाकडाच्या खांबावरच्या वाटेने देखील वर चढून येउ शकतात...
रच्याकने.... शिड्या लावल्या की त्या २-३ पावसळ्यात मोडकळीत येतात आणि ट्रेकच थ्रील वाढतो असा देखील एक अनुभव आहे...
मला तीनही किल्ले एकदम करायचे
मला तीनही किल्ले एकदम करायचे आहेत, तेही नव्या शॉर्टकटने... त्या आधी शिड्या लागू नयेत म्हणजे झालं...
अगदी संकट नसलं तरी गड सोपा
अगदी संकट नसलं तरी गड सोपा होणार आता...थ्रील सपले.
सेनापती अरे शिड्या लावल्या कि
सेनापती अरे शिड्या लावल्या कि अजुन सोपा होणार आहे किल्ला तसेच या दुर्गम अलंग वर जाऊन लोकांना किल्ला घाण करायला जास्त आनंद वाटेल तसेच आपल्या सरकारने किल्ले खराब करण्याचा विडा उचलला आहे...!!!

ट्रेकर्स आणि भटक्यांना
ट्रेकर्स आणि भटक्यांना वाईट
धक्का देणारी बातमी आहे.
होउ दे की सोप्पा.. तुम्हाला
होउ दे की सोप्पा.. तुम्हाला दिलाय ना मागच्या बाजुने अजुन कठिण चढाईचा रस्ता... चढा की लाकडाच्या खुट्यावरून...
लोकांनी जाउन घाण करु नये म्हणून शिड्या लावायच्या नाहीत हे पटत नाही. चढून वर जाणारे सर्वच कचरा करत नाहीत असेही नाही. नाहीतर वर कचरा मिळालाच नसता की...
सेनापतीला अनुमोदन. मदनलाही
सेनापतीला अनुमोदन.
मदनलाही हव्यात.
हेम... मदन हे नामकरण कधी झाले
हेम... मदन हे नामकरण कधी झाले ते पण सांग रे मला.. मला तो गड कायम मंडण म्हणूनच ठावूक आहे.
सांगाती मध्ये देखील त्याचा उल्लेख मंडण असाच आहे. 
हो रे अनुराग, सेनापती म्हणतोय
हो रे अनुराग, सेनापती म्हणतोय ते पटतंय
मंडणलाही शिडी हवी. सेनापती,
मंडणलाही शिडी हवी.
सेनापती, कान धरुन उठाबशा काढण्याची स्मायली आहे कांय?
सेनापतीला १००% अनुमोदन गडावर
सेनापतीला १००% अनुमोदन
गडावर जाऊन घाण करणारे जसे आहेत त्याच प्रमाणे गडावर जाऊन गड स्वच्छ करणारे देखील आहेत,
अनेकांना गडांच्या दुर्गमते मुळे ईच्छा असुनही जाता येत नाही, त्यामुळे आशादायक विचार केला तर शिड्याप्रकरण चांगलेच आहे ( हेमावैम), आणि कचरा झालाच तर आम्हाला कळवा, नक्कीच साफ सफाई करुन टाकु
मला अनुमोदन देणार्या
मला अनुमोदन देणार्या सर्वांना धन्यवाद..
माझ्या वक्तव्यावर उलट प्रतिक्रिया येतील अशी मला भिती होती.
पण सर्वजण एकसारखा विचार करत आहेत हे पाहून आनंद वाटला.. 
अरे खरचं भारी बातमी ज्यांना
अरे खरचं भारी बातमी

ज्यांना थ्रील हवाय ते अलंगवर मागच्या वाटेने जाउ शकतात >>> अगदी अगदी माझ्या मनातल बोललास
मला तीनही किल्ले एकदम करायचे आहेत, तेही नव्या शॉर्टकटने.>>>>> नच्या जाणार असशील तेव्हा नक्की कळव रे
फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, गावामधील ( दत्ता वगैरे ) जे लोकांना घेऊन जायचे त्यांचा धंदा बंद होणार.
बर झाल देवा, या शिडी प्रकरणाअगोदर एएमके झालाय माझा
माझ्या वक्तव्यावर उलट प्रतिक्रिया येतील अशी मला भिती होती. पण सर्वजण एकसारखा विचार करत आहेत हे पाहून आनंद वाटला.. >>>> आता सगळ्यांनाच पटलय रे ते सेना, नाही तरी रायगडच्या रोप वे ला पण विरोध होताच कि, सुधा ला पण आहे शिडी, राजगड- तोरण्याच्या शेवटच्या टप्प्यात पण टाकली आहे आता , तस म्हणायला गेलं तर कळसूबाईचा सगळा थ्रील घालवलाय त्या शिड्यानी, पण ठीक आहे रे , लोकांची सोय होते. आणि साहसासाठी खडा पारसी, वजीर, लिंगाणा आहेतच कि
आता असे पहा. समजा तुमचे घर
आता असे पहा. समजा तुमचे घर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आहे. पण इमारतीला लिफ्ट नाही. तुम्ही रोज पाच मजले चढून जाता आणि अर्थातच त्यामुळे अनायसे व्यायाम घडल्याने तुमची प्रकृती उत्तम आहे असे तुमचे म्हणणे आहे. एक दिवस तुमच्या इमारतीत लिफ्ट बसवली जाते. मग तुम्ही गळा काढणार का की आता अनायसे घडणारा व्यायाम चुकेल, लिफ्टने जावे लागेल म्हणून? इमारतीचा जिना कुणी काढणार नाही, तसेच गडावरचे अवघड मार्गही कुणी बंद करणार नाही. तुमची प्रकृती छान रहावी आणि व्यायाम घडावा यासाठी तुम्ही लिफ्टने जाणे टाळून जिना चढून जाऊ शकता, तसेच गडावर बसवलेल्या शिड्या टाळून इतर मार्गांनी गड चढू शकताच.
सामोपचार यांनी अगदी
सामोपचार यांनी अगदी सामोपचारपणे मार्ग दाखवला आहे....
मलाही शिड्या लागण्यात फार काही गैर वाटत नाही...हा आता सिंहगड किंवा पुरंदरसारखा डांबरी रस्ताच वरपर्यंत नेला तरच धोका आहे कारण डायरेक्ट गाड्यांनी येणारे पब्लिक यासारखे निसर्गाला हानीकारक दुसरे काही नाही....
शिड्या जरी असल्या तर अलंगच्या पायथ्यापासून यायची वाट, घसारा आणि बाकी आव्हान टिकून राहणारच आहे. आणि या दुर्गाच्या वाट्याला जाणारे भटके हे नक्कीच पिकनिक संप्रदायातले नसतात....
वरपर्यंत डांबरी रस्ता नेणे
वरपर्यंत डांबरी रस्ता नेणे बहुतेक ठिकाणी चुक ठरेल जसे सध्या हरिश्चन्द्र बाबत काहीसे केले जातेय. त्याने गडाचा फीलच जाईल.
रायगडी रोप-वे झाल्याने अनेकांना गड बघणे सुकर झालेले असले तरी अनेक जण (बहुतेक सर्वच) महादरवाजा पाहू शकत नाहीत. टकमक ते श्रीगोंदे ही गडाची एकमेव तटबंदी देखील पाहिली जात नाही.