Submitted by सुप्रिया जाधव. on 8 October, 2012 - 11:44
प्रश्न ना दुर्लक्षिल्याचा...
राग येतो ठेचल्याचा !
रक्त गोठू दे हवेतर..
त्रास होतो पेटल्याचा !
दु:ख होते, दु:ख आहे
दे पुरावा सोसल्याचा !
तू असा पाहू नको ना...
भास होतो संपल्याचा !
कोण पश्चाताप होतो !
जन्म सारा रेटल्याचा
मांडला अन मोडलाही...
खेळ झाला भोंडल्याचा !
हारल्यावरती समजते...
गर्व नडतो जिंकल्याचा !
गझल साक्षात्कार आहे
जीवनाला भेटल्याचा !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई गं SS काय गझल लिहिलीत
आई गं SS
काय गझल लिहिलीत सुप्रिया तै!!
बिन मतल्याचीय का ?....असो फरक पडत नाहीच म्हणा !!
वैभव धन्स! शल्य घेतल्याने
वैभव धन्स!
शल्य घेतल्याने 'चे' झाले होते
-सुप्रिया.
काय सुरेख जमलीये.....खूप खूप
काय सुरेख जमलीये.....खूप खूप छान......
खुपच सुंदर सुप्रियाताई
खुपच सुंदर सुप्रियाताई
सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब......
सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब......
प्रश्न ना
प्रश्न ना दुर्लक्षिल्याचा...
राग येतो ठेचल्याचा!
मी हा शेर लिहिताना दुर्लक्षिल्याचा आणि ठेचल्याचा यांच्या जागेची आलटापालट नक्की केली असती..
योगुली , अनिल तापकीर ,पुरंदरे
योगुली , अनिल तापकीर ,पुरंदरे शशांक
आनंदयात्रीजी ,
पण माझा अनुभव वेगळा आहे
मनःपुर्वक धन्यवाद मंडळी.
-सुप्रिया.
एकदम सुपर्ब!!
एकदम सुपर्ब!!
एकंदर छान गझल आहे, ओळीही
एकंदर छान गझल आहे, ओळीही विशेष आहेत
फारच सुन्दर !
फारच सुन्दर !
मस्त ! अनेक सशक्त शेर (आणि
मस्त !
अनेक सशक्त शेर (आणि सुटे मिसरे) असलेली तुमची ही गझल आवडली.
शुभेच्छा !
तू असा पाहू नको ना... भास
तू असा पाहू नको ना...
भास होतो संपल्याचा !
कोण पश्चाताप होतो !
जन्म सारा रेटल्याचा
छान शेर!
प्राजु
प्राजु ,
बेफिकीरजी,
बिनधास्त,
ज्ञानेशजी, (विशेष)
विदिपाजी
धन्यवाद मंडळी.
-सुप्रिया.
रक्त गोठू दे हवेतर.. त्रास
रक्त गोठू दे हवेतर..
त्रास होतो पेटल्याचा !
तू असा पाहू नको ना...
भास होतो संपल्याचा !
मांडला अन मोडलाही...
खेळ झाला भोंडल्याचा !
गझल साक्षात्कार आहे
जीवनाला भेटल्याचा !
>>>>>>>>>>>>>>
हे शेर आवडले !
सर्वच शेर आवडले...
सर्वच शेर आवडले...
ग्रेट !!
ग्रेट !!
आनंदयात्री! १००% सहमत! अगदी
आनंदयात्री!
१००% सहमत! अगदी मनातले बोललात!
एक्सॅक्टली सर! तुम्ही तुमच्या
एक्सॅक्टली सर!
तुम्ही तुमच्या मनातले बोलता अन कवि त्याच्या...:-)
धन्यवाद!
रणजित, आबासाहेब, अमित धन्स!
तुम्ही तुमच्या मनातले बोलता
तुम्ही तुमच्या मनातले बोलता अन कवि त्याच्या...>>>>>>>>>>>>एक्सॅक्टली सुप्रियातै ,
ग्रेट वाक्य!!(टोला!!;) ).................
...ख्रिस गेल स्टाईल् !! एकदम १२ रन बहाल या फटक्याला !!
देवसरान्चा " दूसरा" चेन्डू (देवसरान्सकट....)एकदम ग्राऊण्डच्या बाहेरच अगदी!!
सुप्रियाजी,
सुप्रियाजी, वैभवा!
दुस-यांच्या मनातील बोलता वा लिहिता येत नसेल तर तो कविच कसला?
तो तर फक्त आपल्याच सुखदु:खांना कुरवाळणारा एक सामान्य मनुष्यप्राणीच!
‘परकायाप्रवेश’ हा तर अस्सल कलाकाराचा एक प्रमुख गुणविशेष आहे,. असे जाणकार मानतात!
बाकी आमचे भूषणराव म्हणतात तेच खरे. याला म्हणतात काव्य व याला म्हणतात कवी/गझलकार!
ते म्हणतात..................
क्षूद्र संवेदनांचे उदातीकरण!
का न यावे मराठी गझलला मरण!!
Hats off to बेफिकीरजी!
वैभवा! ही गझल हुडकून, डोळेफाडून वाच! बघ काही प्रकाश पडतो का डोक्यात ते!
थोडेसे आपल्या पायावर उभे रहायला व बिनकुबड्यांचे देखिल चालायला लाग!
किती दिवस आम्ही तरी वाट बघायची तुझ्या तंदुरुस्तीची!
...............प्रा.सतीश देवपूरकर
.............................................................................................
देवपुरकरसर , साष्टांग
देवपुरकरसर ,
साष्टांग दंडवत...!!!
-सुप्रिया.
सेम टु यू!
सेम टु यू!
सुप्रिया, आशय अतिशय सुरेख
सुप्रिया, आशय अतिशय सुरेख आहे.
शेवटचा शेर तर प्रचंडच आवडला.. खूप खरा आहे
खूप दिवसांनी खूप चांगल
खूप दिवसांनी खूप चांगल वाचायला मिळालय,
भन्नाट - शॉर्ट अँड स्वीट
सूंदर
सर्व शेर आवडले!!
सर्व शेर आवडले!!
सुप्रियाजी बहोत खूब !! क्या
सुप्रियाजी बहोत खूब !! क्या बात है !!! एकूण एक शब्द चपखल !
Well done Supriya Tai....
Well done Supriya Tai....
तू असा पाहू नको ना... भास
तू असा पाहू नको ना...
भास होतो संपल्याचा !
हारल्यावरती समजते...
गर्व नडतो जिंकल्याचा !
>>>>>ंखुप मस्त !!!!
मनःपुर्वक धन्यवाद!
मनःपुर्वक धन्यवाद!