प्रवेशिका - ९ (mayuresh - प्रियेची मला साथ......)

Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 23:55

प्रियेची मला साथ का आज नाही?
गुलाबी क्षणांना कसा साज नाही?

सदा पाहतो मी जगाचे बहाणे
स्वतःचाच का येत अंदाज नाही?

उगा फेकती घोषणा हे पुढारी
शिरी राज्य येताच आवाज नाही

कशी जाहली माणसांचीच यंत्रे
मने कोरडी, हास्य निर्व्याज नाही

इथे चालते रे मनांची दलाली
स्वतःचीच विक्री मनी लाज नाही

किती फोडले बाँब देशात माझ्या
सहिष्णू कसा कोण नाराज नाही?

रुजू दे मराठी फुलू दे मराठी
जनी मान आहे वृथा माज नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहाणे आणि दलाली हे शेर खूप आवडले! मस्त जमली आहे गझल.

सदा पाहतो मी जगाचे बहाणे
स्वतःचाच का येत अंदाज नाही?

छान- ४ गुण

प्रत्येक मिसरा सुटा असा खूपच छान जमलाय...
माझे गुण ४
एक शंका - हसू निर्व्याज नको ना? हास्य व्याजासकट आलं तर आणखी उत्तम नाही का? Happy
अर्थात, गझलकाराने विचार केला असेलच... त्यामुळे उत्तर कार्यशाळेचा निकाल जाहीर झाल्यावर कळलं तरी चालेल...

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

मतल्यामधे 'प्रिया नसेल, तर क्षण गुलाबी तरी कसे होतील साज चढवायला?' असा प्रश्न पडला Happy

उगा फेकती घोषणा हे पुढारी
शिरी राज्य येताच आवाज नाही

हा आणि शेवटचा आवडले.
५ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

वा! अंदाज आणि आवाज हे शेर आवडले.
४ गुण.
-------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !

सहिष्णु शेर आवडला. रोखठोक आणि सुस्पष्ट आहे!!
गुलाबी क्षणांना साज नसणं म्हणजे कळलं नाही.
अंदाज शेर - "पाहतो" म्हणजे "ओळखतो" अभिप्रेत आहे का? तसं नसेल तर - "माझाच अंदाज येत नाही" हे connect होत नाही. तसं असेल तर नीट स्पष्ट व्हायला हवं होतं. चू.भू.दे.घे.
माझे गुण - ५

मतला आवडला.. तसेच पुढारी शेर ही आवडला पण त्यात''राज्य' जरा हार्श वाटतोय. तो बदलता आला तर जरूर पहा Happy
एकूण गुण -- ५

खुपच छान....
८ गुण...

मतला इतर शेरांपेक्षा खूप वेगळा वाटतो आहे.
पुढारी शेर आवडला.. पण "राज्य" थोडे खटकले..

बाकी गझल. छान..

गुण ५

प्राजु

मतला जरा हटके वाटतोय. आवाज, निर्व्याज आवडलेच. बाँब हा 'कपा' इतका मराठी झालेला दिसतो आजकाल, खटकला नाही. पण काही पर्यायी चालल अस्तं का? माहीत नाही.
माझे ६
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

अंदाज व नाराज मस्त. ५ गुण.

दुसरा आणि तिसरा हे शेर चांगले वाटले.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश

गजलेचा विषय एक असावा असा नियम नसतो का? माझी आपली एक शंका
गुण? २.

अंदाज और आवाज पे बहोत खुश !!!
माझे गुणः ५

बहाणे आवडला...!
बाँब रुळला आहे मराठीत, तरी थोडाssस्सा खटकला.. का माहीत नाही...

गुण ६

४, ७ आवडले
४/१०

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

माणसांची यंत्रे, दलाली खुपच छान आहेत. ५ गुण...

सदा पाहतो मी जगाचे बहाणे
स्वतःचाच का येत अंदाज नाही?

मस्त एकदम...