ए .आर .डी .एस . पेशंट

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 October, 2012 - 10:08

रात्री ८ वाजता आलेला पेशंट
होता धापा टाकत सांगत
तीनच दिवसांचा ताप फक्त
दुपार पासून दम आहे लागत

पाहताच त्याला
ऐकताच हिस्टरीला
लगेच कळून चुकले मला
पेशंट ए .आर .डी .एस आला

तरूण तीस वर्षाचा
धडधाकट देहाचा
कर्ता सवरता स्वामी घराचा
बाप मुलांचा पती कुणाचा

डायग्नोसिस कसले ते
डेथ सर्टिफिकेटच होते
त्याला कळण्या आधी
मरण मला दिसत होते

भराभरा अॅडमिशन केले
त्याला आय.सी.यु.त नेले
अन वाटले होते तसेच
व्हेंटीलेटर वर टाकले

आता हाती काही नव्हते
मशीन काम करत होते
बघता बघता सॅटूरेशन
आणि झाले खाली पडते

चार तासाचा पाहुणा
आमचा होता तो
त्याच्या त्या प्रवासाचा
मी फक्त साक्षी होतो

कळूनही मृत्यू
टाळता आला नाही
जाणूनही आजार
रुग्ण बरा झाला नाही

पुढचा सारा सोपस्कार
उरकला खरा
हात ठेवून खांद्यावर
मृत्यू गेला जरा .

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

A.R.D.S = Acute respiratory distress syndrom

In ARDS, infections, injuries, or other conditions cause the lung's tiny blood vessels to leak more fluid than normal into the lungs' air sacs. This prevents the lungs from filling with air and moving enough oxygen into the bloodstream.

ARDS can be life threatening. This is because your body's organs, such as the kidneys and brain, need oxygen-rich blood to work properly

Many people who develop ARDS don't survive. The risk of death increases with age and severity of illness. Of the people who do survive ARDS, some recover completely while others experience lasting damage to their lungs.

"आय अ‍ॅम नॉट गॉड"
हे लक्षात आले तरी पुरे असते. अन तेच पुरवायचे असते. फार वेळा ते फिलींग येऊ लागते. कधी आलेच, तर ही कविता वाचा पुनः

इब्लिस, म्हणून काही डॉ लोकांच्या प्रिस्क्रिप्शनवर आय ट्रीट ही क्युअर्स असं लिवल्यालं असतंय का?
Wink

तो दांभिकपणा असतो साती.
किमाण कन्झूमर कोर्टात जायचे तर 'त्या'च्या विरुद्ध जा. मी बापडा फकस्त टेस्मेंट कर्तो. असं हाये ते.
जर 'ही क्यूअर्स' तर 'तू' व्हाय पैसे टेक्स भो?

साती, त्या कॉलेज पेक्षा हे कवितेचे कॉलेज छान आहे.
इब्लिस,आपला सल्ला संपूर्ण मान्य .
भारतीजी ,आनंद वाटला.
सर्वांचे आभार .