Submitted by भरत. on 5 October, 2012 - 02:33
आत्ताच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर एक उद्घोषणा ऐकली. आज शुक्रवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून तीस मिनिटांनी आकाशवाणीच्या सभागृहात 'चांदणे शिंपीत जाशी' हा कविसंमेलनाचा कार्यक्रम आहे. कवींच्या नामावलीत मायबोलीकर कवयित्री क्रांती साडेकर यांचा उल्लेख आहे.
कार्यक्रम विनामूल्य असून त्यासाठीच्या प्रवेशिका आकाशवाणीच्या चर्चगेट येथील स्वागतकक्षात मिळतील.
कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीवरून कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने होणार असावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विदर्भ साहित्य संमेलनाचा एक
विदर्भ साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून 'राजा बढे स्मृती कवीसंमेलना'चं आयोजन करण्यात आलं आहे. यात सहभागी होणार्या मान्यवरांच्या यादीत क्रांती साडेकर यांचं नाव वाचून छान वाटलं. ही बातमी आणखी कुठे द्यावी हे कळलं नाही. म्हणून इथेच देते आहे.
अभिनंदन क्रांती!
Pages