Submitted by अनिल तापकीर on 4 October, 2012 - 13:06
आम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी |
आम्हास प्यारी पंढरीची वारी ||दृ||
मातीशी आमचे मातेचं नातं |
बैल बारदाना हेच आमचं गोत |
नाही आम्ही कुणाला भीत |
कष्ट करितो दिवस रात |
मुखात आमच्या रामकृष्णहरी ||१ ||
कुदळ फावडे घेउनी करी |
निघतो शेताला रामप्रहरी |
विश्रांती आमची बांधावरी |
गोड आम्हास मीठ भाकरी |
भाव आमचा विठोबावरी ||२ ||
ज्ञानोबा तुकोबाने मार्ग दाविला |
कर्मातच ईश्वर सांगितला |
हाती काम मुखी नाम बोला |
हेच प्रिय विठूरायाला |
तुळस आमच्या डुले दारी ||३ ||
कर्मातच असे पापपुंण्याचे माप |
कितीही असुदे कामाचा व्याप |
मुखी आमच्या विठलाचा जप |
पिकातच दिसे आम्हा हरीचे रूप |
संकटी आम्हा विठ्ठलच तारी ||४ ||
मिळाला जन्म शेतकऱ्याच्या घरी |
याचा आम्हास अभिमान भारी |
नाही आमच्यात भेदभावाची दरी |
सगळे समान विठ्ठलाच्या दारी |
जगाया शिकवी गाथा ज्ञानेश्वरी ||५ ||
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख.
सुरेख.