Submitted by अजय प्रभाकर on 2 October, 2012 - 08:34
थांबलो वळणावरी या पावलांना काय त्याचे
मी इथे हे मन तिथे रस्त्यास माझ्या काय त्याचे
तू अता विसरुन जा हे ऐकतो येथे कितीदा
ह्रदय जळते आतुनी या शाब्दिकांना काय त्याचे
आठवांची अंतरी वसवून गेलो घरकुले जी
मी ति़थे जाता क्षणी या वादळांना काय त्याचे
ठेविली सांभाळुनी बघ आसवें डोळ्यात हळवी
तू पहावे त्या क्षणी या पावसाला काय त्याचे
हे असे चोचीतुनी एकेक काडी आणताना
वळचणी छळती उरी या पाखरांना काय त्याचे
भावनांच्या संगती मी हिंडलो माझ्या अभाळी
तेथुनी अंधारले या चांदण्यांना काय त्याचे
हारलो रे शेवटी ना गवसलो माझाच मजला
भोगतो मृत्यू इथे या जीवनाला काय त्याचे
----- अजय प्रभाकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठेविली सांभाळुनी बघ आसवें
ठेविली सांभाळुनी बघ आसवें डोळ्यात हळवी
तू पहावे त्या क्षणी या पावसाला काय त्याचे <<< व्वा आवडली!
धन्यवाद आर. के.
धन्यवाद आर. के.
छान आवडली....
छान आवडली....
खुप हळुवारशी आहे, मस्त
खुप हळुवारशी आहे, मस्त लिहिलिये
तू अता विसरुन जा हे ऐकतो येथे कितीदा
>>>
इथे आता हवे होते
कृ गै न
सुर्रेखच.....
सुर्रेखच.....
चिखल्या , काही वेळेला
चिखल्या ,
काही वेळेला मात्रांसाठी असा बदल करावा लागतो. त्यामुळे आता ऐवजी अता हे त्यासाठीच केले आहे. कवीला तसा
बदल करण्याची मुभा असते. धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
हारलो रे शेवटी ना गवसलो माझाच
हारलो रे शेवटी ना गवसलो माझाच मजला
भोगतो मृत्यू इथे या जीवनाला काय त्याचे .....
खुपच छान.
मस्त रचना !
मस्त रचना !
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !