प्रवेशिका - ८ ( adm - भाव शब्दातील कैसा पोचतच नाही )

Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 00:07

मित्रहो,

ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.

तर सादर आहे आजची प्रवेशिका....

भाव शब्दातील कैसा पोचतच नाही
लावतो ज्योती, निशा तेजाळतच नाही

वाचतो पोथ्यापुराणे, अर्थ पण त्यांचा
पुस्तकातच राहतो, मी बदलतच नाही

चक्रव्यूहातून हे भ्रमणे सदाचे का?
संभ्रमांचा गूढ गुंता उकलतच नाही!

यत्न माझा सर्व जातो, नेहमी वाया,
दैव माझे का सुखाने, हासतच नाही.

तोलतो माथ्यावरी हे आजही ओझे
कष्टणे माझे कधी का संपतच नाही

पावले मार्गावरी या चालुनी थकली
कस्तुरीची आस माझी भागतच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतो पोथ्यापुराणे, अर्थ पण त्यांचा
पुस्तकातच राहतो, मी बदलतच नाही

छानच!!
४ गुण

वाचतो पोथ्या पुराणे, खूप आवडला.
गुण? - मीच शिकायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे... Happy

पुढील गझलेसाठी शुभेच्छा!

उत्तम!!!!!!!!!!

१) गझलेचा आशय -२ गुण
२) शैली - २ गुण
३) शब्दरचना - २ गुण
४) प्रवाह - २ गुण
५) शेर - १ गुण
============
ऐकूण - ९ गुण

वाचतो पोथ्यापुराणे, अर्थ पण त्यांचा
पुस्तकातच राहतो, मी बदलतच नाही

सात गुण.

खुपच छान...
७ गुण

व्वा.
पोथ्या आवडला. काफिये पण वेगळे आहेत... त्या 'च' ने मजा आणलीये.
माझे ६
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ

पोथ्या मलाही आवडला.
काफियासाठीही दाद ला अनुमोदन.

कारागिरीला आणि शब्दांच्या कसरतीला सलाम...
थोडीशी चाकोरीबाहेरची वाटली...
माझे गुण ५

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

५ गुण..

तेजाळतच.. इथे बोबडी वळतीये वाचताना..
६ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

छान गझल!!
पोथ्या आणि पावले हे शेर आवडले. उत्तम सफाई!!
माझे गुण - ६

'च' वाचताना आधी अडखळायला झालं, मग पुन्हा वाचली Happy
कल्पना आवडल्या
६ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

आवडली गझल..

गुण - ५
प्राजु

पोथ्या आणि कस्तुरी हे शेर आवडले.
एकूण गुण ६

सगळी गझल छान....६ गुण

पावले मार्गावरी या चालुनी थकली
कस्तुरीची आस माझी भागतच नाही

छान. ४ गुण.

६ गुण.
'च' ने प्रथम माझीही बोबडी वळली पण पुन्हा वाचल्यावर त्यातली मजा अनुभवली. शिकतेय सगळ्या गजला आणि त्यावरचे प्रतिसाद वाचुन.

७ गुण

दिसलीस तू...फुलले ॠतू..................

उकलतच, बदलतच वगैरे जरा अडखळल्यासारखं होतय.
सहज सुंदरता वाटत नाहीये हे माझं प्रामाणिक मत. माझ्याकडून ४ गुण.

अर्थ सुंदर आहेत शेरांचे.
तो 'च' पण उगीच नाहीये. व्यवस्थित वापरलाय. पण तरीही गेयता कमी झालीय त्यामुळं.

वृत्त बरोबर असलं तरी शब्द चपखल बसत नसल्याने थोडं विस्कळित वाटत. ४ मार्क्स

मात्रांचा हिशोब योग्य असेल तरी लय सापडत नाही असं पुन्हा पुन्हा वाचूनही वाटलं. माझ्या मते ४ गुण.
-सतीश

पोथ्यापुराणाचा शेर आवडला. बाकी ठिकाणी जास्त 'च च' झाले आहे.
माझे गुणः २

पहीले २ खूप आवडले..
बाकी काही ठीकाणी प्रथम वाचताना च ने अडखळायला होतंय.. पण पुन्हा वाचले की मजा येतेय..
६ गुण

वाचताना थोड गद्य वाटत.
आशय छान. चक्रव्युहाचा शेर छान आहे.
गुण ५

२/१०

काफियामधला 'च' नाही आवडला.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

Pages