प्रवेशिका - ६ ( jayavi - तू दिलेल्या वेदना... )

Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 00:00

मित्रहो,
ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.
तर सादर आहे आजची प्रवेशिका....

तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही

भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
आजही का आग प्रतिकारात नाही

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

उंबर्‍याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है.. एकदम खास झालीये ही गझल.. Happy

गुण देईनच नंतर पुन्हा वाचुन पण प्रथमदर्शनी एकदम आवड्ली ही गजल..

तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही

वा वा! मतला आवडला!!
४ गुण

मस्तच!! आवडली.
गुण? - मीच शिकायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे... Happy

पुढील गझलेसाठी शुभेच्छा!

नंदीनीची गझल आहे का ही.. नाव आले तसे म्हणून वाटले. तसे जर असेल तर नियमांचे उल्लघंन केले म्हणून १ गुण कापत आहे, तसे जर नसेल तर १ गुण कापू नका अशी का.शा. ला विनंती:

१) गझलेचा आशय - १ गुण
२) शैली - १ गुण
३) शब्दरचना - १ गुण
४) प्रवाह - १ गुण
५) शेर - १ गुण
============
ऐकूण - ५ गुण

जर नंदीनीची गझल असेल तर ४ गुण, नसेल तर ५ गुण.

मतला छान.

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

सहा गुण.

बी, Happy
आवडलीच ही गझल. मतला छानय. नशा आवडला आणि झोळीचा अगदी खास.
... आसवे दारात नाही(त)?
माझे ५
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही>>>

वाह! मस्त गझल!
७ गुण

-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

बी
माझी गझल अस्ती तर मक्त्याचा शेर शेवटी आला असता....

पण एकूणच नंदिनीला भोगण्याचा शाप हे डोक्यावरून गेले. कुणी त्यामागचा संधर्भ सांगू शकेल का?

गुण आठ
--------------
नंदिनी
--------------

मतला... क्या बात है!
नशा... आवडला!
छानय गजल.. एकंदरीत आवडली.

मक्ता सुंदर....
जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही
हा ही आवडला...
आसवे दारात नाहीत अधिक बरोबर नाही का?

माझे गुण - ४

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही

सुरवात खुपच छान!!!

८ गुण..

७ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

छान आहे गझल..

गुण - ४

प्राजु

मतला आणि झोळी हे शेर मस्त!!
नंदिनी शेर कळला नाही. गांडीव शेर अस्पष्ट वाटतोय. आसवे "नाहीत" हवे - आनंदयात्रीशी सहमत.
माझे गुण - ५

मतला सहीय.
>> भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
नंदिनी म्हणजे मुलगी. त्यामुळं स्त्रीला हा शाप आहे असं असावं ते. तसं असेल तर हाही शेर सुरेख आहे.

नशा हा एकच शेर खूप आवडला.
खरंच कुणीतरी नंदिनीचा संदर्भ सांगावा.
(कदाचित का.शा. चालक सांगू शकतील म्हणजे कुणाची ओऴख पटणे नको)

मतला आवडला..
६ गुण..

मतला सुंदर---६ गुण

>>>> नंदिनी म्हणजे मुलगी. त्यामुळं स्त्रीला हा शाप आहे असं असावं ते.

हा संघमित्रा यांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे. Happy

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

एकदम खास! ७ गुण.

मी एक्दम नवखी आहे गजल ह्या प्रांतात पण ही गजल भिडली
६ गुण.

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

मस्त.

गुणः ६

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

छान आहेत

५ गुण

जिवन म्हणजे एक झोळी असा अर्थ घेते.
एकंदरीत लाचार आणि उपेक्षित जगण्याचे चित्रण चांगले जमले आहे.

उंबर्‍याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

छान.

सहजसुलभ, अर्थपूर्ण. ८मार्क्स

गांडीवाच्या शेरात 'तुजला' म्हणजे कोणाला? आसवांचा पण कळला नाही.
बाकी आवडले. शेवटचा छान.

५ गुण.

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

हे शेर छानच आहेत. मात्र संघमित्रा आणि कार्यशाळेनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही 'नंदिनी' चा शेर नाही कळला.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश

१, ४, ५, ६ छान शेर आहेत. फक्त पहिला शेर शेवटी हवा होता असे वाटते.

गुण - ६

Pages