Submitted by रसप on 28 September, 2012 - 15:57
मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर
तुझ्याचसाठी शब्द जन्मला 'नितांतसुंदर'!
क्षितीज म्हणजे भास असावा, मला न वाटे
तुला पाहण्यासाठी झुकते खाली अंबर
प्रचंड दुखते हृदयामध्ये तुला पाहता
पण आवडतो उरामधे शिरलेला खंजर !
सारी दुनिया त्याची जिंकुन झाली होती
तुला भेटला नव्हता कारण कधी सिकंदर
तुझ्यात हरवुन 'जीतू' लिहितो कविता - गझला
वेडी दुनिया म्हणते त्याला 'मस्त कलंदर' !
....रसप....
२८ सप्टेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/blog-post_29.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
jitoobhaay too mast gazal
jitoobhaay too mast gazal karatos nehamee

hyaa gazalelaa shambhar pikee shambhar nambar
रणजीत! छान आहे गझल!
रणजीत!
छान आहे गझल! आवडली!
तुझा व तुझ्या शेरांचा आदर करून, मला खटकलेल्या काही बाबींचा उल्लेख करतो.
मी दिलेल्या ओळी तुझ्या शेरांना पर्यायी नाहीत. फक्त मला ज्या गोष्टी खटकल्या, त्या कशा काढता याव्यात, ते मी नमूद करत आहे. गैरसमज नसावा.
मतला...........शेर नंबर १...........
नितांत सुंदर! अभिनंदन!!
शेर नंबर २..............
‘क्षितीज’ असा शब्द नाही. ‘क्षितिज’ असा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे आकाश जेथे जमिनीस लागलेले दिसते ती वर्तुळाकार मर्यादा. तो एक नजरेचा भासच असतो. तरीही त्यात तुला दिसलेले काव्य हे निश्चितच हृद्य आहे.
क्षिति असा मूळ संस्कृत शब्द आहे(स्त्री) ज्याचा अर्थ आहे पृथ्वी.
क्षितिसमांतर म्हणजे आडवा, horizontal.
क्षितीश असा शब्द आहे ज्याचा अर्थ आहे राजा किंवा भूपती.
झुकणे म्हणजे वाकणे, ज्यात ‘खाली’ शब्दाची शेड आहेच, म्हणून झुकणे शब्द आल्यावर परत वेगळा ‘खाली’ शब्द मला आनावश्यक वाटतो.
क्षितिजाचा शेर असा करता येईल.............
क्षितिजालाही तुझाच पडला मोह असावा!
तुला पाहण्यासाठी बहुधा झुकते अंबर!!
शेर नंबर ३..........
पहिली ओळ सुंदर!
दुस-या ओळीच्या अभिव्यक्तीची उंची वाढवता यावी.
असे करता येईल...........
हृदयामध्ये प्रचंड दुखते, तुला पाहता.........
तरी वाटतो हवाहवासा उरास खंजर!
खंजरावरून माझा एक खूप जुना मतला आठवला, जो मी माझ्या अगदी उमेदवारीच्या काळात लिहिला होता...........
तुझे पाहणे पाहणा-यास जाळी!
तुझ्या लोचनी खंजिराची झळाळी!!
शेर नंबर ४..........
जिंकुन.........जिंकून असे हवे.
‘त्याची’ शब्द उला मिस-यात असताना, ‘तुला’ शब्द सानी मिस-यात अप्रस्तुत वाटतो.
असे करता येईल.........
त्याला वाटे दुनियेला जिंकलेच त्याने....
त्यास भेटला नव्हता कारण कधी सिकंदर!
शेर नंबर ५...........
‘हरवुन’.......... ‘हरवून’ असे हवे.
असे करता यावे...........
दंग राहुनी तुझ्यात, लिहितो ‘जीतू’ गझला!
वेडी दुनिया म्हणते त्याला ‘मस्त कलंदर’!!
...........प्रा.सतीश देवपूरकर
..............................................................................................
आये हाये..... मस्तच गज़ल
आये हाये..... मस्तच गज़ल रणजित......!!
नितांतसुंतर तर नितांतसुंदरच झालाय शेर...
दुसराही आवडला, खंजरही छान (कॉलेजमधल्या टपोरीचा फील आलाय खंजर ला जर्रास्सा ..)
सिंकदर तर महामस्त झालाय..
थोडक्यात, गजल insightful झालीये, शुभेच्छा!
मधुमेह्यांची गझल
मधुमेह्यांची गझल
पहिला आणि तिसरा शेर खुप आवडला
पहिला आणि तिसरा शेर खुप आवडला
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार !
प्रोफेसर साहेब,
बहुतेक जी गझल तुम्हाला आवडते, त्या प्रत्येक गझलेला आपला काही तरी टच देण्यासाठी तुमचि सृजनशक्ती तुम्हाला भरीस पाडत असावी !
असो !
शेरनिहाय बोलतो.
मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर
तुझ्याचसाठी शब्द जन्मला 'नितांतसुंदर'!
धन्यवाद हा माझा मतला आवडल्या बद्दल !
माझा दुसरा शेर -
क्षितीज म्हणजे भास असावा, मला न वाटे
तुला पाहण्यासाठी झुकते खाली अंबर
तुमचा पर्यायी शेर -
क्षितिजालाही तुझाच पडला मोह असावा!
तुला पाहण्यासाठी बहुधा झुकते अंबर!!
र्हस्वाचा दीर्घ करू नये, हे आपले म्हणणे पूर्णपणे मान्य. (मी असं अजिबात सांगायचा वा सिद्ध करायचा यत्न करणार नाही की क्षितिज आणि क्षितीज हे दोन्ही बरोबर..!) परंतु, आपण दिलेल्या पर्यायी शेरात विचार बदलतो आहे. किंबहुना आपल्या दोन्ही मिसर्यांतून 'क्षितिज (हे नसतंच, त्यामुळे अंबरच) तिला पाहून भारावून गेल्याचाच विचार मांडलेला दिसतो. माझ्या शेरात मी 'क्षितिज हा आभास आहे' हे सत्य नाकारण्याचा जो वेडेपणा करतो आहे, तो दिसत नाही... म्हणून आपण सुचविलेला हा पर्याय नामंजूर आहे. 'क्षितीज' चं 'क्षितिज' करता येईल का? - ह्यावर मी स्वतंत्र विचार नक्की करीन.
माझा शेर -
प्रचंड दुखते हृदयामध्ये तुला पाहता
पण आवडतो उरामधे शिरलेला खंजर !
तुमचा पर्यायी शेर -
हृदयामध्ये प्रचंड दुखते, तुला पाहता.........
तरी वाटतो हवाहवासा उरास खंजर!
पहिल्या ओळीतील शब्दांचे मागे-पुढे करणे अनावश्यक वाटते.
पण दुसरी ओळ मात्र आवडली ! कारण, एकदा 'मध्ये' अन एकदा 'मधे' अशी सूट मला टाळता येईल. आणि जरा भरीचा वाटणारा 'पण'सुद्धा टाळता येईल.
ह्यावर मी सकारात्मक विचार करीन..!
माझा शेर -
सारी दुनिया त्याची जिंकुन झाली होती
तुला भेटला नव्हता कारण कधी सिकंदर
तुमचा पर्यायी शेर -
त्याला वाटे दुनियेला जिंकलेच त्याने....
त्यास भेटला नव्हता कारण कधी सिकंदर!
माझा शेर खूपच वेगळा आहे आणि तुमचा खूपच वेगळा. अगदी पूर्व-पश्चिम !
आधी माझ्या शेराचा अर्थ सांगतो.... "तो सिकंदर ज्याने अख्खी दुनिया जिंकली होती, तो तुला कधी भेटलाच नाही ना..! म्हणून हरला नव्हता ! तुला भेटला असता तर पाहताक्षणीच हरला असता ना !'
'जिंकुन' व 'जिंकून' असे दोन्हीही उच्चार आपण करत असतो. उच्चारानुरूप अशी सूट घेणे मला स्वतःला गैर वाटत नाही.
माझा शेर -
तुझ्यात हरवुन 'जीतू' लिहितो कविता - गझला
वेडी दुनिया म्हणते त्याला 'मस्त कलंदर' !
तुमचा पर्यायी शेर -
दंग राहुनी तुझ्यात, लिहितो ‘जीतू’ गझला!
वेडी दुनिया म्हणते त्याला ‘मस्त कलंदर’!!
पुन्हा - 'हरवुन' आणि 'हरवून' असे दोन्हीही उच्चार आपण करत असतो. उच्चारानुरूप अशी सूट घेणे मला स्वतःला गैर वाटत नाही.
पहिल्या ओळीत तुम्ही फक्त 'गझला' म्हटलं आहे, ते शेराच्या आशयाला मर्यादित करतं असं मला वाटतं. मला तिथे 'कविता' आणि 'गझला' दोन्हीही म्हणायचंच आहे.
================================================================
प्रोफेसर साहेब,
आपल्या पर्यायी शेर देण्याबाबत काहीही हरकत नाही, पण तसा देताना आपण मूळ शेरातील आशयाला धक्का न लावता दिल्यास(च) आपली सुचवणी (शिकवणी) अधिक उपयोगी होईल, हे मागे एकदा बेफिजींनीही आपणांस सांगितले होते. कृपया त्यावर विचार करावा.
धन्यवाद !
....रसप....
(मी असं अजिबात सांगायचा वा
(मी असं अजिबात सांगायचा वा सिद्ध करायचा यत्न करणार नाही की क्षितिज आणि क्षितीज हे दोन्ही बरोबर..!) <<<
म्हणून आपण सुचविलेला हा पर्याय नामंजूर आहे. <<<
या जमीनीतल्या नव्हेत, पण
या जमीनीतल्या नव्हेत, पण बर्यापैकी ध्वनीसाधर्म्याच्या माझ्याही दोन जुन्या गझला येथे प्रकाशित करू इच्छितो, म्हणजे स्वतंत्रपणे!
>>मधुमेह्यांची गझल << म्हंजी
>>मधुमेह्यांची गझल <<
म्हंजी काय वो बेफिजी ?
जितूची खास गझल...
जितूची खास गझल...
अभिनंदन....!!!
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त गझल. आवडली.
विपू केली आहे रसप
विपू केली आहे रसप
अप्रतिम गझल... मनात येते हेच
अप्रतिम गझल...
मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर
तुझ्याचसाठी शब्द जन्मला 'नितांतसुंदर'!
क्षितीज म्हणजे भास असावा, मला न वाटे
तुला पाहण्यासाठी झुकते खाली अंबर
प्रचंड दुखते हृदयामध्ये तुला पाहता
पण आवडतो उरामधे शिरलेला खंजर !
सारी दुनिया त्याची जिंकुन झाली होती
तुला भेटला नव्हता कारण कधी सिकंदर
वरील चारही शेर सुंदर झाले आहेत..
मतला तर चार चांद लावतो या गझलेला....अफाट....
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अप्रतिम. आवडली.
अप्रतिम.
आवडली.
सिंपली ग्रेट...! आवडलीच गझल!
सिंपली ग्रेट...!
आवडलीच गझल!
मक्ता थोडा कमी वजनदार वाटला रणजित इतर शेरांच्या तुलनेत (वै.म.)
-सुप्रिया.
रणजीत भौ !!!! मार डाला ...
रणजीत भौ !!!!
मार डाला ... एकदम भारी गझल .. अपने को तो आवड्या !!!! म्हणजे कायम लक्षात राहील अशी गझल आहे आहे.
मक्ता ताकदीचा आहे. आय मीन .. नाजूक ताकदीचा !!!
क्षितीज म्हणजे भास असावा, मला न वाटे
हि ओळ
मला न वाटे क्षितीज म्हणजे भास असावा
अशी जास्त छान वाटली असती. पण एकंदरीत शेर अफाट आवडला.
प्रचंड दुखते हृदयामध्ये तुला पाहता
हि ओळ थोडी "हार्ड" वाटली. प्रचंड दुखते ??? म्हणजे भावना कळल्या पण ... काहीतर बदल करून बघ .. म्हणजे बदल सुचला तर कर , खयाल उत्तम आहे .. तो मात्र बदलू नकोस.
सगळेच शेर आवडले मित्र ... तुम्हारे लिये एक शेर पेश है ...
तुझ्या सारखा "जीतू" कधीच झाला नाही
तुझ्या सारखा "जीतू" नाही होणे नंतर
शुभेच्छा
आकाश
अवांतर : माझ्या कडे कुठलाही
अवांतर :
माझ्या कडे कुठलाही मराठी शब्दकोश नाही. जेव्हा मला एखादा शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने कसा लिहावा असा प्रश्न पडतो तेव्हा मी महाराष्ट्र टाइम्स च्या वेब साईट वर तो शोधतो ( ह्रस्व / दीर्घ - उलट सुलट करून ). याचा अर्थ वृत्तपत्र कायम बरोबर असतात असे नाही. पण जनरल आयडिया मिळते.
क्षितीज मधे "ती" दुसरी आहे असे माझे मत आहे.
महाराष्ट्र टाइम्स वरचे रिझल्ट
क्षितिज - ६५९
क्षितीज - ८८८
म्हणजे बरेच कनफ्युजन आहे .. पण "ती" चा उच्चार मी तरी दीर्घ करतो.
आकाश
छान आहे गझल! आवडली!
छान आहे गझल! आवडली!
सुंदर गझल,अभिनंदन रसप.
सुंदर गझल,अभिनंदन रसप.
मस्त गझल. गोग्गोड ! पहिले
मस्त गझल. गोग्गोड !
पहिले दोन शेर जास्त आवडले.
'क्षितिज' योग्य शब्द आहे. त्यामुळे आमचाही पर्यायी शेर- (देवपूरबग बाईट्स मी. ;))
क्षितिजाला आभास समजणे मला न पटते
झुकत असावे तुला पाहण्यासाठी अंबर !