साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]
साहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219
![rangoli7b.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u410/rangoli7b.jpg)
नमस्कार सुजनहो !
चराचराला उजळून टाकणार्या दिव्यांच्या उत्सवासोबतच दरवर्षी येतो शब्दब्रह्माचाही उत्सव.. मायबोली हितगुज दिवाळी अंकाच्या रूपात!!
दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या मायबोलीच्या परंपरेचं हे तेरावं वर्ष! यावर्षीदेखील एक अभिरुचीपूर्ण आणि बहारदार अंक सादर करण्याचा संपादक मंडळाचा संकल्प आहे. साथ हवी आहे ती तुमच्या उत्साहाची, कलात्मकतेची आणि रसिकतेची...
श्रीगजाननाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आवडत्या विषयावर लिहायला सुरुवात केली असेलच. त्याच्या जोडीला तुमच्या विविध कलागुणांना नवीन, खास दालनं खुली करुन देण्यासाठी संपादक मंडळ तुमच्यासमोर मांडत आहे काही संकल्पना...
'ऋतू आणि जाणिवा'
विविध ऋतूंच्या रूपात आपल्याला भेटणारा किमयागार निसर्ग.. आणि ह्या ऋतूंची आपल्या मनावर उमटणारी अगणित प्रतिबिंबं. कुठे नवीन प्रेमाचा पहिला पावसाळा, तर कुठे मैत्रीची ऊब शोधणारी कुडकुडती थंडी. देशोदेशींचे रंगीबेरंगी स्प्रिंग-फॉल्स, मोठाल्या साम्राज्यांनी अनुभवलेले उन्हाळे-पावसाळे, नात्याची नाजूक ओलसर पालवी, तर कधी निष्पर्ण फांद्या. कधी मनात होणारी शिशिराची पानगळ, तर कधी ग्रीष्माच्या लाहीतही तनामनात तेवणारे हेमंतातले लक्ष लक्ष दीप.
'ऋतू आणि जाणिवा' या संकल्पनेअंतर्गत येऊद्या तुमच्या मनातले ऋतू शब्दांत सजून.. अन् उलगडू द्या प्रत्येक ऋतूबरोबर तुमच्या मनात उमटलेल्या जाणिवांचे असंख्य पदर!
'छंद माझा आगळा'
तिकिटांपासून ते माणसं जमवण्यापर्यंत, रेखाटनापासून ते पर्यटनापर्यंत, भांडी बनवण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली सोबत करणारे हे विविध छंद! प्रसंगी निराशेच्या गर्तेतून वर काढणारे, अनोळखी लोकांशीदेखील तुमची सहज ओळख करून देणारे, आयुष्याच्या कातरवेळी जिवलग स्नेह्यासारखे तुमची साथ करणारे, कधी कळत-नकळत तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन होणारे, माणसं जोडणारे, तर कधी चक्क या वेडापोटी माणसं तोडणारे... छंद!
अनेक रुपांत मनातल्या सर्जनाची ज्योत तेवत ठेवणारा तुमचा छंद आणि त्याचं तुमच्या आयुष्यातलं स्थान यांची ओळख करुन द्या रसिक वाचकांना.. 'छंद माझा आगळा' ह्या संकल्पनेच्या माध्यमातून!
रसिकहो, मायबोलीच्या दिवाळी अंकात तुमच्या जोडीनं तुमचे आजीआजोबा, आईवडील, मुलं, मित्रपरिवार या सगळ्यांना सामील करून घ्यायला आवडेल ना?
मग मांडा त्यांच्यासमोर परिसंवादाचा विषय 'तं तं तंत्रज्ञानाचा' ! जाणून घ्या त्यांची मतं आणि आम्हांलाही सांगा.
सात वर्षांच्या नातीचं सहजतेनं आयपॅड वापरणं असो की सत्तर वर्षांच्या आजोबांचं उत्साहाने व्हिडीओचॅट करणं असो, 'वाढता वाढता वाढे' म्हणत वेगानं अवघ्या विश्वाला व्यापणारं तंत्रज्ञान आज तुमच्या-आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलं आहे. नवनवीन आधुनिक साधनांनी सुलभ-सुकर केलेलं 'टेकी' आयुष्य जगत, 'ग्लोबल व्हिलेज'चे नागरिक म्हणून आपण समाधानी होत आहोत की कुठेतरी मनःशांती हरवत चाललो आहोत? आपल्या माणसांबरोबरचे विसाव्याचे चार क्षण, आपले आरोग्य, कमावतो आहोत की गमावतो आहोत? या आणि अशा नव्या युगाच्या विषयावरचे, तुमचे अन् तुमच्या घरातल्या जुन्या-नव्या पिढीचे विचार आमच्यापर्यंत पोचवा 'तं तं तंत्रज्ञानाचा' ह्या परिसंवादाच्या रुपात!
हितगुज २०१२ दिवाळी अंकासाठी तुमच्या आवडीच्या विषयांबरोबरच या संकल्पनांवर आधारित कथा / कविता / गझल / ललितलेखन / व्यंग्यचित्र / विनोदी लेखन / चित्रकला / प्रकाशचित्रे / हस्तकला / बालसाहित्य असे कुठल्याही स्वरुपातील साहित्य पाठवायचे आहे.
'दिवाळी संवाद' म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून सुप्रसिद्ध लोकांच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याची संधी! या अंकातही तुम्ही प्रतिभावान व्यक्तींची ओळख वाचकांना करून देऊन अंकाची रंगत नक्कीच वाढवू शकता. फक्त त्याआधी तुम्हांला संपादक मंडळाला त्या व्यक्तीचे नाव, कार्याचे स्वरुप याची माहिती कळवायची आहे व मुलाखतीसंदर्भात मंडळाची परवानगी घ्यायची आहे.
आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]
काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आम्हाला इथेच अथवा sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर जरूर संपर्क करा. संपादक मंडळ तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.
आपल्या संदर्भाकरिता खालील दुव्यांवर असलेली माहिती नक्कीच वाचनीय आहे.
१. हितगुज दिवाळी अंक २०१२ नियमावली
गुणीजनहो, चला मग... आता उत्साहाने सुरुवात करा दिवाळी अंकासाठी लेखन करायला!
आपले नम्र,
संपादक मंडळ, हितगुज दिवाळी अंक २०१२
---------------------------------------------------
दिवाळी अंकाच्या घोषणेसाठी प्रकाशचित्र वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल नंद्याचे संपादक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार.
मायबोलीकरांनी केलेल्या विनंतीला मान देऊन साहित्य पाठवण्याची कालमर्यादा आम्ही एका आठवड्याने वाढवत आहोत.
साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]
साहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219
बादवे दिवाळी अंक कधी प्रकाशित
बादवे दिवाळी अंक कधी प्रकाशित होणार?
धन्यवाद संपादक
धन्यवाद संपादक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपादक वेळ वाढवून मिळु शकेल
संपादक वेळ वाढवून मिळु शकेल का एखाद आठवडा? प्लीज.
नमस्कार, 'छंद माझा आगळा' यात
नमस्कार,
'छंद माझा आगळा' यात लिहिण्यासाठी "लेखन प्रकार" कोणता निवडू? ललित ?
तसेच मी आता आपण दिलेल्या दुव्यावर लेख टाकायचा प्रयत्न केला. काहीतरी गडबड झाली. एरर आली. माझा लेख तिथे जमा झाल की नाही कळत नाहीये. कृपया सांगाल का? मी तो अपूर्ण म्हणून सेव्ह करत होते. आता मी तो शोधते आहे, परंतु माझ्या लेखनात ( इथे वा विषेश मायबोलीवरही - पाऊलखुणात) दिसत नाहीये. तो सेव्हच झाला नाही का? कृपया मदत करा.
धन्यवाद.
नमस्कार अवल. तुम्ही ललित
नमस्कार अवल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही ललित लेखनप्रकारात लेख टाकू शकता. तुमचा लेख बहुतेक सेव्ह झाला नाहीये, कारण आलेल्या लेखनात तशी नोंद नाही. त्याचबरोबर लेख सुपूर्त झाल्यावर तुम्हालाही पोचपावतीची नोंद येते. परत एकदा सुपूर्त कराल का कृपया? धन्यवाद.
धन्यवाद. पुन्हा करते
धन्यवाद. पुन्हा करते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमस्कार रैना. आपला प्रस्ताव
नमस्कार रैना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपला प्रस्ताव मंडळाकडे विचाराधीन आहे. लवकरच त्यादृष्टीने आपल्याशी संपर्क साधला जाईल.
धन्यवाद.
आपली मेल वाचूनही गाफिल होते
आपली मेल वाचूनही गाफिल होते कारण थोडा नेटचा गोंधळ आमच्याइथे होता.गेले काही दिवस असेच गेले. आता अचानक शेवटची तारीख जवळ आल्याचे जाणवले. प्रयत्न करेनच.इतक्या गडबडीत ऋतू मनांचे, जाणिवांचे यावरच लिहिणे जमेल..
खूप आभार अन अनेक शुभेच्छा सुंदर निर्मितीसाठी. उत्सुकतेने वाट पाहेन अंकाची.
बेफिकीर यांच्या आजारपणाबद्दल या प्रतिसादांमधून कळले.त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना.
मायबोलीकरांनी केलेल्या
मायबोलीकरांनी केलेल्या विनंतीला मान देऊन साहित्य पाठवण्याची कालमर्यादा आम्ही एका आठवड्याने वाढवत आहोत.
साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]
साहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219
रैना तै चला कामाला लागा, मुदत
रैना तै चला कामाला लागा, मुदत वाढ मिळालेय आता तुमचा सहभाग असायलाच हवा
दिवाळी अंकात तुझं लिखाण वाचायला आवडेल मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीकरांकडून दिवाळी
मायबोलीकरांकडून दिवाळी अंकाविषयी अपेक्षा सूचना असा एक बाफ काढला होता आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. तर त्यातल्या कोणत्या सूचना अपेक्षा विचाराधीन आहेत किंवा साकार होणार आहेत यावर कुठे जाहीर केले आहे का संपादक मंडळाने? नसेल तर माझ्याप्रमाणेच अनेकांना उत्सुकता असेल.या दिवाळी अंकाची नवीन वैशिष्ट्ये काय असतील वगैरे.शिवाय दिवाळी अंकाची जाहिरात / टीझिंग कँपेन म्हणूनही ते वापरता येईल असे वाटते.
धन्यवाद संपादक-मंडळ
धन्यवाद संपादक-मंडळ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद संपादक मंडळ. कविता-
धन्यवाद संपादक मंडळ.
लिही.
कविता- मुदतवाढ तुलाही लागू आहे
हा अंक नेट वर च प्रसिद्ध
हा अंक नेट वर च प्रसिद्ध होणार आहे की त्याचे कागदी अंक बनणार आहेत का? म्हणजे हे साहित्य केवळ इलेक्ट्रॉनिक मिडिया मार्फतच प्रसिद्ध होईल की प्रिंट मिडिया मार्फत पण प्रसिद्ध होणार आहे?
नमस्कार साधना. मायबोलीचा
नमस्कार साधना.
मायबोलीचा दिवाळी अंक नेट वर प्रसिद्ध होतो आणि त्याची पीडीएफ फाईलही बनवली जाते. ही पीडीएफ फाईल तुम्ही डाऊनलोड करुन, प्रिंट करून वाचू शकता. पण आपण मायबोलीतर्फे कागदावर अंकाच्या प्रती छापत नाही. तुम्हाला अजून काही शंका असतील तर नि:संकोचपणे संपादकांना ई-मेल ने संपर्क करा किंवा विचारपूशीत निरोप ठेवा. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
सर्व मायबोलीकरांना नम्र
सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती...तुमचे लिखाण मायबोलीच्या दिवाळी अंकात समाविष्ट करण्यासाठी संपादक मंडळाकडे जरूर पाठवा. तुमच्या विनंतीला मान देऊन साहित्य पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. तेव्हा कृपया 'अंकाकडून तुमच्या काय अपेक्षा' आहेत त्या जितक्या हक्काने आणि आपुलकीने संपादक मंडळाला कळवल्यात, त्याच आपलेपणाने, हक्काने तुमचे साहित्यही संपादकांना पाठवा.
शेवटी मायबोलीचा अंक वाचनीय आणि दर्जेदार होण्यात तुमच्या साहित्याचाच सर्वात महत्त्वाचा वाटा असणार आहे...
नमस्कार
नमस्कार आशूडी.
मायबोलीकरांच्या अंकाविषयी अपेक्षा ध्यानात घेऊन, त्यात तांत्रिकदृष्ट्या आणि इतरही बाबतीत जितकं शक्य आहे तितकं काम करायचा संपादक मंडळ मनापासून प्रयत्न करत आहे.
अंकाचं स्वरूप जसजसं साकार होत जाईल, तसं तसं 'एखाद्या मुद्द्याच्या' जाहिरातीसाठी वापर करण्याच्या तुमच्या सूचनेचा नक्की विचार होईल.
धन्यवाद.
मी गूढकथा लिहीत आहे. दिवाळी
मी गूढकथा लिहीत आहे. दिवाळी अंकासाठी गूढकथेचा विचार होऊ शकतो का?
pradyumnasantu, दिवाळी
pradyumnasantu, दिवाळी अंकासाठी सर्व प्रकारच्या साहित्याचे स्वागत आहे.
आपण लिहित असलेली गूढकथा लवकरात लवकर पूर्ण करून जरुर संपादक मंडळाला पाठवावी ही नम्र विनंती.
संपादक, भारतीय वेळेनुसार
संपादक, भारतीय वेळेनुसार साहित्य स्विकारण्याची तारीख आणि वेळ सांगणार का?
मामी, शेवटच्या चेंडूवर षटकार
मामी, शेवटच्या चेंडूवर षटकार मारूनच सामना जिंकायचाय का?
हो ना. आमचं असंच ... दिवस
आमचं असंच ... दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात कापूस काती!
त्यातून पाचेक दिवस बाहेर चाल्लेय. केरळच्या देवभूमीत लिखाण करेन आणि मग इथे परत आल्यावर कीबोर्ड बडवेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, साहित्य पाठवण्याची
मामी, साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख भारतीय वेळेनुसार : सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२, दुपारी १२.३० पर्यंत.
दिवाळी अंकासाठी लिखाण नक्की पाठवावे ही मनापासून विनंती.
वा वा. जमेल जमेल. धन्यवाद
वा वा. जमेल जमेल. धन्यवाद संपादक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपादक, संपर्कातून एक मेल
संपादक, संपर्कातून एक मेल केली आहे.
शर्मिला, उत्तर पाठवले आहे.
शर्मिला, उत्तर पाठवले आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी आपल्या सूचनेप्रमाणे गेल्या
मी आपल्या सूचनेप्रमाणे गेल्या आठवड्यातच कथा पाठवली होती. कृपया कथा मिळाली का नाही हे कळवावे.
कथेचं नावं होतं 'दिशा' !
धन्यवाद!
-- श्रुती
नमस्कार abhishruti. तुमच्या
नमस्कार abhishruti.
तुमच्या कथेची पीडीएफ फाईल मिळालेली आहे. धन्यवाद.
मी त्या दुव्यावर आताच एक
मी त्या दुव्यावर आताच एक ललित पोस्ट केले पण नंतर जे पान उघडले त्यावर, तूम्हाला या पानावर जायची परवानगी नाही, असे लिहिलेय. ललित मिळाले असावे, ही अपेक्षा.
दिनेशदा, तुम्हाला लगेच इमेल
दिनेशदा, तुम्हाला लगेच इमेल आली असेल पहा
मला आली होती त्यावरूनच मला समजले की पोचला लेख
Pages