साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]
साहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219
नमस्कार सुजनहो !
चराचराला उजळून टाकणार्या दिव्यांच्या उत्सवासोबतच दरवर्षी येतो शब्दब्रह्माचाही उत्सव.. मायबोली हितगुज दिवाळी अंकाच्या रूपात!!
दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या मायबोलीच्या परंपरेचं हे तेरावं वर्ष! यावर्षीदेखील एक अभिरुचीपूर्ण आणि बहारदार अंक सादर करण्याचा संपादक मंडळाचा संकल्प आहे. साथ हवी आहे ती तुमच्या उत्साहाची, कलात्मकतेची आणि रसिकतेची...
श्रीगजाननाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आवडत्या विषयावर लिहायला सुरुवात केली असेलच. त्याच्या जोडीला तुमच्या विविध कलागुणांना नवीन, खास दालनं खुली करुन देण्यासाठी संपादक मंडळ तुमच्यासमोर मांडत आहे काही संकल्पना...
'ऋतू आणि जाणिवा'
विविध ऋतूंच्या रूपात आपल्याला भेटणारा किमयागार निसर्ग.. आणि ह्या ऋतूंची आपल्या मनावर उमटणारी अगणित प्रतिबिंबं. कुठे नवीन प्रेमाचा पहिला पावसाळा, तर कुठे मैत्रीची ऊब शोधणारी कुडकुडती थंडी. देशोदेशींचे रंगीबेरंगी स्प्रिंग-फॉल्स, मोठाल्या साम्राज्यांनी अनुभवलेले उन्हाळे-पावसाळे, नात्याची नाजूक ओलसर पालवी, तर कधी निष्पर्ण फांद्या. कधी मनात होणारी शिशिराची पानगळ, तर कधी ग्रीष्माच्या लाहीतही तनामनात तेवणारे हेमंतातले लक्ष लक्ष दीप.
'ऋतू आणि जाणिवा' या संकल्पनेअंतर्गत येऊद्या तुमच्या मनातले ऋतू शब्दांत सजून.. अन् उलगडू द्या प्रत्येक ऋतूबरोबर तुमच्या मनात उमटलेल्या जाणिवांचे असंख्य पदर!
'छंद माझा आगळा'
तिकिटांपासून ते माणसं जमवण्यापर्यंत, रेखाटनापासून ते पर्यटनापर्यंत, भांडी बनवण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली सोबत करणारे हे विविध छंद! प्रसंगी निराशेच्या गर्तेतून वर काढणारे, अनोळखी लोकांशीदेखील तुमची सहज ओळख करून देणारे, आयुष्याच्या कातरवेळी जिवलग स्नेह्यासारखे तुमची साथ करणारे, कधी कळत-नकळत तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन होणारे, माणसं जोडणारे, तर कधी चक्क या वेडापोटी माणसं तोडणारे... छंद!
अनेक रुपांत मनातल्या सर्जनाची ज्योत तेवत ठेवणारा तुमचा छंद आणि त्याचं तुमच्या आयुष्यातलं स्थान यांची ओळख करुन द्या रसिक वाचकांना.. 'छंद माझा आगळा' ह्या संकल्पनेच्या माध्यमातून!
रसिकहो, मायबोलीच्या दिवाळी अंकात तुमच्या जोडीनं तुमचे आजीआजोबा, आईवडील, मुलं, मित्रपरिवार या सगळ्यांना सामील करून घ्यायला आवडेल ना?
मग मांडा त्यांच्यासमोर परिसंवादाचा विषय 'तं तं तंत्रज्ञानाचा' ! जाणून घ्या त्यांची मतं आणि आम्हांलाही सांगा.
सात वर्षांच्या नातीचं सहजतेनं आयपॅड वापरणं असो की सत्तर वर्षांच्या आजोबांचं उत्साहाने व्हिडीओचॅट करणं असो, 'वाढता वाढता वाढे' म्हणत वेगानं अवघ्या विश्वाला व्यापणारं तंत्रज्ञान आज तुमच्या-आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलं आहे. नवनवीन आधुनिक साधनांनी सुलभ-सुकर केलेलं 'टेकी' आयुष्य जगत, 'ग्लोबल व्हिलेज'चे नागरिक म्हणून आपण समाधानी होत आहोत की कुठेतरी मनःशांती हरवत चाललो आहोत? आपल्या माणसांबरोबरचे विसाव्याचे चार क्षण, आपले आरोग्य, कमावतो आहोत की गमावतो आहोत? या आणि अशा नव्या युगाच्या विषयावरचे, तुमचे अन् तुमच्या घरातल्या जुन्या-नव्या पिढीचे विचार आमच्यापर्यंत पोचवा 'तं तं तंत्रज्ञानाचा' ह्या परिसंवादाच्या रुपात!
हितगुज २०१२ दिवाळी अंकासाठी तुमच्या आवडीच्या विषयांबरोबरच या संकल्पनांवर आधारित कथा / कविता / गझल / ललितलेखन / व्यंग्यचित्र / विनोदी लेखन / चित्रकला / प्रकाशचित्रे / हस्तकला / बालसाहित्य असे कुठल्याही स्वरुपातील साहित्य पाठवायचे आहे.
'दिवाळी संवाद' म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून सुप्रसिद्ध लोकांच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याची संधी! या अंकातही तुम्ही प्रतिभावान व्यक्तींची ओळख वाचकांना करून देऊन अंकाची रंगत नक्कीच वाढवू शकता. फक्त त्याआधी तुम्हांला संपादक मंडळाला त्या व्यक्तीचे नाव, कार्याचे स्वरुप याची माहिती कळवायची आहे व मुलाखतीसंदर्भात मंडळाची परवानगी घ्यायची आहे.
आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]
काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आम्हाला इथेच अथवा sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर जरूर संपर्क करा. संपादक मंडळ तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.
आपल्या संदर्भाकरिता खालील दुव्यांवर असलेली माहिती नक्कीच वाचनीय आहे.
१. हितगुज दिवाळी अंक २०१२ नियमावली
गुणीजनहो, चला मग... आता उत्साहाने सुरुवात करा दिवाळी अंकासाठी लेखन करायला!
आपले नम्र,
संपादक मंडळ, हितगुज दिवाळी अंक २०१२
---------------------------------------------------
दिवाळी अंकाच्या घोषणेसाठी प्रकाशचित्र वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल नंद्याचे संपादक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार.
मायबोलीकरांनी केलेल्या विनंतीला मान देऊन साहित्य पाठवण्याची कालमर्यादा आम्ही एका आठवड्याने वाढवत आहोत.
साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]
साहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219
.
.
मस्त आहे संकल्पना.. छानच
मस्त आहे संकल्पना.. छानच होणार अंक!!
चांगले विषय आहेत. खुप काही
चांगले विषय आहेत. खुप काही दर्जेदार लिखाण वाचायला मिळणार याची खात्री आहे.
नियमावली एकदम कडक पण अगोदरच स्पष्ट केलेत ते उत्तम.
मस्त विषय
मस्त विषय
मस्त संकल्पना ! जाणिवा' >>
मस्त संकल्पना !
जाणिवा' >> हे जाणीवा हवंय का ?
आधारीत की आधारित ?
संदर्भाकरीता >> संदर्भाकरिता ?
भारी, मस्त होणार अंक
भारी, मस्त होणार अंक
जाणिवा, आधारित हे बरोबर
जाणिवा, आधारित हे बरोबर आहे.
संदर्भाकरिता
मस्त संकल्पना आहे. छान आहेत
मस्त संकल्पना आहे. छान आहेत विषय. अंक सर्वांगसुंदर होणार यात शंका नाही. अनेकानेक शुभेच्छा!
नंदूशेठ फोटो मस्त आहे!
बदल केले आहेत. चिनूक्स आणि
बदल केले आहेत.
चिनूक्स आणि मेधा धन्यवाद !
मस्त! आतापासून वाट पाहायला
मस्त! आतापासून वाट पाहायला लागलेयं या सुंदर चित्रामुळे.
संकल्पना आमच्यापर्यंत
संकल्पना आमच्यापर्यंत पोहोचवताना हा जो परिपाक शब्दांकित केला आहे, तोच इतका प्रचंड भावला आहे, की अंक सुंदर होणारच ह्यावर शिक्कामोर्तब झालेय..
मनःपूर्वक शुभेच्छा, टीम
तुमचे अन्म तुमच्या घरातल्या
तुमचे अन्म तुमच्या घरातल्या >>>> इथे अन्म ऐवजी अन् असे ह्वे ना?
अरे वा! छान संकल्पना!
अरे वा! छान संकल्पना!
सुरेख संकल्पना! बारक्या
सुरेख संकल्पना!
बारक्या रांगोळ्यांचा मस्त वापर केलाय खूप छान दिसताहेत त्या. फोटोही मस्तच!
मी पण यावर्षी लिहिणार. PDF
मी पण यावर्षी लिहिणार. PDF file पाठवू शकते का? कृपया कळवा. धन्यवाद!
-- श्रुती
संकल्पना आवडल्या. छंदांबद्दल
संकल्पना आवडल्या. छंदांबद्दल लिहीलेला परिच्छेद अतिशय भावला! तंतोतंत कंगोरे शोधले आहेत छंदांचे.
मस्तय.. शुभेच्छा !!
मस्तय.. शुभेच्छा !!
संकल्पना त्याच त्या जुन्या
संकल्पना त्याच त्या जुन्या पुराण्या वाटल्या. सत्तत माबोवर या बद्दल काहीनाकाही लिहिले जात असतेच.
लेख चांगले असावेत ही अपेक्षा. असो.
अंकाला शुभेच्छा.
abhishruti, आपण
abhishruti,
आपण http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1 इथे लेख पाठवू शकता. पीडीएफ फाईल स्वीकारु शकत नसल्याबद्दल क्षमस्व. लेख पाठवण्यात काही अडचण आल्यास इथे किंवा विचारपूशीत निरोप ठेवावा. धन्यवाद.
वा! मस्त संकल्पना. छान आहे
वा! मस्त संकल्पना.
छान आहे घोषणा.:-)
दिवाळी अंकाला मनःपूर्वक
दिवाळी अंकाला मनःपूर्वक शुभेच्छा
अनेक शुभेच्छा एका दर्जेदार
अनेक शुभेच्छा एका दर्जेदार निर्मितीसाठी..
सातीला अनुमोदन!
सातीला अनुमोदन!
अंकाला शुभेच्छा....
अंकाला शुभेच्छा....
काय मग मंडळी, आपल्या
काय मग मंडळी, आपल्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी लिखाण करायला सुरुवात केलीत ना?
तुमच्या मनातल्या कल्पना, विचार, अनुभव मांडण्यासाठी संपादक मंडळाने काही संकल्पना येथे तुमच्यासमोर ठेवल्या आहेत. परंतु तुमच्या प्रतिभेला संकल्पनांच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही.
वेगवेगळ्या विषयांवरचे वैविध्यपूर्ण साहित्य तुमच्याकडून संपादक मंडळाला मिळो आणि तुमच्या विचारांचे, कल्पकतेचे विविध रंग रसिकांना अनुभवायला मिळोत हीच या दिवाळी अंकामागची भूमिका आणि प्रेरणाही !
चला तर मग, उघडा मनाची कवाडं ! मुक्त करा तुमच्या विचारांना, कल्पनांना.. तुमच्या शब्दांतून, चित्रांतून, कलेच्या माध्यमातून...
दिवाळी अंकाच्या घोषणेसाठी प्रकाशचित्र वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल राहुल काशीकर यांचे संपादक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार.
माफ करावेत, प्रयत्न केला पण
माफ करावेत, प्रयत्न केला पण दीपावली अंकास शोभेलसे काही सुचत नाही आहे. विकांतात काही जमेल इतका वेळ मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे.
-'बेफिकीर'!
दिवाळी अंक नक्कीच छान होणार .
दिवाळी अंक नक्कीच छान होणार . वाट बघत आहे.
बेफीजिन्चा प्रतिसाद वाचून हे
बेफीजिन्चा प्रतिसाद वाचून हे समजले की सम्पादक स्वतः उतमोत्तम ..सर्वोत्तम तेच वाचायची सन्धी येत्या दिवाळी अन्कात आम्हाला मिळावी याकडे जातीने लक्ष आहेत ते !
त्याकरिता मनःपूर्वक आभार !! बेफीजिन्चेही व सम्पादक महोदयान्चेही
नमस्कार. दिवाळी अंकासाठी
नमस्कार.
दिवाळी अंकासाठी पाठवायच्या लेखात प्रकाशचित्रांची मायबोलीवरची लिंक ( खाजगी जागेतली) दिली तर चालेल ना? ( म्हणजे तसे टाकले तर चित्र दिसतील ना? )
तसेच Link href याच्यासाठी मायबोलीवर जी पद्धती अवलंबिली जाते तशीच वापरली तर चालेल ना ?
धन्यवाद
नमस्कार अवल. नेहमी नवीन
नमस्कार अवल.
नेहमी नवीन लेखनात ज्याप्रमाणे लिंका आणि चित्रे जोडता येतात, त्याचप्रमाणे दिवाळी अंकासाठीच्या एडिटरवरही टाकता येतील. जर काही अडचण आली तर नि:संकोचपणे संपादक मंडळाशी संपर्क साधा किंवा विचारपुशीत निरोप ठेवा. धन्यवाद.
Pages