Submitted by सावली on 26 September, 2012 - 07:59
"आई, माझ्याकडे सगळीच लहान मुलांची पुस्तके आहेत. आता मला मोठ्या मुलांची पुस्तके घेऊन दे."
"हे काय!? हे नको मला. खुप वेळा वाचुन झालंय माझं. आणि ते पण नको. मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, लहान मुलांचं !!"
असे संवाद तुमच्या घरी ऐकु येतात का? आमच्याकडे सुरु झालेत सध्या.
पुस्तके किती आणि कोणती विकत घ्यायची, पुन्हा ठेवायची कुठे हे प्रश्न आहेतच.
मग मला वाटले इथे आपण मुलांचा पुस्तक क्लब सुरु केला तर?
- महिन्यातुन एकदा किंवा जसे जमेल तसे एकत्र भेटुन मुलांची पुस्तके शेअर करायची.
- असलेल्या पुस्तकांची यादी इथे टाकायची. त्यातली कोणी मागतली कि भेटायच्या वेळी ती घेऊन यायची.
- जमेल तेव्हा प्रत्येकाने आपल्या संग्रहात भर घालायची.
- भेटल्यावर मुले बरोबर असतील तेव्हा कोणीतरी एखाद्या उतार्याचे वाचन करुन दाखवायचे.
- मराठी, इंग्रजी आणि हिंदी तिन्ही विषयातली पुस्तके शेअर करायची.
- वयोगट ३-६, ६-९ , ९-१५ असा काहीसा ठेवता येईल.
- एखाद्याचे पुस्तक फाटले / खराब झाले ( मुले असल्याने होणार) तर भरुन देणे / नीट करुन द्यायचे.
मी ठाण्यात रहातेय त्यामुळे सध्या ठाणे मुंबई परिसराबद्दलच बोलतेय. सुरुवातीला प्रयोग म्हणुन तरी सुरु करुन पाहुयात का? खरतर प्रत्येक शहरात सुरु करायलाही हरकत नाही.
तुमच्या सुचना आणि सल्लेही येऊद्यात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कल्पना खूपच छान आहे, सावली
कल्पना खूपच छान आहे, सावली
पण सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला तरच सुरु राहील. शुभेच्छा
मी तयार आहे.
मी तयार आहे.
मी तयार आहे सावली. मी ठाण्यात
मी तयार आहे सावली. मी ठाण्यात पोखरण रोड १जवळ रहाते.
माझ्याकडे इन्ग्लिश आणि हिन्दी पुस्तके आहेत.
माझी लेक ४ वर्षांची आहे.. त्यामुळे सगळी पुस्तके पंचतंत्र, कृष्णा, तेनाली अशी आहेत.
मी पण तयार आहे. ं मी ठाण्यात
मी पण तयार आहे. ं मी ठाण्यात नौपाड्याला राहाते.
मी पण तयार आहे. माझ्याकडे
मी पण तयार आहे. माझ्याकडे मराठी इंग्रजी पुस्तके, काही मॅजिक पॉटचे अंक पण आहेत
माझ्याकडील पुस्तके आणि सीडीज
माझ्याकडील पुस्तके आणि सीडीज तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर आणून देईन. ट्वीन्स, टीन फिक्षन व इतर पुस्तके आहेत. उपक्रमास शुभेच्छा.
मी लंगडी घालत तयार आहे.
मी लंगडी घालत तयार आहे. लगेच.... मी मुलुंडला असते.
खूपच चांगली कल्पना,
खूपच चांगली कल्पना, सावली.
मुलांना वाचायची आवड लागवी/गोडी निर्माण व्हावी, असं वाटत असेल, तर मुलं लहान असताना आपणच प्रयत्न केले पाहिजेत.
माझ्या नवर्याने सध्याच लहान मुलांसाठी खेळणी, पुस्तके आणि CDs ची लायब्ररी चालू केली आहे. तिथे असा अनुभव आहे की मुलं आणि आई-बाबा सुद्धा खेळणी आणि CDs जास्त पसंत (prefer) करतात. पुस्तकं म्हणलं की त्याला/तिला अजून कळत नाही, आम्हालाच वाचून दाखवावं लागेल, तर पुस्तकं नको...असं म्हणतात. आणि थोड्या मोठ्या मुलांचे पालक, तो/ती वाचत नाही अजिबात, काय करू अस विचारतात.
त्यामुळे, तुझी ही कल्पना नक्कीच स्तुत्य आहे. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांना वेगवेगळी पुस्तके वाचायला मिळतील आणि बाकीच्यांना गोडी निर्माण होण्यास मदत होइल.
पुण्यात असा पुस्तक क्लब सुरु करण्यात कोणी interested असेल, तर जागा आणि पुस्तकं पण भरपूर आहेत. (इंग्रजी व मराठी)
सॉलीड आयडिया..... माझी मुलगी
सॉलीड आयडिया.....
माझी मुलगी जबरदस्त वाचन वेडी आहे ( वय ११). आमच्या कडे लहान मुलांची पुस्तके होती ( साधारण ३०-४०) अत्ताच एका लायब्ररीला दिली आणि थोडी तिच्या शाळेतल्या लयब्ररीत दिली. तरीही ती वाचत नाही अशी अजुनही खुप पुस्तके आहेत. कारण आम्ही तिला कोणत्याही ऑकेजन ला फक्त आणि फक्त पुस्तकच भेट देतो. तसेच तिच्या वयोगटासाठी देखिल माझ्या कडे ३०-३५ पुस्तकं असतिलच... तसच एन्साक्लोपिडिया, डु यु नो, वगैरे माहिती पर ग्रंथ ही आहेत छोट्यांसाठी...
तिला ही आयडिया खुप आवडेल... मी लुइस वाडी ला (शेहेनाई हॉल पाठी) रहाते. हा क्लब जर शनिवारी ४ ते ६ या वेळात असेल तर फारच मज्जा. आर्थात इतर दिवशीही मला नाही जमलं तर ती एकटीही येवु शकते.
फक्त माझ्या कडे जी पुस्तकं आहेत ती फक्त इंग्रजीत आहेत.
मी पण. मी मुलुंडला असते. माझा
मी पण. मी मुलुंडला असते.
माझा मुलगा ४ वर्षांचा आहे.
माझ्याकडील पुस्तकांची यादी करुन इथे टाकेन.
मला पण आवडेल सहभागी व्हायला!
मला पण आवडेल सहभागी व्हायला! माझ्या ५ वर्षांच्या लेकाला पण प्रचंड गोडी लागलीये पुस्तकांची! दर आठवड्याला काय नविन वाचायला द्यायचे/ वाचून दाखवायचे हा प्रश्नच असतो.....
पण बोरीवलीहून कसे जमवावे?
माझ्या कडे सी.डीज पण खुप
माझ्या कडे सी.डीज पण खुप आहेत.....
अरे वा. बरेच जण आहेत तयार मी
अरे वा. बरेच जण आहेत तयार
मी पुस्तकांची यादी करुन इथे टाकते. दिवस आणि वेळ ठरवुयात.
मामी, तुमच्या मुलीच्या वयाचेही इथे कुणीतरी असेलच की. त्यांच्याबरोबर पुस्तके शेअर करता येतील.
हा धागा ठाणे ग्रुप मधे टाकलाय का आता? ओके.
कधी एकत्र यायचे असेल तर मला
कधी एकत्र यायचे असेल तर मला पण कळवा, सख्यांनो.
राजस आता ३ वर्षांचा आहे. सध्या तरी काही काही इंग्रजी अक्षरे ओळखणे इथपर्यंतच मजल आहे. पण चित्रांची रंगीत पुस्तके खूप आहेत.
सॉरी मुलींनो, इथे लिहिले आणि
सॉरी मुलींनो, इथे लिहिले आणि मला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही अशी परिस्थिती सध्या झालीये..
नोव्हे. पासुन चालु करुयात का? तारिख/वेळ मी प्लान करुन सांगते. पुस्तकांची लिस्टही लिहीते.
कसे आणि कुठे भेटायचे ठरवुयात याबद्दल तुमच्या आयडीया शेअर कराल का?
सगळ्यांचे प्रतिसाद बघुन खरोखर
सगळ्यांचे प्रतिसाद बघुन खरोखर धन्य वाटले. खुप कमी कुटुंबे अशी आहेत कि त्यात मुलांना वाचण्याची आवड आहे.
अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगीरी.
खुपच चांगली आयडिया...
खुपच चांगली आयडिया... पुण्यातही चालु करा ना म...
मी पण तयार आहे. मी मुलुंडला
मी पण तयार आहे. मी मुलुंडला रहाते. माझा मुलगा ५ वर्षांचा आहे. लवकरच पुस्तकांची यादी देइन. मी नुकतीच इथे आल्यामुळे थोडीच पुस्तक आहेत. आमचं शिप नी पाठवलेलं सामान आलं की भरपुर पुस्तकं येतील. सावली, हा उपक्रम सुरु केल्याबद्दल धन्यवाद. मी लायब्ररी लावली तेव्हाच मुलासाठी पण लायब्ररी मिळाली तर बरं असं वाटत होतं.
झाला का चालु?
झाला
का चालु?