Submitted by बेफ़िकीर on 25 September, 2012 - 11:16
भर युद्धात मलाच ढाल करतो त्याला भजावे कसे
देव्हार्यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
असते तेच कुटुंब ज्यात असते कोणी कुणाचेतरी
माझ्यातच जगतात लाखजण मी माझे बनावे कसे
म्हातारा ठरल्यामुळेच नुकता हे तंत्रही साधले
ज्यांना संशयही नसेल हृदयी त्यांना पहावे कसे
रक्तातून करून शेर भिडतो अवघ्या जगाला कवी
पांचाळे भिडतात ते जगत मी सच्चे म्हणावे कसे
प्रत्यक्षातच 'बेफिकीर' जगतो खोटा बनू मी कसा
आडोसाच असेल खुद्द व्यसनी तर शुद्ध व्हावे कसे
-'बेफिकीर'!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भर युद्धात मलाच ढाल करतो
भर युद्धात मलाच ढाल करतो त्याला भजावे कसे
देव्हार्यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
प्रत्यक्षातच 'बेफिकीर' जगतो खोटा बनू मी कसा
आडोसाच असेल खुद्द व्यसनी तर शुद्ध व्हावे कसे
>>>
वाह!
वा वा मस्त आहे ही तरही
वा वा मस्त आहे ही तरही बेफीजी
मतला ,दुसरा शेर , मक्ता ..........जाम आवडलेत !!
छान
छान
पांचाळे .. तो शेर समजला
पांचाळे .. तो शेर समजला नाही.
पांचाळे .. तो शेर समजला
पांचाळे .. तो शेर समजला नाही.
>>
+१
पाचांळेच माहित नाही मला काय असतं ते
तो शेर "हाण्तिच्यामारी !!"
तो शेर "हाण्तिच्यामारी !!" टाईप टोला आहे जामोप्या गझलनवाझ भीमराव पांचाळेना !!( वै म.गै न )
भीमराव पांचाळे गूगलून बघू शकता हवे तर !!
कळाळे ...
कळाळे ...
भीमराव पांचाळेंनी गायिलेल्या
भीमराव पांचाळेंनी गायिलेल्या गझला छाण आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे. गझल गाण्यात जे हवे ते त्यांच्यात आहे. हा गायक फारसा प्रसिद्ध का झाला नाही याचे नवल वाटते.
हा गायक फारसा प्रसिद्ध का
हा गायक फारसा प्रसिद्ध का झाला नाही याचे नवल वाटते.>>>>>>:अओ:
कैच्याकै बरका ....इब्लिसराव
अहो मला तर त्यान्च्या इतका पॉप्युलर मराठी गझलगायक माहीतही नाही .अन माझ्या मते तमाम आम मराठी गझलरसिक जनतेचीही माझ्यासारखीच अवस्था आहे
इतकेच काय दुसरा कुठला गझल गायक आहे ही माहितीही आमच्या गावी नाहीये अजून ........आता बोला !!!
अगदीच सान्गायचे झाल्यास मराठी गझल लिहायला भट साहेबानी तर गायला पान्चाळे साहेबानी सुरू केली असे मानतो आम्ही आम जनता .......आता बोला !!
>>भर युद्धात मलाच ढाल करतो
>>भर युद्धात मलाच ढाल करतो त्याला भजावे कसे
देव्हार्यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
असते तेच कुटुंब ज्यात असते कोणी कुणाचेतरी
माझ्यातच जगतात लाखजण मी माझे बनावे कसे >>
खास बेफिकीर टच .संकल्पनांनाच प्रश्न विचारणे.
गझल आवडली
खास बेफिकीर टच नेमका कसा असतो
खास बेफिकीर टच नेमका कसा असतो ते मला मायबोलीवरतरी आजवर समजलेले नाही. अगदी एस एस एस या कादंबरीपासून!
पण जामोप्या आणि वैवकुंच्या चर्चेला उत्तर म्हणून हा व्हिडिओ:
कवी स्वतःची रचना गाताना कशी अर्थपूर्णपणे गातो याचे उदाहरण
-'बेफिकीर'!
मराठी साहित्य परिषद त्यादिवशी
मराठी साहित्य परिषद त्यादिवशी पहिल्यांदाच सलग तीन मिनिटे टाळ्या वाजवत होती बरं
भूषणदादा किती सालचा आहे हा
भूषणदादा किती सालचा आहे हा विडीयो?
पहिला शेर जबरदस्तच......
पहिला शेर जबरदस्तच......
सुन्दर गझल ! व्हिडिओ फार
सुन्दर गझल ! व्हिडिओ फार आवडला !!
छान
छान
कुठले वृत्त आहे ?
कुठले वृत्त आहे ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/21656?page=11
रसप, ही लिंक बघा
शार्दूल विक्रीडीत ... शुभमंगल
शार्दूल विक्रीडीत ... शुभमंगल सावधानवाले वृत्त
भर युद्धात मलाच ढाल करतो
भर युद्धात मलाच ढाल करतो त्याला भजावे कसे
देव्हार्यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
असते तेच कुटुंब ज्यात असते कोणी कुणाचेतरी
माझ्यातच जगतात लाखजण मी माझे बनावे कसे
क्या बात!!!
वृत्त हाताळणी अवघड वाटतेय तरहीसाठी..
( ढ्ढ्म )
-सुप्रिया.
>>सचिन गोरे | 26 September,
>>सचिन गोरे | 26 September, 2012 - 09:52 नवीन
शार्दूल विक्रीडीत ... शुभमंगल सावधानवाले वृत्त<<
अरे हो की !! समजलेच नाही! गझलसाठी प्रचलित नसल्याने एकदम 'क्लिक'च झाले नाही..
क्षमस्व आणि धन्यवाद !
बेफिकीरजी! गझल छान आहे! आता
बेफिकीरजी!
गझल छान आहे!
आता महाविद्यालयास जाण्याच्या धांदलीत आहे. आल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन!
पण आता एका शेराचा आवर्जून उल्लेख करावासा वाटत आहे............
असते तेच कुटुंब ज्यात असते कोणी कुणाचेतरी
माझ्यातच जगतात लाखजण मी माझे बनावे कसे
दोन्ही ओळी स्वतंत्रपणे भावल्या.
दुसरी ओळ मला divine वाटली.
पण, पहिली ओळ दुसरीला संपूर्ण न्याय देते का असे मला वाटून गेले.
आम्ही चुकीचे बोलत आहोत असे वाटल्यास कृपया माफ करावे!
आपल्या दुस-या ओळीला असा न्याय द्यावासा आम्हास वाटला.
मग शेर असा होतो...........
झालो मी दुनिये तुझा! न उरले काहीच माझे असे!
माझ्यातच जगतात लाखजण मी माझे बनावे कसे!!
टीप: भूषणराव, हे माझे आवडते वृत्त आहे जे मी वयाच्या १४व्या वर्षांपासून वापरीत आहे! पण गझलेत ते मी कधी वापरले नाही. पण आपली रचना पाहून या वृत्तात लिहिण्याची सुरसुरी मात्र जरूर आली आहे! बघतो लिहून आम्हीही ही तरही आल्यावर!
मी एक ओळ तरहीसाठी सुचविली होती. तिचे काय झाले? कुणीच काही बोलले नाही. असे आपण करू शकत नाही का?
ओळ अशी होती..........
आले रडू तरीही रडता मला न आले!
..........प्रा.सतीश देवपूरकर
बेफिकीरजी! आपली तरही सखोल
बेफिकीरजी!
आपली तरही सखोल आभ्यासल्यावर आम्हाला जे जाणवले ते लिहीत आहोत.
काही चुकीचे बोलत असल्यास माफ करावे!
शेर नंबर १.........मतला.............
मतला प्रथम दर्शनी वाचताना, काही खटकले नाही. पण आता सावकाश फुरसतीने वाचताना पहिल्या ओळीतल्या उत्तरार्धातले भजावे कसे हे शब्द जरासे खटकू लागले..........संपूर्णपणे वैयक्तीक मत. ढाल शब्द पूर्वार्धात आल्यानंतर उत्तरार्धात भजणे ऎवजी भिडणे/लढणे असे काही तरी हवे होते, वाटून गेले. भिडावे कसे? किंवा लढावे कसे? असे असायला हवे होते असे वाटून गेले.
शेर नंबर २..............
दुसरी ओळ divine वाटली. पण पहिली ओळ स्वतंत्ररित्या सुंदर असूनही दुस-या ओळीस न्याय द्यायला कमी पडत आहे की, काय असे वाटून गेले. त्यमुळे पहिली ओळ बदलाविशी वाटली. आपल्या शेरातील दोन ओळींमधील नाते दुरावल्यासारखे
वाटले. दोन्ही ओळी स्वतंत्ररित्या सुंदर असल्याने आम मुशाय-यात कदाचित ही बाब overlook होईलही, पण चाणाक्ष व प्रगल्भ रसिकांच्या ही बाब, जरी ते बोलले नाहीत तरी, लक्षात आल्याशिवाय रहाणार नाही. भूषणराव थोडेसे परखड पण प्रांजळ बोलतो आहे! क्षमस्व!
शेर नंबर ३................
मला तरी संदिग्ध वाटला. समजलाच नाही. आपण अर्थ सांगाल का?
अर्थच न समजल्याने मला कुठलाही पर्याय देता आला नाही. क्षमस्व!
शेर नबर ४..........
शेरातील पहिली ओळ थेट. पण दुस-या ओळीतील पांचाळे शब्द खटकला किंवा मला तरी तो दुर्बोध वाटला. म्हणून भिडावे कसे, असे करून दुसरी ओळ बदलाविशी
वाटली.
शेर नंबर ५.............
दुस-या ओळीतील ‘आडोसाच’ हा शब्द खटकला.
माझ्या माहितीप्रमाणे हा शब्द ‘अडोसा’ असा आहे, ‘आडोसा’ असा नाही.
वृत्तात अडोसा मला तरी आता बसवता आला नाही. आपण बसवून पहावे.
तूर्तास, दडावे कसे असे म्हणून दुसरी ओळ बदलाविशी वाटली.
वर दिलेल्या शेरनिहाय म्हणण्यानुसार आपली ही तरही मला अशी वाचावी वाटली..
भरयुद्धात मलाच ढाल करतो! सांगा लढावे कसे?
देव्हा-यात बसून तो ठरवतो, की, मी जगावे कसे?
झालो मी दुनिये तुझा! न उरले, काहीच माझे असे!
माझ्यातच जगतात लाखजण मी, माझे बनावे कसे?
????????????????????????????????????
????????????????????????????????????
रक्तातून करून शेर भिडतो, अवघ्या जगाला कवी;
टीकाकार बघून मात्र म्हणतो....यांना भिडावे कसे?
प्रत्यक्षात असून ‘बेफिकर’ मी, वाटे असे का मला?.....
बुरख्यांच्या दुनियेमधे न समजे, कोठे दडावे कसे?
>...........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: भूषणराव, आपली मते जरूर कळवा, आम्हास बरेच शिकायला मिळेल.
..................................................................................
टीकाकार बघून मात्र
टीकाकार बघून मात्र म्हणतो....यांना भिडावे कसे?>>>>
दुसर्या ओळीत बेफीजीनी पान्चळे बद्दलच बोलायचे असेल तर ??? (एक व्यक्ती नव्हे तर एक प्रवृत्ती ..दुसर्याच्या नावावर/कर्तुत्तावरवर मोठे होवू पाहणारे ,टाळ्या मिळवणारे, असाही अर्थ काढता यतो!!... इतकेच काय हा अर्थ पुढे पर्यायी गझलकारानाही टोला मारतो!! ;).... .असो!!)
टीकाकारान्चा काय सम्बन्ध ?बेफीजीन्सारखा एक मनस्वी माणूस टीकाकाराना खिजगणतीतही धरत नसेल तर??
बुरख्याच्या पर्यायात ;मूळ ओळीत जे 'आडोसा व्यसनी आहे' असे म्हटले आहे ,ते अजिबात उतरत नाही अन त्यामुळे मूळ ओळीची नशा पर्यायी वाचून ,खाड्कन उतरल्यासारखे वाट्ते !!.वै म.!!
मी माझे बनावे कसे!!>बाबत दोन्ही प्रतिसादात मिळून आपण म्हणालात ते बरेच पटते आहे तरीही मी त्या शेरावर माझ्या स्वतन्त्र बुद्धीने विचार करतो आहे .पर्यायी देण्यासाठी नव्हे .मला नेमके काय शिकता येईल ते बघण्यासाठी !!
______________________________________
असो
सर ..........तुम्ही माझ्या मुद्यान्वर विचार करावा असे मला वाटते !! कारण पर्यायी देताना , मूळ शायराने तो शेर करताना जी चिन्तनाची पातळी गाठली आहे तिच्या खोलीचा अन्दाज आल्याशिवाय त्या चिन्तनास ते सखोल नाही असे भासवून आपल्या बुद्धीला सूट होणारा वेगळाच विचार त्या जागी मान्डून शेर पूर्ण करणे अन हा घ्या असा असावा शेर असे म्हणणे हे अत्यन्त निन्दनीय कृत्य असते व तुम्ही ते करू नये असे मला मनापासून वाटते ............
ही ओळ खूप काही शिकण्यासारखी आहे <<<<<<<<रक्तातून करून शेर भिडतो अवघ्या जगाला कवी !!!
देवसर..!! या वरील ओळीत असलेल्या जीवघेण्या तळ्मळीची (तळतळाट !!) जाणीव जेन्व्हा आपल्याला होईल तेन्व्हा आपले असे भारम्भार पर्यायी शेर देणे आपोआपच बन्द होईल असे मला वाटते !!(परखड मत !!......ठामही!!!.)
आपला नम्र
वैवकु
धन्यवाद !!