आज बर्फी पाहीला, माहितीये बघण्यात जरा उशीरच केला पण "देर आए पर दुरुस्त आए " असे वाटले पाहताना. खुप दिवसांनी एक सुरेख चित्रपट पाहायला मिळाला , जो डोळ्यापासुन सरळ हृदयाला जाउन भिडला.सतत हसत असणार्या बर्फीने आयुष्याला एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लावले. हया चित्रपटाचे अनेक पैलु आहेत , कधी हा आपल्याला पोट धरुन हसवतो तर कधी डोळे ओलावतो.
नेहमी आपण एकमेकांसाठी मरणारे नाही तर लढ्णारे असे प्रेम पाहतो, नायक नायिकेला पाह्तो आणि पहिल्या नजरेत त्याला प्रेम होते मग एखाद्या विदेशी पर्यटन स्थळी त्यांचे एखादे गाणे होते , मग पुढे त्यांचा स्ट्रगल , किंवा एखादा प्रेम त्रिकोण वगेरे वगेरे अशी आपल्या चित्रपटात प्रेमाची डेफिनिशन असते. पण प्रेमाला शब्दांच्या आधाराची आवश्यकता नसते हे आपल्याला बर्फी शिकवतो , प्रेम हे किती निष्पाप आणि नि:स्वार्थी असु शकते हे बर्फी हा चित्रपट सांगुन जातो.
मुकबधीर असलेला बर्फी , मतिमंद असलेली झिलमिल ही दोघेही आपल्या सो कॉल्ड नॉर्मल लोकांपेक्षा खुप सक्षम वाटतात.
जगाचा विचार करण्यात खर्या प्रेमाला गमावणारी आणि नंतर आयुष्यभर त्याच प्रेमाला शोधणारी श्रुती देखिल मनाला भावते.
खुष राहणे इतके सोपे असु शकते , हे बर्फी सांगुन जातो , तर प्रेम इतके निरागस , सहजदेखिल असु शकते हे बर्फी आणि झिलमिल सांगुन जातात.......
खरेच खुप सुरेख .... जगायचे असेल आयुष्य तर बर्फीसारखे जगा..... "Be Barfi".....
बर्फी ऑस्करला नॉमिनेट झाला
बर्फी ऑस्करला नॉमिनेट झाला म्हणे
भारताची एन्ट्री म्हणून निवड
भारताची एन्ट्री म्हणून निवड झालीये. ऑस्कर नॉमिनेशन वेगळे. त्याला खूप अवकाश आहे अजून.
हर्षिता, एक दुरुस्ती ! झिलमिल
हर्षिता, एक दुरुस्ती ! झिलमिल मतिमंद नाही. ती ऑटिस्टिक आहे. ह्याला मराठीत " स्वमग्न " अशी संज्ञा आहे.
स्वतःकडे असणार्या फोन नं. चा वापर करुन ती जुन्या आश्रमात पुन्हा पोहोचते. बर्फी आणि श्रुती मधला बंध तिला जाणवतो. लहानपणी पाहिलेल्या बर्फीला ती बर्याच वर्षांनी नावासकट ओळखते.
ह्या गोष्टी मतिमंद व्यक्ती करु शकत नाही.
ऑटीस्टीक चे मराठी माहिती
ऑटीस्टीक चे मराठी माहिती नव्हते म्हणुन गड्बड केली...धन्स गडबड सुधरल्याबद्दल!!
(No subject)