Submitted by kaaryashaaLaa on 29 September, 2008 - 01:25
मित्रहो,
ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.
तर सादर आहे आजची प्रवेशिका....
उरीचे मुके बोल ओठात नाही
जसा नाद या एकतार्यात नाही
जरी छेडले स्पंद होती तराणे
तरी मोर पाऊल तालात नाही
बहाणे हजारो जगाया करावे
अशी मानसी तेवती वात नाही
मऊशार केसांत गुंतून जावे
खुळ्या मोगर्याच्या अवाक्यात नाही
अवेळी धुमार्यांस जाळे निखारा
विझावे असा थेंब डोळ्यात नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निखारा व
निखारा व मोगरा --चार गुण.
मऊशार
मऊशार केसांत गुंतून जावे
खुळ्या मोगर्याच्या अवाक्यात नाही
मस्त!!!-५ गुण
तेवती वात
तेवती वात ... छान आहे
३ गुण
मतला आणि
मतला आणि मक्ता आवडला.
४ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!
गुण
गुण द्यायचे राहून गेले:
१) गझलचा विषय् - १ गुण
२) शैली - १ गुण
३) शब्दरचना - २ गुण
४) प्रवाह - १ गुण
५) शेर - २ गुण
============
ऐकून गुण - ०७
पहिला शेर
पहिला शेर छान आहे.
मोगरर्याचा शेरही छान, पण 'अवाक्यात' हा शब्दप्रयोग योग्य आहे असं नाही वाटलं. त्याचप्रमाणे 'मोर पाउल', 'विझावे' हे प्रयोगही नीट नाही वाटले.
माझ्या मते ३ गुण.
-सतीश
शेवटचे
शेवटचे दोन्ही शेर फार आवडले...
`मोर पाऊल' वाला शब्दप्रयोग मलाही बरोबर वाटला नाही.
५ गुण
खुळ्या
खुळ्या मोगर्याच्या अवाक्यात नाही
व्व्व्वा!!!
अवेळी धुमार्यांस जाळे निखारा
विझावे असा थेंब डोळ्यात नाही
छान!
३ गुण
मोर पाऊल
मोर पाऊल मलाही "चकला". मक्त्याची कल्पना झक्कास आहे...
माझे ४
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ
अवेळी
अवेळी धुमार्यांस जाळे निखारा
विझावे असा थेंब डोळ्यात नाही
गझल मस्त. ७ गुण.
१ला आणि
१ला आणि ५वा छान..
२र्यात अजून छान शब्द जमले असते...पण कल्पना खूपचं छान...
माझे ५ गुण..
४ गुण
४ गुण
मुके बोल
मुके बोल ओठात नाहीत असं हवं होतं असं मला वाटतं...
अजून थोडी सोपी झाली असती तर पटकन भिडली असती....
माझे गुण - ४
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
मतला आणि
मतला आणि मक्ता मस्त..
मऊशार केसांत गुंतून जावे
खुळ्या मोगर्याच्या अवाक्यात नाही >>> हे नीट लईत वाचता येतय का??
बहाणे हजारो जगाया करावे
अशी मानसी तेवती वात नाही >>> ह शेर ही आवडला..
६ गुण..
शेवटचा शेर
शेवटचा शेर चांगला आहे.
गुण ४
वात - सानी
वात - सानी मिसरा - "अशी तेवणारी मनी वात नाही" असा केला तर थोडा सोपा होईल असे वाटते.
निखारे मधली कल्पना छान आहे.
माझे - ४ गुण.
वातीचा अन्
वातीचा अन् निखार्याचा शेर आवडला.
गुण? - मीच शिकायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे...
पुढील गझलेसाठी शुभेच्छा!
आला मोगरा
आला मोगरा लोक झाले वेडे, मोगरा जबरी एकदम,
या मोग-याला त्याची त्याची मस्त जागा मिळाल्यासारखं वाटतय. बाकी खटकलं बिटकलं जाणकार बोलतायत
गुण देण्याएवढी समज अजून मला नाही
मोगर्याच
मोगर्याची कल्पना खूपच आवडली.
एकूण ४ गुण.
(भुजंगप्रयात वृत्त आहे ना?)
मोर पाऊल...
मोर पाऊल... काहीतरी खटकतं आहे..
गुण - ५
प्राजु
जरी छेडले
जरी छेडले स्पंद होती तराणे
तरी मोर पाऊल तालात नाही
माझ्या मते ह्या शेराचा अर्थ असा असावा की ह्रुदयाची स्पन्दने जरी लयीत तराणे गात असली तरी चित्त थार्यावर नसल्यामुळे मनरुपी मोराची पाउले तालात पडत नाहीत.
तेवती वात छान आहे
शेवटचा शेरही छान आहे.
गुण ८
विझावे असा
विझावे असा थेंब... व्वा! खास!
मोगर्याचाहि जमून गेलाय अगदि.
छान गजल.
शेवटचा शेर
शेवटचा शेर सुंदर.
>> बहाणे हजारो जगाया करावे
अशी मानसी तेवती वात नाही
हा फारच आवडला! व्वा!
गुण? बाप रे. इंडियन आयडल ला एसेमेस करण्याइतकं सोपं आहे का हे?
गुण ५
गुण ५
५
५ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
तेवती वात -
तेवती वात - शेर आवडला.
गुण - ४
आपली तेवढी
आपली तेवढी लायकी नाही पण द्यायला हवे.
माझ्याकडुन ४ गुण.
`मोर पाऊल'
`मोर पाऊल' शब्दप्रयोग बरोबर वाटत नाही.
मोगरा आणि निखारा छान..!
माझ्यातर्फे ४ गुण.
================
मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!
ठीक आहे. ४
ठीक आहे. ४ गुण
मोर पाउल
मोर पाउल आवडलं. नवं वाटलं. गुण ५
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
Pages