Submitted by जयन्ता५२ on 20 September, 2012 - 10:39
ईश्वराची नसे दिरंगाई
प्रार्थनांना अवाजवी घाई
काल थेंबा विना दिवस गेला
आजचा हा प्रलय अजब भरपाई
जन्म गेला तिला विनवतांना
संमतीची तरी अपूर्वाई !
मोडला तो करार दोघांनी
वाळण्याचे बघेल ती शाई!
पर्वताला कुणी तरी सांगा
काल होतास एवढी राई
----- ---------------------- जयन्ता५२
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
_____________________________
__________________________________________________
फर्स्ट ऑफ ऑल धन्स बेफीजी !!
मला जे म्हणायचे होते ते ते सर्व अगदी योग्य शब्दात आपण समजून घेतलेत व अत्यन्त सुन्दर विष्लेशणात्मक प्रतिसाद दिलात
कणखरजीना अनुमोदन
अजब बद्दलही डॉ .साहेबाना अनुमोदन
एकुणात ज्ञानेशजीनी घातलेल्यापैकी एकतरी अट शिथिल करावी लागणारच असे मला अजूनही वाटते
__________________________________________________
गा ल गा गा | ल गा | ल गा गा गा
आजचा हा । प्र लय । मा त्र भर पा ई >>>>> -बंडोपंत (मात्र = जस्ट/ओन्ली या अर्थी खूप छान पण लगावली
गडबडतेय )
गा ल गा गा | ल गा | ल गा गा गा
आ ज चा पू। र क्रू ।र भर पा ई>>> -बेफीजी (मस्तय हा बदल!! र चा अनुप्रास मजा वाढवतो असे माझे वै म. मला अनुप्रास फार आवडतोही )
गा ल गा गा | ल गा | ल गा गा गा
आ ज चा पू । र अज ।ब भर पा ई >>>>- मला सुचलेला बदल (मी जुळवलेला !!)...कसा वाटतोय??
_______________________________________________
शब्दांच्या या नैसर्गीक वजनाचा विचार करून गझल लिहिणे ही अट >>>>
येस्स सर !!! यू आर राईट !!
मी लिहिणे अन वाचून/ म्हणून पाहणे/ दाखवणे यात माझ्या सोयीनुसार भेद केला !!
आता वरील ओरीजनल ओळ वॄत्तात नाहीये हे समजल्यावर आधी मी ती जिभेला हवेतितके वळवून अशी वाचली होती (काही गुस्ताखी केली आहे ............आधीच क्षमा मागतो )
आजचा हा प्रलय अजब भरपाई
आ ज चा {ह् प्र} । ल यअ ।ज ब्भ र्पाई
गा ल गा गा | ल गा | ल गा गा गा
मी केलीली गुस्ताखी अशी ..............
१)उर्दू की पार्सी प्रमाणे हा ला जसे साय्लेन्ट मोड वर ठेवतात तसे ठेवले खरेतर त्याची अर्धी मत्रा केलीए .....प्र ला त्यात जोडले अन एक "गा" मानला!
२) अजब मधला ब अर्धा करून भ ला जोडला (ब अन भ जवळ जवळ सारखाच उच्चार ब लाच ह् जोडला की भ तयार !! या दोन आवळ्या जावळ्या वर्णाना जोडून मस्त पन्च तयार होतोय नै ?? शिवाय मघाशी हा ला साय्लेन्ट करून अर्धा खल्ला होता तो हिशेब फिट्ला )
३) आता राहिला भरपाईचा र तो पा वर जोडून अजून एक ठोस पन्च तयार झाला = र्पा
माझे पन्च म्हणणे म्हणजे इथे अक्षर उच्चारताना जिभेला जी ताकादीची जाणीव होते ती !!!
अशाप्रकारे वाचून /म्हणून लगावली अॅडजेस्ट करून घेतली मी जरी लिहिताना ती तशी लिहिली नाही तरी ......
सो दॅट आय वॉस सेइन्ग ......मी लिहिणे अन वाचून/ म्हणून पाहणे/ दाखवणे यात माझ्या सोयीनुसार भेद केला
मधे ; पुण्याई ,पुन्हा हे शब्द पुण्ण्याई , पुन्न्हा असे लिहावेत अशी काही मते वाचली होती तिथेही हा मुद्दा लागू होतो (लिहिणे अन म्हणणे यातला फरक वगैरे )
_______________________________________________________
असो
बराच वेळ माझी बडबड ऐकून घेताय ...........धन्यवाद !!!
जाता जाता माझा एक शेर टाकतो
मला बोलायचे नव्हते तरी बोलून गेलो मी
म्हणाले मौन माझे ....."बडबडावे वाटते आहे !!"
धन्स अगेन !!
धन्स टू ऑल!!!
दोस्त लोक, सर्वप्रथम तुम्ही
दोस्त लोक,
सर्वप्रथम तुम्ही सगळे माझ्या गझलेच्या एका ओळीवर इतका रस घेऊन आत्मीयतेने व तळंमळीने चर्चा करीत आहात त्यामुळे मी भारावून गेलो आहे. मनापासून धन्यवाद!
मी मात्र 'अजब' या शब्दाची योजना विचारपूर्वक केली आहे.'अजब' मध्ये 'क्र्रूर', 'विचित्र' या अर्थाचा समावेश होतो असे माझे मत आहे.मात्रागणनेत 'मी 'गंडलो' हे मान्य! आपण सर्वांनी जे वेगवेगळे पर्याय सुचविले आहेत त्यांचा आदर करून
मला 'अजब' हाच शब्द सर्वात योग्य वाटतो.
जयन्ता५२
धन्यवाद जयन्ताजी माझ्याकडून
धन्यवाद जयन्ताजी
माझ्याकडून काही चुकले असल्यास क्षमस्व!!
वाह ! बर्याच दिवसांनी
वाह !
बर्याच दिवसांनी एखाद्या गझलेतून व त्या गझलेमुळे काही शिकायला मिळाले आहे.
जयंत सरांचे ही गझल लिहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
ज्ञानेशजी व जयंता५२, ‘प्रलय’
ज्ञानेशजी व जयंता५२,
‘प्रलय’ शब्द माझ्यामते, सुशिक्षित सामान्य माणसे(पण संस्कृतचे ज्ञान नसलेली)
असा उच्चारतात.........
प्रल....२मात्रा + य....१मात्रा= गाल=२+१=३मात्रा.
ज्ञानेशजी, आपण म्हणता तसे लगा=१+२=३मात्रा असे नव्हे.
तेव्हा मी दिलेली ओळ....प्रलय देणार काय भरपाई?.........ही मला बरोबर वाटते.
पण तरीही लगा असाच उच्चार आपणास हवाच असेल तर मी खालील ओळ सुचवतो..............
हा प्रलय! की, असेल भरपाई?
मग शेर असा होतो......
काल दुष्काळ येवुनी गेला.....
हा प्रलय! की, असेल भरपाई?
असो.
लय साधणे/न साधणे/लय बिघडणे....वगैरे विषय चालू आहे, म्हणून आमचे या विषयीचे चिंतन इथे देत आहे.........
लय म्हणजे काय?
अक्षरगणवृत्तात व मात्रावृत्तात, दोहोंमधे लय असते.
गोटीबंद अक्षरगणवृत्तात लय ही आपोआप येते. वेगळा खटाटोप करावा लागत नाही!
मात्रावृत्तातील लय ही समजून घ्यावी लागते.
मात्रावृत्तात लिहिताना, गुणगुणताना लयीचे अवधान हे ठेवावे लागते. पण, एकदा का ती लय समजली की, गुणगुणताना बिघडलेली लय ही कानाला लगेच खटकते. पण यासाठी लय आधी समजलेली असली पाहिजे.
म्हणून नवोदित शायरांनी शिस्त लागण्यासाठी अक्षरगणृत्तात आधी लिहावे.
सरावानंतर मात्रावृत्तांकडे वळावे. निदान मी तरी असे केले आहे.
मात्रावृत्ते दिसायला सोपी वाटतात, पण त्यातील लय अनावधानाने बिघडू शकते.
अक्षरगणवृत्तात लय बिघडण्याचा संभव नसतो.
संस्कृतात व मराठीत अनेक वृत्ते आहेत.
प्रत्येक वृत्ताचा डौल, ऎट, दिमाख, नखरा, चाल, लय या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात.
सर्वच वृत्ते आपल्याला भावतील/आवडतील वा पेलतील असे नव्हे.
आपल्याला जे गोड वाटते, सोपे वाटते तेच वृत्त प्रथम वापरावे. नंतर अवघड वृत्तांकडे वळावे!
सरावाने कोणत्याही वृत्तावर, कुणीही, कमीअधिक काळानंतर, पकड मिळवू शकतो.
शेवटी अशी वेळ येते की, एकदा का वृत्त, त्याची लय अंगात भिनली की, मिसरेच्या मिसरे आपोआप लयीत ओठांवर येतात.
पण या करता आपल्याकडे हवी शब्दसमृद्धी व शुद्धलेखनाचे भान!
असो.
आता लय, लय म्हणजे तरी काय?...............
(लय शब्द पु. पण आहे व स्त्री. पण आहे.)
लय या शब्दाचे अर्थ आहेत.........
(पु.) वाद्य वाजविल्यानंतर काही काळ मागे राहिलेला ध्वनी.
(पु.) वादनात ताल देण्याच्या क्रियेतील विश्रांतीचा काळ.
नृत्य वादन इत्यादीतील समकाल, ताल. इंग्रजीत rhytheme.
गायन, वादन, नृत्य यांचे ऎक्य.
म्हणजेच एखद्या पदार्थाची दुस-या पदार्थाशी तद्रूपता झाल्यामुळे होणारा लोप, नाहिसेपणा
क्षय, नाश
झोप
लय म्हणजे जगाचा संहार
चित्ताची एकाग्रता.
लयास जाणे म्हणजे तद्रूप होणे, विनाश पावणे
लयक्रिया म्हणजे संहारकार्य, गाण्यात ताल धरणे
लयस्थ(वि.) समाधीत तटस्थ असलेला.
लय(वि.) (क्रि. वि.).....पुष्कळ, अतिशय
लयलूट म्हणजे रेलचेल.
थोडक्यात लय म्णजे rhytheme, ताल, प्रवाहीपणा, रवानी
ज्या गोष्टीत आवर्तन असते, तिच्यात एक स्वत:ची लय असते.
लय एक कालखंड दर्शवते, जो वेगवेगळा असतो.
लय छोटी असेल वा मोठी.
श्वासांची लय, लाटांची लय, भरती ओहोटीची लय, झुळझुळणा-या झ-याची लय,धो धो कोसळणा-या धबधब्याची लय, पूर आलेल्या नदीची लय, संथ वहणा-या नदीची लय, रानवा-याची लय, वादळाची लय, ऋतूंची लय अशा किती तरी लयी असतात. कलाकार मनुष्य ही लय नेमकी पकडतो. असो.
लयीत एक माधुर्य असते, गोडवा असतो, एक मूड असतो, भाव असतो, एक डौल असतो.
प्रत्येक लय ही तिच्या जागी सुंदरच असते. तरीही आपल्या पिंडानुसार काही लयी आपणास जास्त भावतात, पण त्यामुळे इतर लयी या वाईट ठरत नाहीत.
मला व्यक्तीश: वरील वृत्त फारसे आवडत नाही..........ही माझी आवड झाली. पण एखाद्याला या वृत्तातील लय जास्त आवडू शकते.
शेवटी पसंद अपनी अपनी!
आपणास काय आवडते ते महत्वाचे!
टीप: वैयकक्तीक मत.............
मराठी भाषेत शब्दांचे उच्चार हे वेगवेगळे असतात.
पण, शब्दांचे शुद्धलेखन हे उच्चारावर अवलंबून नसते.
कारण मराठी भाषा ही तितकीशी phonetic(उच्चारावर आधारीत) नाही.
मराठी भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या त-हेने उच्चार केल्याने अनेक अर्थ संभवतात, पण तो शब्द लिहिण्याची त-हा ही एकच असते. अनेक नव्हेत!
म्हणूनच मला वाटते की, उर्दूपेक्षा मराठीत गझल लिहिणे हे जास्त अवघड असते.
...........वै.म.
मी स्वत: मराठी शुद्धलेखनाचे आधुनिक नियम पाळण्याचा प्रयत्न करतो
शुद्धलेखनाचे नियमही कालानुसार बदलत असतात. त्याचे देखिल कायदे असतात.
पूर्वी जे शुद्धलेखन असेल ते आताचे अशुद्धलेखन असू शकते.
मराठी शुद्धलेखनात बरेच अपवाद असतात, जे जाणीवपूर्वक लक्षात ठेवावेच लागतात. असो.
इथेच थांबतो!
................प्रा.सतीश देवपूरकर
मा.सतिश जी, दीर्घ
मा.सतिश जी,
दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आपल्या मताचा आदर आहेच. पण मी मात्र 'अजब' या शब्दाची योजना विचारपूर्वक केली आहे.'अजब' मध्ये 'क्र्रूर', 'विचित्र' या अर्थाचा समावेश होतो असे माझे मत आहे. 'अजब' मध्ये एक निराशेचा,निषेधाचा,कडवटपणाचा व सॅरकास्टीक 'टोन' आहे. व तोच शब्द या ठिकाणी चपखल बसतो.
त्या मिसर्याच्या रचनेत माझ्या कुवतीप्रमाणे कमी जास्त होऊ शकते पण 'अजब' मध्ये मला जे म्हणायचे आहे ते सर्व काही आहे.
धन्यवाद!
जयन्ता५२
प्रल....२मात्रा +
प्रल....२मात्रा + य....१मात्रा= गाल=२+१=३मात्रा.
ज्ञानेशजी, आपण म्हणता तसे लगा=१+२=३मात्रा असे नव्हे.
नो कमेंट्स.
वलय, अजब, सवड हे शब्द सुशिक्षित सामान्य माणसांच्या भाषेत गा-ल होतात की ल-गा होतात यावरही देवपूरकर सरांनी मार्गदर्शन करावे.
तसेच अन्य, चक्क, स्तन्य या शब्दांचे गण कसे होतील यावरही विवेचन करावे.
धन्यवाद.
प्रोफेसर साहेब, 'प्रलया'त
प्रोफेसर साहेब,
'प्रलया'त भरकटलात की काय..?
कसा उच्चारतो आपण 'प्रलय' ?
'प्रल् + य' की 'प्र + लय्' ?
मी तरी 'प्र + लय्' उच्चारतो बुवा ! 'प्र + लय्' = १ + २ = ल गा
ज्ञानेशजी, जयंता,
ज्ञानेशजी, जयंता, रणजीत!
आपल्या सर्वांच्या मतांचा आदर करून मी काही सांगू का?...........
प्रलय शब्दाच्या मात्रा मोजताना मी काय हिशेब केला ते सांगतो..................
पण आधी थोडे अवांतर.............
आमचे एक भूशास्त्राचे अतिशय वरिष्ठ, फर्ग्युसन माहाविद्यालयातील सर प्रा.प्र.वि. सोवनी, हे नेहमी काहीही शिकवताना आधी शब्दांची फोड करायचे व मग ती व्याख्या, phenomenon, ती गोष्ट शिकवायचे. हा त्यांचा आग्रह असायचा. ते म्हणायचे शब्दामधेच त्याचा अर्थ/व्युत्पत्ती दडलेले असतात. त्यामुळे त्यांनी शिकवलेले आजतागायत आमच्या लक्षात आहे व आज तेच सरांचे ज्ञान आम्ही वाडिया महाविद्यालयात गेली ३६ वर्षे अव्याहत देत आहोत! प्रत्येक वेळी आमच्या सरांचा सन्मानपूर्वक व नम्रतेने उल्लेख करत आहोत, व हे सर्व आमच्या गुरूंचे ज्ञान आम्ही आपणास देत आहोत, यात आमचे काही कर्तुत्व नाही, ही त्यांची कृपा आहे, हे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत आहोत. असो.
‘प्रलय’ शब्दात ‘लय’ शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो जगाचा संहार, विनाश वगैरे.....
‘लय’ शब्द मी १०वेळा मोठ्याने व अतिशय बारीक लक्ष ठेवून उच्चारून पाहिला.
आम्हास काय जाणवले?..............
लय शब्द उच्चारताना ‘ल’ वर थोडा जास्त वेळ लागत आहे व ‘य’ अर्ध्यावरच सोडल्यासारखा उच्चार करावा लागत आहे.
‘प्र’ हा प्रत्यय शब्दाच्या आधी जेव्हा लागतो, तेव्हा तो त्या त्या गोष्टींचा अधिकपणा/ पुष्कळपणा दाखवतो.
आता बघा ‘प्रलय’ शब्दात....................
प्र किंवा/आणि ल अक्षर उच्चारयला जेवढा वेळ लागेल, तितका वेळ ‘य’ अक्षर उच्चारायला लागतो का?
मला तरी वाटते.......... नाही!
म्हणून ‘प्रलय’ शब्दाच्या मी, उच्चारानुगामी अशा मात्रा मोजतो..............
प्रल+य=२+१ =३ म्हणजेच गा ल ..........ल गा नव्हे!
ज्ञानेशजी! लयीवर आम्ही केलेल्या विवेचनात काही त्रुटी आहेत काय?
आपल्या मार्गदर्शनामुळे आमच्या धारणा आम्हाला तपासून घेता येतील.
टीप: ‘प्रलय’ शब्दाच्या उच्चारानुगामी मात्रा शब्दकोशात आपणास सापडतील!
मी खालील शब्दकोशात पाहिले....................
अभिनव मराठी-मराठी शब्दकोश
By Dr. द.ह.अग्निहोत्री
एकूण ५ खंड (प्रत्येकी ५०० ते ६०० पाने)
कुठलाही खंड पहावा! प्रत्येक मराठी शब्दाचे standard उच्चार आग्निहोत्री सरांनी अनेकांचा विरोध मोडून आग्रहपूर्वक दिलेले आहेत. मला तरी त्याचा माझ्या लिखाणात फायदा होतो!
शुद्धलेखनाबाबतही काही मार्गदर्शन त्यात आहे.
एक विनंती..........
मी सुचवलेली ‘प्रलय’ शब्दाची ओळ व तो बदललेला शेर आपणास कसा वाटतो
आता?...............तेही सांगावे.
आपण विचारलेल्या इतर शब्दांचे उच्चार वा मात्रा खालीलप्रमाणे..............
‘वलय’= २+१=३=गा ल
‘अजब’= २+१=३=गा ल
‘सवड’= २+१=३=गा ल
‘अन्य’=२+१=३=गा ल
‘चक्क’=२+१=३=गा ल
‘स्तन्य’=२+१=३=गा ल
..........प्रा.सतीश देवपूरकर
..............................................................................................
‘वलय’= २+१=३=गा ल ‘अजब’=
‘वलय’= २+१=३=गा ल
‘अजब’= २+१=३=गा ल
‘सवड’= २+१=३=गा ल
=== >>>
काय बोलू याच्यावर ?? कठीण आहे बुवा....
प्रोफेसर साहेब, आपण दिलेला
प्रोफेसर साहेब,
आपण दिलेला संदर्भ व विवेचन (म्हणजे नुसता 'लय'चा उच्चार आणि मग 'प्र'लय चा उच्चार) हे काही प्रमाणात पटले पण तरीही प्रलय, अजब, दिवस, सवड अश्या शब्दांचे उच्चाराप्रमाणे नैसर्गीक वजन 'लगा' असेच आहे असे मला वाटते.
मी स्वतः हे सर्व शब्द 'लगा'
मी स्वतः हे सर्व शब्द 'लगा' ह्या वजनानेच उच्चारतो.
पुरे की राव आता हा धागा
पुरे की राव आता
हा धागा ज्यान्चा आहे ते जयन्ताजी मगापासून नको नको म्हणताय्त तरी देवसर काय आपलं तुणतुणं वाजवायचे थांबत नाहीयेत
बास करा नं देवसर प्लीज !!
अतिपरिचयात् अवज्ञा .........संततगमनात् अनादरो भवती !!!!
उगाच स्वताचा अनादर का करून घेताय सर?? (इन फॅक्ट पचका!!:P )
प्लीज ईस्टॉप !!
समस्त समंजस व सहृदयी
समस्त समंजस व सहृदयी मायबोलीकरांनो!
आम्ही आमच्या वरील विवेचनात स्पष्टपणे एका थोर माणसाचा reference दिलेला आहे.
आमच्या मनचे, काल्पनिक असे काहीही सांगितले नाही! आम्हाला स्वत:ला जेव्हा कोणता संभ्रम होतो, तेव्हा आम्ही सरळ तज्ञांकडे धाव घेतो, ग्रंथांकडे धाव घेतो. जाणकारांच्या म्हणण्याला, जे published असते, त्यावर आम्ही श्रद्धा ठेवतो. मराठी भाषा जरी आमची मातृभाषा असली तरी ती कधीही casually घेत नाही!
मला बुवा असेच वाटते..........असे म्हटले की, संपलेच की, हो!
इथे आम्हाला खरोखरीच आमच्या समस्त थोर, नम्र, आभ्यासू, व्यासंगी,निरागस व सहृदयी मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, पर्शियन भाषांमधील गुरुवर्यांची, प्राध्यापकांची आठवण येत आहे.
टीप: आम्हाला कुठल्याही गोष्टींचा अभिनिवेश नाही.आम्ही एक मायबोलीचे विद्यार्थी आहोत, शिकण्यास आसुसलेले!
>.............प्रा.सतीश देवपूरकर
प्रलय = १ + १ + १ किंवा 'सूट'
प्रलय = १ + १ + १
किंवा
'सूट' घेऊन मी त्याचं १ + २ = ल गा करीन........... नेहमी... शब्दकोष वगैरे इतक्या किरकोळ गोष्टीला मी चाळणार नाही. मी लहानपणापासून अस्खलित मराठी बोलत आलो आहे. मला माझ्या उच्चारांवर खूप विश्वास आहे. आता शाळा आवरा.
शाळा केव्हाच सुटली राव!
शाळा केव्हाच सुटली राव!
समस्त समंजस व सहृदयी
समस्त समंजस व सहृदयी मायबोलीकरांनो!<<<
प्रोफेसर साहेब, अजून तरी फक्त गझलकार मायबोलीकरच गझलेत पडत आहेत, एखादी कादंबरी लिहा 'ब्लॅक लेबल लार्ज - ऑन द रॉक्स' वगैरे, मग गझलखिमा नावाचा नवा काव्यप्रकार काढाल
गझलखिमा.
गझलखिमा.
Pages