Submitted by सुधाकर .. on 20 September, 2012 - 10:18
देवा...!
तुझ्यापाठी माझा काहीच त्रागा नाही,
पण इथे माणसाला माणसात जागा नाही.
फुटपातवरही कोणी माणसच असतात
नि, काचबंगल्यातही माणसच असतात
जी एकाच नभाखाली एकाच जगात रहातात
पण एकत्र असूनही ती एकमेकात मिसळलेली का नसतात?
देवा...!
धरतीला जसा अगम्य रंग चढवलास
तसा इथे प्रत्येकालाच वेगळा घडवलास.
त्या अनुदिनी नक्की तुझ्या मनात काय होतं
जेंव्हा आदिमांच जिवाश्म जन्मास येत होतं?
तुझ्या दिव्य स्पर्शाचं इथे काय चिज होतं?
जेंव्हा आभाळाच्या काळजातूनच आपुलकीच बळ हारवतं.
-------------------- http://chandrabilor.blogspot.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देवा...!तुझ्यापाठी माझा काही
देवा...!तुझ्यापाठी माझा काही त्रागा नाही,
पण इथे माणसाला माणसातच जागा नाही.>असे केल्यास एक उत्तम शेर होईल बघ ऑर्फी
असेच इतर कडव्यातून अनेक शेर करून(व वेगवेगळ्या वृत्तात बसवून ) ही कविता अजून सजवता येईल
आताही ही कविता खूपच छान आहे यात शन्काच नाही!!
कविता आवडली
धन्स
<<<त्या अनुदिनी नक्की तुझ्या
<<<त्या अनुदिनी नक्की तुझ्या मनात काय होतं
जेंव्हा आदिमांच जिवाश्म जन्मास येत होतं?
तुझ्या दिव्य स्पर्शाचं इथे काय चिज होतं?
जेंव्हा आभाळाच्या काळजातूनच आपुलकीच बळ हारवतं.>>>
हे सोडून कविता आवडली
सुधाकर! मोठा कॅन्व्हास ,
सुधाकर! मोठा कॅन्व्हास , म्हणून तपशील कमी वाटतात.. विषय छान,विचारही वेगळे.
सर्वांचे मनपुर्वक आभार
सर्वांचे मनपुर्वक आभार