साइट हॅक झाली.

Submitted by शेळीताई on 16 September, 2012 - 02:22

XXXXXXXX साइट हॅक झाली आहे.

हॅकिंग काय असते? कसे होते? करोडो वेब सैट पैकी त्या लोकाना हीच वेब सैट कशी मिळाली?

hack.jpgवेबमास्टरः
मजकूर संपादीत केला आहे आणि वर दिलेले साईटचे नाव काढून टाकले आहे. हॅक झालेल्या साईटवर इतरही काही Malware असू शकते ज्यामुळे त्या साईटला भेट देणार्‍या किंवा तिथे एखाद्या बटणावर टिचकी मारणार्‍या वाचकांनाही धोका पोहोचू शकतो. चला, काय दिसते ते तरी जाऊन पाहूया, या मानसिकतेचा फायदा घेतला जातो.


एखादा भयानक संसर्गजन्य आजार झालेला रोगी अमुक तमुक हॉस्पीटलमधे आहे हे कळाल्यावर (आणि तुमचा त्याचा काही संबंध नसताना) तुम्ही मुद्दाम कुतुहल म्हणून तिथे भेटायला जाता का?.


कृपया इतर कुठल्याही हॅक झालेल्या साईटचा पत्ता मायबोलीवर (किंवा इतर कुठल्याही साईटवर देऊन) आणखी जास्त लोकांचे संगणक आजारी होण्यासाठी मदत करू नका.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजकूर संपादीत केला आहे आणि वर दिलेले साईटचे नाव काढून टाकले आहे. हॅक झालेल्या साईटवर इतरही काही Malware असू शकते ज्यामुळे त्या साईटला भेट देणार्‍या किंवा तिथे एखाद्या बटणावर टिचकी मारणार्‍या वाचकांनाही धोका पोहोचू शकतो. चला, काय दिसते ते तरी जाऊन पाहूया, या मानसिकतेचा फायदा घेतला जातो. तुमच्या नकळत तुम्ही आणखी वाचकांपर्यंत Virus/Malware पोहोचवण्यासाठी मदत करत असाल.

एखादा भयानक संसर्गजन्य आजार झालेला रोगी अमुक तमुक हॉस्पीटलमधे आहे हे कळाल्यावर (आणि तुमचा त्याचा काही संबंध नसताना) तुम्ही मुद्दाम कुतुहल म्हणून तिथे भेटायला जाता का?

कृपया इतर कुठल्याही हॅक झालेल्या साईटचा पत्ता मायबोलीवर (किंवा इतर कुठल्याही साईटवर देऊन) आणखी जास्त लोकांचे संगणक आजारी होण्यासाठी मदत करू नका.

हॅकिंग काय असते? कसे होते? करोडो वेब सैट पैकी त्या लोकाना हीच वेब सैट कशी मिळाली?

प्रश्न छान आहे..

छोट्याश्या अनुभवातुन उत्तर देण्याचा प्रयत्न करतो
- हॅकिंग म्हणजे बऱ्याच प्रकारचे असते ( वेबसाईट हॅकिंग, संगणक हॅकिंग, डाटा हॅकिंग) तसेच हॅक करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. (उदा- डी.डी.ओ.स हल्ला, एस.क्यू.एल इंजेक्शन इत्यादी) सगळ्यात सोपे एस.क्यू.एल इंजेक्शन आहे.

जे लोक चांगल्या कामासाठी हॅकिंग करतात त्यांना पांढऱ्या टोपीचे हॅकर म्हणतात आणी जे वाईट कामासाठी हॅकिंग करतात त्यांना काळ्या टोपीचे हॅकर म्हणतात. आणी करोडो वेबसाईट पैकी बऱ्याच वेबसाईटस ची सुरक्षा हि रोज कामासाठी अथवा सुधारणेसाठी थोडीशी सैल करण्यात येते. याच संधीचा फायदा हॅकर घेतात आणी एखाद्या बिळातून वेबसाईटच्या मुख्य भागात पोहोचतात आणी साईट हॅक करतात.

हॅकिंग पासुन तुमचा संगणक कसा सुरक्षित ठेवालं ?

काही वेळेस संगणक हॅक केला जातो आणी तुमच्या संगणकावर जर इंटरनेट असेल तर तुमच्या संगणकावरील क्षणा-क्षणाची बातमी हॅकर पर्यंत पोहोचते.

* संगणकावरील एन्टीवायरस सतत अद्ययावत करत रहा.
* अनोळखी इमेल तसेच इतर ठिकाणी दिसत असलेल्या असुरक्षित दुव्यावर टिचकी देऊ नका..!!

धन्यवाद..

माझ्या अनुदिनीला भेट द्यायला विसरू नका..!!

इंफोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे