Submitted by अज्ञात on 14 September, 2012 - 09:10
घन मंदावले मन धुंदावले
जळ वाकून वाकून ओघळले
झाकलेल्या कळा आत ओढाळल्या
रंग हिरव्यात दाटल्या ऊन सावल्या
झाडपानात सण पळ श्रावण श्रावण
अंग अंगणात चाहुली पागोळल्या
लवे भरून डोळा कणकण हळवेला
एक एकटाच जीव होई खुळा बावळा
पापणीची स्थिती आळवावी किती
ओठ शब्दांसवे चहु फेर नाचती
नागमोडलेली वाट चिंब ओला घळघाट
नव्या नवरीचा थाट जणू हीच पावती
.........................अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लयबध्द काव्याचं माधूर्य
लयबध्द काव्याचं माधूर्य नेहमीच छान असते. परंतू जसे ते लयबध्दतेचे प्रमाण पाळते तसे काव्य आशयाचे किंव्हा त्यातील अर्थाचे सखोल संदर्भ ( स्पष्टीकरण नव्हे) देणारे असावे. आपल्या या काव्यात अनेक ठिकाणी आपण केवळ लयबध्द्तेसाठी निरर्थक शब्दयोजना केल्यासारखे वाटते. ( वैयक्तीक मत.)
ओठ शब्दांसवे चहु ओर नाचती .... ओर ??? काय अर्थाने हा शब्द योजला आहे? कळले नाही.
-- परंतू आपल्या या रचनेवरून मला माझी 'सांज' ही कविता आठवली. ...धन्यवाद. असो,
कृगैन.