Submitted by मनी on 13 September, 2012 - 20:44
माझ्याकडे सिल्कची साडी आहे पण इकडॅ अमेरिकेत त्याला कशी ड्रायक्लिन करणार, त्याला खुप ठेवणीचा वास येतोय म्हणजे न धुता वापरताच येणार नही. असा धागा आधीच असेल तर मी हा धागा काढून टाकेन.
-----
हा धागा सार्वजनीक आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/26595?page=17 येथे काही सूचना आहेत.
मनी इथे वूलाईट चे ड्रायक्लिन
मनी इथे वूलाईट चे ड्रायक्लिन cloth मिळतात.मला टारगेट मधे मिळाला. त्यावरचे instructions वाचुन घरिच ड्रायक्लिन करता येईल. मी माझे सिल्क चे ड्रेस करते. चांगले रहातात. मी winter coat सुद्धा त्यानेच ड्रायक्लिन करते.
धन्स सगळ्यांचे... मी करुन
धन्स सगळ्यांचे... मी करुन बघते, अशीही साडी पडून पडून खराबच होइल मग वॉश करुनच बघते.
ए काय ग हे
ए काय ग हे ......दुकान्दारन्चे कसे होणार आता? सगळ्या जणी सिल्क च्या साड्या नीट थेवणार ......खरब होणार नाही ....मग टाकणार नाही ...म्ह्णजे नवीन घेणार नाही ....दुकान्दारनो कठिण आहे तुमचे..... :हो हो: :खी खी: :ह ह ग लो :
ड्रायेल किट मिळतात उसगावात.
ड्रायेल किट मिळतात उसगावात. ते उत्तम आहेत.
एरवी साडी ठेवताना वेखंडाच्या पावडरीची पुडी आणि चंदन पावडरीची पुडी ठेवावी घडीत.
कॉटनच्या कापडात गुंडाळून ठेवायची.
उन मुळीच दाखवू नका. रंग विटेल. सिल्कचे रंग आणि उन्हाचं एकमेकांशी चांगलं जमत नाही.
त्यापेक्षा ड्रायेल किट बेस्ट.
किंवा उन्हाळी दिवसात, सावलीत ठेवून हवा देणे.
दमट हवामान असेल तर सिलिकाच्या पुड्या मिळतात त्या कपाटात, गार्मेंट बॅगमधे ठेवणे. त्या दमटपणा शोषून घेतात.
माती-चिखल किंवा सांडलेलं अन्न असं काही असेल तर ओल्या (व्यवस्थित पिळलेल्या) रूमालाने वरच्यावर पुसून घेणे आणि मग ड्रायेल.
अर्थात साडीच्या आतल्या टोकावर ओल्या रूमालाची टेस्ट करणे. धूपछांव रंग असेल तर मुळीच ओला रूमाल वापरू नका.
ऑल द बेस्ट.