Submitted by आर.ए.के. on 13 September, 2012 - 01:44
एकदाच फक्त एकदा तुझ्या आवेगात विरघळायचयं,
तुझ्या डोळ्यांच्या डोहात फक्त एकदाच बुडून मरायचयं!
लपेटून चांदण अंगाभोवती, तु़झ्या छातीवर विसावायचयं,
मोजीत स्वतःच्या श्वासांची लय,एकदाच तुझ्या कुशीत निजायचयं!
एकदाच फक्त एकदा तुझ्या स्वप्नांत शिरायचयं,
तुझ्या स्वप्नांच्या गावात फक्त स्वतःलाच पाहायचयं!
एकदाच फक्त एकदा तुझ्याशी डोळ्यांनी बोलायचयं,
मतभेदांच्या ओरखड्यांना माझ्या अश्रूंनी पुसायचयं!
एकदाच फक्त एकदा तुझ्या जवळ, खूप जवळ यायचयं,
स्पर्शांतून संपणारं अंतर स्पर्शांनीच संपवायचयं!
एकदाच फक्त एकदा हे सगळं मला अनुभवायचयं,
आणि निमिषात या 'एकदाचं' आयुष्य होताना पाहायचयं!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
विभाग्रज धन्यवाद. तुमची
विभाग्रज धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया नेहमी मिळते.
छान.
छान.
मस्त रचना !
मस्त रचना !
एकदाच फक्त एकदा तुझ्या
एकदाच फक्त एकदा तुझ्या स्वप्नांत शिरायचयं,
तुझ्या स्वप्नांच्या गावात फक्त स्वतःलाच पाहायचयं!
एकदाच फक्त एकदा तुझ्याशी डोळ्यांनी बोलायचयं,
मतभेदांच्या ओरखड्यांना माझ्या अश्रूंनी पुसायचयं!
एकदाच फक्त एकदा तुझ्या जवळ, खूप जवळ यायचयं,
स्पर्शांतून संपणारं अंतर स्पर्शांनीच संपवायचयं!
एकदाच फक्त एकदा हे सगळं मला अनुभवायचयं,
आणि निमिषात या 'एकदाचं' आयुष्य होताना पाहायचयं!<<<
वा वा वा
सुंदर, आवडलीच
खूपच हळवी... स्वप्नील कविता
खूपच हळवी... स्वप्नील कविता
बेफ़िकीरजी , अमेलिया मनापासून
बेफ़िकीरजी , अमेलिया मनापासून आभार!