का बांधलास पूल या पोरक्या नदीवर ?

Submitted by तन्मय शेंडे on 12 September, 2012 - 15:40

दाटले नभ अपेक्षांचे, दिपले डोळे काळोखाला
का दाखवलेस चांदणे या रातआंधळ्याला ?

या मुक्या मनाला, रिक्त आशेला
का दिलीस 'ओ' त्या पोकळ्या हाकेला ?

जमली नात्याची जळमटे, होते वासे वाळवीचे
का सारवलेस अंगण या पडक्या घराचे ?

लिहिल्या ओळी, भरूनी दौत आसवांनी
का लावलीस चाल या सुन्या गझलांना ?

वाहले कोरडे प्रवाह ओसाड आठवणींच्या तटावर
का बांधलास पूल या पोरक्या नदीवर ?

- विसरभोळा
१२/०९/२०१२

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमली नात्याची जळमटे, होते वासे वाळवीचे
का सारवलेस अंगण या पडक्या घराचे ?

वाहले कोरडे प्रवाह ओसाड आठवणींच्या तटावर
का बांधलास पूल या पोरक्या नदीवर ?<<<

सुंदर खयाल, ही गझल नाही, पण अनेक ओळींत गझलियत आढळली, शुभेच्छा