पेंच जंगल सफारी

Submitted by लाजो on 10 September, 2012 - 08:35

हाय,

यंदाच्या भारतभेटीत पेंचला वाघ बघायला जायचा विचार आहे. मध्यप्रदेश टुरिझमच्या साईटवरुन माहिती काढली आहे. एमपी टुरिझम सर्व ट्रिप प्लॅन करतात. नागपूर एअरपोर्टहुन पिक / ड्रॉप ऑफ, किपलिंग कोर्ट हॉटेल मधे रहाण्याची, भोजनांची सोय, डे आणि नाईट सफारी वगैरे वगैरे. कुणी केली आहे का एमपी टुरिझमने ऑर्गनाईज केलेली ट्रिप? किपलिंग बद्दल काय मत आहे. कोणाला काहि अनुभव असेल तर सांगाल का प्लिज. तसेच एका साईटवर वाचले की डिसेंबर मधे सफारी नसतात Sad

एकंदरच पेंच बद्दल माहिती हवी आहे.

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या वाचनात असे आले आहे की कोणत्या सीझनमध्ये जाताय ह्याला महत्व आहे. वाघ बघायचा असेल - रादर कोणतेही प्राणी पहायचे असतील तर ( भारतीय) उन्हाळा हा उत्तम सीझन. पाण्याच्या शोधात जनावरे नेहमीच्या ठिकाणांहून बाहेर येण्याच्या शक्यता अधिक. पावसाळ्यात, हिवाळ्यात त्यांना तुलनेने पाणी सहज जंगलाच्या आतल्या भागातही सहजरीत्या उपलब्ध असते, त्यामुळे ते दिसतीलच असे नाही.

शैलजा +१
पण तिकडला उन्हाळा सहन होईल का, हा ही विचार करा. इतकी वर्षं तिकडे राहूनही मी आता उन्हाळ्यात तिकडे जायचं टाळतेच. पण वाघ बघायचा असेल तर उन्हाळ्याला पर्याय नाही. नुसत्या जंगल सफारीत जास्त इंटरेस्ट असेल तर हिवाळा उत्तम. जंगल मस्त गर्द हिरवं असतं अन हवा चांगली असल्याने मजा घेता येते.
पेंच डिसें. मध्ये बंद असेल तर ताडोबाला पण जाऊ शकता. मी सोडून माझ्या सगळ्या कुटुंबियांना तिथे वारंवार वाघ दिसलेत (उन्हाळ्यात अन हिवाळ्यातही). पण उन्हाळ्यात जास्त.

आता त्या बिचार्‍या वाघांचं काही खरं नाही>> उलट ऐश आहे त्यांची.
लाजो त्याना वेगवेगळ्या नावीन्यपुर्ण आणि कल्पक रेसिप्या करुन देइल.
आई वाघीण माझा बछडा / बछडी हे खात नाही ते खात नाही अशा तक्रारी लाजोकडे करतील.
लाजो त्याना त्याच रिसेपीला भन्नाट नाव देवुन त्याच उत्तम प्रेजेन्टेशन कसं करावं ह्याच एक प्रेजेन्टेशन देइल.
Wink

Happy

बाघ बघणेच असेल तर उन्हाळाच. नसेल तर मग हिवाळाअ बेस्ट ऋतु.

झकासराव अगदी पटलं बरं , वर दिलेल्या शब्दखुणाच बघ ना <<< संस्था जंगल सफारी पेंच लाजो वाघ सोयीसुविधा >>> Proud आता मात्र पळायला पाहीजे Smiley