Submitted by रसप on 10 September, 2012 - 05:09
एक एकटाकी गझल माझीही..
पहिला शेर - १२:३२ (१० सप्टेंबर २०१२)
शेवटचा शेर - १२:५८ (१० सप्टेंबर २०१२)
इथे-तिथे पडतात गझल बेसुमार हल्ली
फुटकळ लिहिणाराही झाला हुशार हल्ली
अनुभूती अन् अभिव्यक्तीचा पत्ता नाही
सांभाळुन वृत्तास लिहावे टुकार हल्ली
शेपुट म्हणून जोडुन द्यावे रदिफ-कवाफी
मिसरे सरपटणारे झाले चिकार हल्ली
चुलीवरी दुसऱ्याच कुणाच्या शिजवा खिचडी
चोरीलाही म्हणता येते उधार हल्ली
आविर्भाव असा आणा की 'गझलदेव मी'
खरे काय? हा कुणी करेना विचार हल्ली
'जितू' तुझा तू तुझ्याचपुरता होय शहाणा
ज्याला त्याला अभिमानाचा विकार हल्ली !
....रसप....
१० सप्टेंबर २०१२
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानै
छानै
कोणताही संदर्भ न लावता एक गझल
कोणताही संदर्भ न लावता एक गझल म्हणुन वाचली
आवडली
संदर्भ लावल्यास अजून आवडली
अगदी खरे, रणजीत दुसर्याच्या
अगदी खरे, रणजीत
दुसर्याच्या साहित्याला चांगले म्हणणे कमीपणा वाट्तोय. स्वतःच्या रद्द्ड साहित्याचा तोरा मिरवला जातोय.
कड्डक!!! बोले तो
कड्डक!!!
बोले तो झक्क्कास!!
बाकी प्रस्तावनेकडे दुर्लक्ष!
अपूर्ण वाटतेय गझल...... फोन
अपूर्ण वाटतेय गझल...... फोन नंबर नाही !
गझल आवडली
गझल आवडली
अपूर्ण वाटतेय गझल...... फोन
अपूर्ण वाटतेय गझल...... फोन नंबर नाही !
>>>>>>>>>
एकटाकी गझल अप्रतिम.
सुधाकरजी
सुधाकरजी
>>>अपूर्ण वाटतेय गझल......
>>>अपूर्ण वाटतेय गझल...... फोन नंबर नाही !
बहुतेक ’फझल’ असावी!
फझल=फसलेली गझल!
अभिनन्दन जितू तुझ्या जबरदस्त
अभिनन्दन जितू
तुझ्या जबरदस्त प्रतिभाशक्तीचा अत्यन्त सही नमूना आहे ही रचना
खूप छान !!
धन्यवाद
कॉलिंग बेफुली गझला "पाडतात"
कॉलिंग बेफुली
गझला "पाडतात" म्हणे? फॅब्रिकेटेड?
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार !!
वैवकु,
आविर्भाव असा आणा की 'गझलदेव मी'
खरे काय? हा कुणी करेना विचार हल्ली
ह्या शेराविषयी तुझे मत काय आहे ?
प्रासादिकता, अनुभूतीनिष्ठा, लेखनगर्भनिष्ठा, चिंतनशीलता, एकंदरित परिणामकारकता जाणवली का?
की सपाट वाटला ? अभिव्यक्तीरहित वाटला ? की अर्थपूर्णतेच्या कसोटीस कमजोर ठरला ?
'सरपटणारे मिसरे....' आणि 'खिचडी शिजवणे...' ह्या शेरांवरही तुझे मत जाणून घ्यायला आवडेल.
तसेच ह्या गझलेचा मतला मी एका स्वघोषित नवगझलकाराला ऐकविला, तेव्हा तो लालीलाल झाला होता. तुला हा मतला वाचून कसं वाटलं ?