भेट

Submitted by prafulladutta on 8 September, 2012 - 18:50

कितीतरी वर्षांनी हि आहे भेट
आणि गेलो मी भूतकाळात थेट
काय ते दिवस होते आणि रात्रीचे उसासे
तेंव्हासारखे नाही कधी वाटले हसावेसे

तुझ्या तारुण्याची बहरलेली बाग आणि
अवघडून केलेला आठवतो तो कटाक्ष
घायाळ करून अजून मला हुरहूर लावतो
जरी त्याला खूप झाला अवकाश

वेण्यामधली मोगऱ्याची माळलेली फुले
कुठे गेले ते चांदण्यांचे जग वेगळे
पावसाची रिम झिम , वळचणीला आपण दोघे
आठवतांना होतात अजून रोमांच उभे

दुरून जेंव्हा येत असे वाऱ्याची झुळूक हळुवार
तुझ्या केसाची बट करी मला बेचैन वारंवार
पिवळ्या साडीतली छबी तुझी आठवते अनेकदा
निरागस चेहरा तुझा पहावासा वाटतो पुन्हा एकदा

देवाने तयार केली अनेक वेदना अन दुख्खे
म्हणून वाटे जन्मास येवू नये ग सखे
सहीन अनेक दुख्खे अन अगणित वेदना
माझी होशील तर घेईन हा जन्म पुन्हा

Group content visibility: 
Public - accessible to all site users