Submitted by prafulladutta on 5 September, 2012 - 15:17
तू नसतेस तेंव्हा
दिवस किती उदास होतात
आकाश ढगाळ होते
पावसाची रिप रिप
तोच चहा मचूळ
अन डोक्यात एकच खूळ
कधी तू दिसशील
आणि खळखळून हसशील
निरागस तुझ्या चेहऱ्यावर
काळेभोर डोळे आणि एक प्रश्न
एवढे काय बघताय
काही का चुकलय ?
कधी कळेल तुला
चूक मी करतोय
खोल दरीत मीच उडी मारतोय
कळून तरी म्हणा काय होईल
तू दूर दूर जाशील
तुला काही होणार नाही
पण मी मात्र पाताळात
कायमचा होईन बंदिस्त
इतर अनेक असतील तुझ्या
रोज पडणाऱ्या स्वप्नात
तरीही करशील का जागा
माझ्यासाठी थोडीशी तुझ्या मनात?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा