Submitted by मोहन वैद्य on 4 September, 2012 - 08:17
हास्यापुढे तुझ्या एक
लाजली फुले अनेक
डोळ्यात ज्योति बघुनि
मंद शशी तो गगनी
कुंतल ते भुरभुरले
ढग काळे ग पडले
वारा हलवी कुंडले
मन माझे नादावले
पदर तुझा हलला
श्वास माझा हुकला
गीत मनी उमलले
पण शब्द मूक झाले
डोळे जरी मी मिटले
चित्र चित्ती ते राहिले
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
छान
छान
श्री वैभव व श्री सुधाकर,
श्री वैभव व श्री सुधाकर,
प्रतिसादाबद्धल धन्यवाद.