Submitted by सुप्रिया जाधव. on 3 September, 2012 - 13:05
मनाच्या आतलं
खुप आतलं
जे खोलवर साचतं...
ते सगळच काही बोलता येत नसतं !
जगाला दिसतं
तसं नसतं !
जे नेमक असतं...
ते सगळच काही सांगता येत नसतं !
मनाला पटतं
मन झटतं
जे आवश्यकही असतं...
ते सगळच काही करता येत नसतं !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते सगळच काही करता येत नसतं
ते सगळच काही करता येत नसतं !
>>
खरय अगदी
छान ... पण सुप्रियाजी, इथे
छान ... पण सुप्रियाजी,
इथे ... असत...नसत.....दिसत... साचत. या प्रत्यक यमकाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार हवा.
कृगैन.
धन्स चिखल्या, सुधाकरराव !
धन्स चिखल्या, सुधाकरराव !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)