प्रेम... प्रेम नाम है मेरा... घाबरू नका मी ईथे प्रेम चोपडा वर नाही लिहिनार आहे.. तर मी लिहिनार आहे प्रेम हे नाव ज्याने फेमस केले ,खुपदा वादात सापडुनही , ज्याच्यावर त्याच्या चाहत्यांनी (त्यात मी ही आले) मनापासुन प्रेम केले त्या सलमान खान वर..
सलमान म्हटंल की समोर येतो ते एकदा तरी अंगातला शर्ट काढुन टाकणारा, चित्रविचीत्र स्टेप करत हिट गाणी देणारा एक अॅक्टर.
पुर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान , जन्म २७ डिसेंबर १९६५, प्रसिध्द पटकथा लेखक सलीम खान ह्यांच्या सलमा ह्या पहिल्या बायको पासुन जन्मलेला सगळ्यात मोठा अनुभवले . त्याने लहान पासुन फिल्मी वातावरण आजुबाजुला अनुभवले. त्याने पहिला चित्रपट स्विकारला तो सहाय्यक अभिनेता म्हणुन " बिवी हो तो ऐसी" मध्ये. त्यात त्याला काही फारसा भाव नव्हता.
खर्या अर्थाने सलमान ला प्रकाशझोतात यायला ३ वर्ष जायला लागली.. १९८९ ला सुरज बडजात्यांच्या "मै ने प्यार किया" आला. .आणि प्रेम सगळ्यांना वेडा वुन गेला.. दोस्ती मै नो सॉरी नो थॅक्यु म्हनत दोस्ती प्रेमाची पहिली पायरी असते हे शिकवुन गेला. भाग्यश्री आणि सलमान रातोरात स्टार झाले.. ह्या चित्रपटाने त्याला त्याचं पहिलं फिल्मफेयर पुरस्कार 'सर्वश्रेष्ठ पदार्पण' साठीच पुरस्कार मिळाला बरोबरच सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचं नामांकन ही मिळालं.. नंतर आलेल्या 'बागी',' पत्थर के फुल', 'सनम बेवफा', 'कुबान' ,'लव्ह', 'साजन' ह्या चित्रपटांनी बॉक्सऑफिस वर दणदणीत यश मिळवले. 'अंदाज अपना अपना' मध्ये आमिर खान बरोबरची त्याची केमिस्ट्री अशक्य आहे. त्यातला प्रेम चित्रपटात पण आणि शेवटी पण भाव खाऊन जातो. त्यातलं 'उई मां,..' वर अजुनही मी खळाळुन हसते.
त्यानंतर सुरज बडजात्या बरोबर पुन्हा एकदा माधुरी सह पहिला फॅमिली ड्रामा ' हम आपके है कौन' ने बॉक्सऑफिस दणाणुन सोडले. मी व्हीसीआर वर पाहिलेला हा पहिला पिक्चर. काक्या , माम्या पदर डोळ्याला ला वुन बसायच्या सेकंड हाफमध्ये. या पि क्चर नंतर नवर्या मुलाचे बुट पळवायची पद्धत सुरू झाली. आम्ही पण ते उद्योग करून बघितले.
'जुडवा ' मधल्या ईस्ट ऑर वेस्ट ईंडिया इझ द बेस्ट' गाण्याने वेड लावले.. नंतर आम्ही फालतु चित्रकार भारताच्या झेंड्याचा खाली स्लोगन म्हनुन हे लिहायला लागलो. नंतर आला तो 'प्यार किया तो डरना क्या'. हा पिक्चर माझ्या आयुष्यात खास आहे कारण कळ्त्या वयात टॉकीजला जावुन बघितलेला पहिला पिक्चर. ह्या पिक्चर नंतर माझ्या भावाने सलमान सारखे कपाळाच्या दोन्ही कोपर्यातले केस काढुन ट्क्कल केले होते..
१९९८ ला आलेल्या करण जोहर च्या ' कुछ कुछ होता है' म धील अमन ने त्याला त्या व र्षाचा सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचं अॅवॉर्ड ही मिळवुन दिले. त्यानंतर आला उर्मिला बरोबरचा 'जानम समझा करो', त्यातला गुलछबु नायक जितका आवडला तितकाच 'बंधन' मधला बहिणीसाठी जीव पण ओवाळुन टाकनारा भाऊ पण मानापासुन भावला.
'हम दिल दे चु के सनम' मधला नंदिनीसाठी तळमळणारा समीर बघताना वाटलं अजय लाच निवडायचं होत तर समीर कड परत यायचंच कशाला? तेव्हापासुन ऐश्वर्या आवडेनाशी झाली ते आजतागायत.. त्याच 'तडप तडप के...' ऐकताना डोळे कधीही पाणावतात.
२००२ साल सलमान साठी अपशकुनी ठरलं .. कोणतेही खास न चाललेले पिक्चर, त्यात भर पड्ली ती 'हिट अँड रन' केसची. त्यात १ मॄत्युमुखी तर ३ जखमी. ऐश्वर्या बरोबर त्याचं झालेलं ब्रेकअप खुप गाजले . तिला शु टींग वर त्याने केलेला राडा, त्यातुनही पझेसिव्ह प्रियकर दिसला.त्यानंतर २००६ साली 'हम साथ साथ है' चे शुटींग करताना 'चिंकारा' शिकार केस ह्या सगळ्या मुळे त्याची 'बॅड बॉय' अशी ईमेज झाली. आजवरच्या भुमिकेतल्या सगळ्यात माझ्या आवडीची भुमिका ही 'हम साथ साथ है' मधला प्रेम.. शांत, आईचा आज्ञाकारी मुलगा पण वाटणी झाल्यावर आई वरही मुकपणे रागावणारा मनापासुन आवडला. सोनाली बरोबरचा संयमी प्रियकर बघुन मनात जीवनतला जोडीदार ही असाच वाटुन गेले. ( अगदी तेव्हा देव कदाचित माझं मनातले ऐकत असेल म्हनुन मिळालाही , नावही सलमानने निभावलेल्या भुमिकेचेच-समीर)
२००३ ला आलेल्या 'तेरे नाम' ने देवदास बनलेल्या प्रियकरांना जणुकाही आसराच दिला. त्याच्या 'हट के' हेअर स्टाईला तरुणाई ने डोक्यावर घेतले. आनि गल्ली गल्ली तही 'राधे' दिसु लागले... आणि आम्ही मुलीनी पुस्तकात मोरपंख ठेवायला...
नंतर आलेल्या मुझसे शादी करोगे, नो एन्ट्री मध्यी कॉमिक रोल मध्येही प्रेमने भाव खाल्ला. २०१० मध्ये 'दबंग' च्या चुलबुल पांडे ही चुलबुला वाटला. ह्या पिक्चरने हिंदी चित्रपट सृष्टीत परत मारझोडपटांचा ट्रेंड सेट केला. ईथेही त्याची पाठीवर गॉगल लट्कवणे, छोटीशी मिशी पॉप्युलर झाली. नंतर 'रेडी', 'वाँटेड','बॉडीगार्ड' ने सलग दण्दणीत यश मिळवले. आणी सलमान २०११ चा सगळ्यात यशस्वी अभिनेता बनला. सलमानच्या पिक्चरनी १०० करोड ट्रेंड सेट केला. त्यातल्या गाण्यांनी तर तरुणाईला नाही तर लहान मुलांनाही आपल्या तालावर नाचवले. नुकत्याच आलेल्या 'एक था टायगर' ने तर आजपर्यतचे तिकिट वि़क्रीचे सगळे विक्रम मोडीत काढले.
'मैने एकबार कमिट्मेंट करली तो मै आप ने आप की भी नहीं सुनता' ह्या त्याच्याच डायलॉग नुसार त्याने दोस्ती साठी कमिट्मेंट केल्या आणी निभावल्या पण तशीच दुष्मनी पण. शाहरुख, विवेक बरोबरची दुष्मनी अजुन्ही गाजतेय. त्याची 'बीईंग ह्युमन' ही संस्था बरेच समाजोपयोगी काम करतेय. त्याच्या दिल दार पणाच्या गुणाचा खुपजणांनी अनुभव घेतलाय.
कोणी काही ही म्हनो, 'ही इझ कंप्लीट एंट्रटेनमेन्ट पॅकेज' .......
टिपः सगळी प्रचि आंतरजालावरुन साभार...( टायटल सहाय्य- माझा प्रेम (समीर))
या पि क्चर नंतर नवर्या मुलाचे
या पि क्चर नंतर नवर्या मुलाचे बुट पळवायची पद्धत सुरू झाली. >> कायतरीच. गोव्यात तर आधी पासुनच असते की हो ही प्रथा.
भाई +१
भाई +१
२००२ साल सलमान साठी अपशकुनी
२००२ साल सलमान साठी अपशकुनी ठरलं .. कोणतेही खास न चाललेले पिक्चर, त्यात भर पड्ली ती 'हिट अँड रन' केसची. त्यात १ मॄत्युमुखी तर ३ जखमी. >> सॉरी पण मला तर दोष नसताना मृत्युमुखी पडलेला/जखमी झालेल्यांसाठीच ते वर्ष/सलमान जास्त अपशकुनी ठरल्यासारखं वाटतय...
सलमानची खासियत ही आहे की
सलमानची खासियत ही आहे की त्याला त्याचे वीकनेस माहित आहेत.
त्यामुळे तो त्याच्या ष्टाइलचे चित्रपट करतो आणि यशस्वी होतो. (उगाच बेडकाचा बैल होण्याच्या प्रयत्नात पडत नाही रुक रुक सारखं :))
अर्थात तो मला फारसा आवडला नव्हताच कधी. (अंदाज अपना अपना सोडुन). वाँटेड मध्ये मात्र आवडला.
नंतर आलेले दबंग वै पाहिले पण वाँटेडच जास्त भारी वाटला.
चिंकारा केस आणि हिट & रन मुळे मात्र तो नजरेतुन खुप उतरला होता / आहे हे खरं.
लेखनाचा पहिलाच प्रयत्न
लेखनाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे तितकसं जमलेलं नाहीये, हे मान्य. गोव्यामध्ये ती प्रथा आधी पासुन होती हे माहिती नव्हते. सांगितल्याबद्द्ल धन्स.
पण मला वाटते की सलमान कसाही असला तरी त्याचा एक मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या वयाच्या निम्म्या वयाच्या पोरीच काय त्या चे पिक्चर आले तव्हा ज्यांचे जन्म सुध्दा नाही त्या मुली अजुन त्याच्या वर फिदा होताना बघितलय मी
नवर्या मुलाचे बूट पळवायची
नवर्या मुलाचे बूट पळवायची पद्धत आमच्यातही असते.. आम्ही म्हणजे कोकणातले आणि मराठा.. आमच्यात लग्नानंतर पाचपर्तावन म्हणून एक समारंभ असतो ज्यात मुलाकडचे किमान ५ जण मुलीकडे नॉनवेज जेवायला जातात.. किमान ५ असले तरी बरेच जाता ती गोष्ट वेगळी.. या वेळी नवरा आणि त्याच्यासोबतीचे पंगतीत जेवत असताना त्याचे बूट लपवतात.. बदल्यात ऐपतीनुसार पैसे उकळले जातात.. हे पैसे बूटाच्या किंमतीपेक्षा जास्तही असू शकतात..
असो,
सलमानच्या काही अदा, काही चित्रपट आपल्याही आवडीचे.. अंदाज अपना अपना मधील सलमानचा "ऊई मा" आणि आमीरचा "आईला" झकासच... ऑल टाईम फेवरेट विनोदी चित्रपट..
प्यार किया तो डरना क्या मध्ये तर तो खूप खूप आवडला होता... असा सलमान पुन्हा बघायला तरसतो आहे मी..
बागबान आणि हम साथ साथ है मधील गुणी बाळ, श्रावण बाळ सलमान छोट्याश्या भुमिकांमध्येही भाव खाऊन जातो..
थॅक्यु अभिषेक...
थॅक्यु अभिषेक...
मस्त लेख पण खुप थोडक्यात
मस्त लेख पण खुप थोडक्यात आवरलास. 'बिईंग ह्युमन'चा उल्लेख राहीला. कुठल्यावर स्टेजशोवर आल्यावर जर तिथे लहान मुले असतील तर त्यांच्यात लहानाहून लहान होऊन नाचणारा सलमान राहुन गेलाय...
पर डे वर काम करणारे कलाकार, स्पॉटबॉईज यांच्यासाठी मनापासून झटणार्या सलमानबद्दल लिहायचे राहुनच गेलेय. सलमानला बघीतले की मला नेहमीच शाहरुखचे ते गाणे आठवते...
"वो तो है अलबेला.., हजारोमें अकेला..
सदा तुमने ऐब देखा, हुनरको ना देखा.... !
शुभेच्छा
विशालभाऊ +१
विशालभाऊ
+१
ज्याच्या 'बाजूने'
ज्याच्या 'बाजूने' लिहिणार्यांपेक्षा त्याच्या 'विरुद्ध' लिहिणार्यांची संख्या जास्त असू शकते अशा अभिनेत्यामध्ये सलमान खान मोडतो. कसेही असले तरी सलमान खान नावाचा एक 'Aura' आहेच आहे हे सर्वमान्य व्हावे. निर्मात्यांना तो एक नंबरी रीटर्न्स देतो आणि ज्याच्या नावावरच तिकिटबारीवर झुंबड उडते अशा मोजक्या अभिनेत्यामध्ये त्याचा बराच वरचा क्रमांक लागतो....[आमीर आणि शाहरूख या यादीत जरूर येतात, पण त्यांच्या चित्रपटांना 'गर्दी' होते....'झुंबड' फक्त सलमानसाठीच.]
दीपाली काटे यांच्या भाषाशैलीवरून त्या 'प्रेम'च्या किती दिवानी आहेत हे चटदिशी समजून येते....जे त्यानी बिलकूल लपवून ठेवलेले नाही... किंबहुना त्यामुळेच हा लेख हा सलमानच्या कारकिर्दीचा नसून त्याच्यावरील भक्तीचा झाला आहे.
अशोक पाटील
बरोबर आहे, अशोकराव. सल्लू हा
बरोबर आहे, अशोकराव.
सल्लू हा 'हिरो' आहे, नि:संशय. पण त्याने 'अभिनेता' व्हायचा कधी प्रयत्नही केला नाही. दिसण्यावर आणि स्टाईलवर सगळे निभावून न्यायचे असे ठरवलेले दिसते. त्याच्या 'वॉन्टेड' नंतरच्या वाटचालीकडे पाहून आता वेगळी काही अपेक्षाही नाही...
शाहरुखच्या खात्यावर निदान एखादा स्वदेस, एखादा चक दे तरी आहे. सल्लूमियांकडे तेही नाही. अर्थात कोटींचा बिझनेस चालू आहे तोवर असल्या गोष्टींचे नो टेन्शन !
फिर मिलेँगे मधे त्याने
फिर मिलेँगे मधे त्याने थोडाफार प्रयत्न केलाय
एक था टायगर मुळे सलमानने
एक था टायगर मुळे सलमानने कलेक्शन २०० कोटी असा क्लब सुरु केलाय..
धन्यवाद सगळ्यांना आवर्जुन
धन्यवाद सगळ्यांना आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल.. शेवट्चा दि वस आनि अगदी 11th hour ला लिहा यचे ठरलं सो लेख आटोपता घेतला..
विशालभाऊ.. 'बिईंग ह्युमन'चा उल्लेख राहीला. >> त्याचा अगदी ओझर ता उल्लेख केलाय."त्याची 'बीईंग ह्युमन' ही संस्था बरेच समाजोपयोगी काम करतेय. त्याच्या दिल दार पणाच्या गुणाचा खुपजणांनी अनुभव घेतलाय."
वन एन्ड ओन्ली सलमान असा लेख.
वन एन्ड ओन्ली सलमान असा लेख. घाईघाईत असला तरी बराच चांगला आढावा घेतला गेलाय. सलमानच्या भाषेत सांगायचं तर तो प्रत्येक सिनेमात अभिनय करणे किंवा भुमिकेत शिरणे या प्रकारात शिरत नाही. डायरेक्टरला जे हवय ते करण्याचा प्रयत्न करतो आणि कोणत्याही भुमिकेत सलमान हा सलमानच असतो. त्यामुळे त्याची कॉमेडी, डान्स हे सुद्धा वेगळ्या पठडीतले वाटतात. दबंगमधल्या काही स्टेप्स त्याच्या स्वत:चाच आहेत. फराह खानने प्रयत्न केलेल्या स्टेप्स त्याने स्वतःच्या पद्धतीने केल्या आणि त्या हिट झाल्या. सलमान म्हणजे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू खुलेआम सर्वांसमोर मांडून मोकळा असलेला अभिनेता. त्याच्या वाईट बाजूंसाठी त्याचा तिरस्कार आहेच आणि चांगल्या गोष्टींसाठी सलामसुद्धा.
माझाहि तो खुप आवडता.. कलाकार
माझाहि तो खुप आवडता.. कलाकार अन त्याच्या स्वभावामुळे
विशालच्या संपुर्ण पोष्टला
विशालच्या संपुर्ण पोष्टला अनुमोदन.
सलमान मध्ये एक चांगली व्यक्ती नेहमी डोकावते. इर्ररिस्पेक्टीव्ह ऑफ हिज राँग डिड्स.
दिपाली +१००० सलमान माझा तर
दिपाली +१०००
सलमान माझा तर आवड़ताच
पण माझ्या मुलाचा पण फेवरेट 

छान लिहिले आहेस आपल्या आवडत्या सल्लू बद्दल !!!
आभार मानु नकोस कारण 'दोस्ती में नो थॅन्क्यू, नो सॉरी'
परत एकदा आभार सगळ्यांचे..
परत एकदा आभार सगळ्यांचे..
२००२ साल सलमान साठी अपशकुनी
२००२ साल सलमान साठी अपशकुनी ठरलं .. कोणतेही खास न चाललेले पिक्चर, त्यात भर पड्ली ती 'हिट अँड रन' केसची. त्यात १ मॄत्युमुखी तर ३ जखमी. >> सॉरी पण मला तर दोष नसताना मृत्युमुखी पडलेला/जखमी झालेल्यांसाठीच ते वर्ष/सलमान जास्त अपशकुनी ठरल्यासारखं वाटतय...
>>>>>>> १००% अनुमोदन. आणि त्याची जबाबदारीहि त्याने घेतली नाहि. त्याच्यामुळे कोणीतरी मरण पावलय,कोणाचातरी संसार उध्वस्त झालाय्,त्यामुळे तो नाहिच आवडत.
मला सलमान आवडत
मला सलमान आवडत नाही...सुरुवातीचे काही चित्रपट बघितले.. पण त्यानंतर जे माकडचाळे सुरु केलेत (हॅल्लो ब्रदर्स) टाईप त्यातुन डोक्यात जाउ लागला.. त्यांनतर सगळी प्रकरणे बघितल्या नंतर..अजुनच ... त्यामुळे त्याच्या बिईंग ह्युमन' चा काहीच उपयोग नाही..
त्याच्या वाईट बाजूंसाठी
त्याच्या वाईट बाजूंसाठी त्याचा तिरस्कार आहेच आणि चांगल्या गोष्टींसाठी सलामसुद्धा>> +१०१
सही सही शब्दात लिहिलय जे माझ्याच मनात होतं.
"वो तो है अलबेला.., हजारोमें
"वो तो है अलबेला.., हजारोमें अकेला..
सदा तुमने ऐब देखा, हुनरको ना देखा.... !>>>> खरच
माझाही आवडता कलाकार