Submitted by भारती.. on 31 August, 2012 - 06:10
पुनर्वसन
क्षीण वहातात व्यवहार
पडझड झालेल्या शहरात;
पराभूत सैन्य येतं परतून
ठणकत्या रस्त्यांमधून.
एकएक करून खचलेली
पायांखालची प्रयोजने;
निळ्या पोकळीशी उरते
सख्खे तिरस्काराचे नाते.
भ्रमांची वस्त्रे उतरवून
नग्न होते आयुष्याची शापमयता;
महाकाव्यांमधला अंधार
हृदयात बरसतो धुवांधार.
श्वासागणिक ठळक होते
तपशिलांचे भान ;
हानीची आकडेवारी
पुनर्वसनाची तयारी.
बधिर संवेदनांमध्ये
संथ गतीने चढतात
जुन्या विकारांचे विखार ;
फायद्यातोट्यांचे व्यापार.
खोल आत,कुण्या एकाच्या
मनात तळमळतो
अशांत किनारा. झोंबतात लाटा.
बाकी सर्वत्र शहाणा सन्नाटा.
भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा व्वा
व्वा व्वा
ओ हो हो - अप्रतिम.....
ओ हो हो - अप्रतिम.....
धन्स बेफिकीर, शशांकजी..'
धन्स बेफिकीर, शशांकजी..' रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ' असेच आहे सारे.
वा!
वा!
भारतीजी, ... पुन्हा एक
भारतीजी, ... पुन्हा एक अफलातून आनंद दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
एकएक करून खचलेली
पायांखालची प्रयोजने;
निळ्या पोकळीशी उरते
सख्खे तिरस्काराचे नाते. .... हे अतिशय छान. खुप म्हणजे खुपच आवडले. अशिच पुर्ण कविता खुप छान आहे.
फक्त एकच..................
भ्रमांची वस्त्रे उतरवून
नग्न होते आयुष्याची शापमयता; ........................ इथे,
भ्रमांची वस्त्रे उतरवून
नग्न होते शापित आयुष्य हे ............... असे असते तर छान वाटले असते.
---------------- कारण शापमयता कधी नग्न होत नसते. शाप हाच आपल्या आयुष्याला नग्न करत असतो.(वै.मत.)
कृगैन.
दिवसातून आताच थोडा वेळ
दिवसातून आताच थोडा वेळ मिळाला़।
खूप आनन्दं दिलात.
धन्यवाद
साती,सुधाकर, वैभव खूप आभार
साती,सुधाकर, वैभव खूप आभार नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिलात भरभरून..
सुधाकर नाही हं मला मूळ शब्दच भावतात..तसेच मनाच्या डोळ्यांना दिसतात,.कृगैन :))
छान भारती नेहमी प्रमाणेच.
छान भारती नेहमी प्रमाणेच. पुस्तक कधी येणारे
छानच !
छानच !
धन्स अश्विनीमामी..काय सांगू
धन्स अश्विनीमामी..काय सांगू कवितेच्या कथा.. गेले सहा महिने एक पुस्तकात जीव अडकलाय .. पण काही कारणांनी रखडले सगळे. काही रस्ता निघाला तर अवश्य कळवेन. :)) तुमच्या सदिच्छा आहेतच.
आभार मुक्तेश्वरजी..
छान कविता !
छान कविता !
आभार राजीवजी..
आभार राजीवजी..
छान कविता.
छान कविता.