कळेल का?

Submitted by suneha on 31 August, 2012 - 02:06

कळत नाही का तुला,
माझं उगीचच काहीतरी विचारणं?
मनात वादळं असताना,
हवा-पाण्याच्या चौकशा करणं?

कळत नाही का तुला,
तुझ्याशी वरवर हसून बोलणं, अन
तुझ्या काळजीचा डोंगर लपवून
बेफिकिरीचा आव आणणं?

कळत नाही का तुला,
तुझ्या हलक्या बोलण्या मागचं
ओझं जाणणं अन माझं दबून जाणं.
तुझ्या श्वास-लयीचा फरक टिपत
दुरूनही तुझ्या जवळ राहणं?
नेहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users