विषय क्रमांक १: तू शायर है.......मै तेरी शायरी!

Submitted by टोकूरिका on 31 August, 2012 - 01:15

मला मराठी असण्याचा अभिमान असण्याच्या अनेकानेक कारणांपैकी Madhuri-producer_290612120629132859.jpgही सुद्धा एक कारण! तिच्या वयाच्या सतराव्या वर्षीच तिला राजश्री प्रॉडक्शन्सचा ''अबोध'' (१९८४) मिळाला...पण त्यात तिचं 5555.jpg आणि images.jpg असलं साधं रूप पाहून येत्या मोजक्या वर्षात ही बया तमाम तरुणांच्या दिल की धडकन बनेल हा विचारही कुणाच्या मनाला शिवला नसावा! पण तिचा जन्मच कदाचित चित्रपटसृष्टीवर अन ओघाने प्रेक्षकांच्या ह्रदयावर राज्य करण्यासाठी झाला होता!

मुंबईत वास्तव्यास असलेल्या सौ. स्नेहलता व श्री. शंकर दिक्षित या कोकणस्थ ब्राह्मण दांपत्याच्या या मुलीला अभिनेत्री नव्हे तर मायक्रोबायोलॉजिस्ट व्हायचं होतं. त्यासाठी ती पार्ल्याच्या महाविद्यालयात बायोलॉजीचं शिक्षणही घेत होती. कथ्थक मात्र ती आवडीने शिकली होती. थोडक्यात अभिनयक्षेत्रात पदार्पणाची संधी तिच्या आयुष्यात ओघाने आली होती. मात्र या संधीचं सोनं करताना तिने कोणतीच कसर सोडली नाही! करीअरच्या सुरूवातीच्या काळात तिलाही संघर्ष चुकला नव्हताच...अबोध, आवारा बाप, स्वाती, मानव हत्या, मोहरे, हिफाझत, उत्तर-दक्षिण, खतरो के खिलाडी आणि दयावान असे तब्बल नऊ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अवतरला एन चंद्रांचा ''तेजाब''! (१९८८) tejab.jpgयातल्या '' एक दो तीन'' गाण्याने तिने तरूणाईलाच नव्हे तर आबालवृद्धांना वेड लावलं....उत्कृष्ट अभिनयाच्या जोडीने तिच्या डोळ्यांच्या मोहक हालचाली अन उत्तम नृत्य साकारण्याच्या कलेच्या बळावर तिने तेजाबमधील भुमिकेसाठी तिचं पहिलंवहिलं फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळवलं. अन मग ती सज्ज झाली tejab2.jpg ''एक दो तीन'' करत करत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घ्यायला...की मनावर घाव घालायला!

अस्सल मराठी सौंदर्य काय असतं हे तिने बॉलीवूडला दाखवलंच..पण तेवढ्यावर न भागवता ती अस्खलित अभिनयाने यशाची शिखरं पादाक्रांत करत गेली. तिला प्रत्येक भुमिका जमायची. मग ती राम लखन (१९८९) मधली साधी, घाबरट ''राधा'' असो किंवा ''राजा'' (१९९५) मधली बिनधास्त ''मधू'' madhuri032.jpg असो नाहीतर ''दिल'' (१९९०) मधली अमीर बाप की बिगडी बेटी ''मधू'' 11.jpg असो!

माझ्या मनावर राज्य करायला तिने सुरूवात केली ती १९९४ च्या ''हम आपके है कौन'' salman.jpgपासून. पुन्हा एकदा राजश्री प्रॉडक्शन तिच्या यशात मोलाचा मानकरी ठरले. तेव्हापासून मला ह्या बयेचं एवढं वेड लागलं की तिच्या चित्रपटांची पारायणं मी सुरू केली ती आजवर थांबलेली नाहीत. ''तेजाब'' आणि ''दिल'' मी नुसतेच पाहिले होते. पण एच ए एच के मी अक्षरशः जगलेय! असंख्यवेळा पाहूनही मन भरत नसल्याने यापुढेही प्रत्येक वेळी नव्याने पाहणार आहे. अभिनयाचे विविध पैलू उलगडायची संधी तिला या चित्रपटाने दिली. पूर्वार्धात खट्याळ अन बालिश असलेली पण बहिणीच्या मृत्यूनंतर तेवढीच हळवी अन समंजस झालेली निशा तिने अप्रतिमरित्या साकारली! तिचा पडद्यावरचा सहज वावर मन स्पर्शून जातो. यातल्या तिच्या चेहर्‍यावरच्या हावभावाच्या छटा क्षणात बदलण्याची अदा काही औरच होती! हा अभिनय ती एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री असल्याचे सिद्ध करून गेला. या चित्रपटानंतर मी तिची खरोखर दिवानी झाले Happy तिच्या '' ये मौसम का जादू'' गीतातल्या लाल फ्रॉकसारखा सेम फ्रॉक मी आईकडून शिवून घेतला होता तेव्हा.....थोडक्यात मी स्वतःसोबत घरातल्या इतरांनाही ह्या सोनेरी हास्याच्या परीचं वेड लावलं! तिचं नजराणा टॉकीजचं हे ice cream.jpgपोस्टर पाहून माझ्या भावाने तर रोज आईसक्रीम मिळणार म्हणून डायरेक्ट तिच्याशी विवाहबद्ध होण्याचा पणच करून टाकला! Proud भावाचे त्यावेळचे वय वर्षे ४ Lol

तिच्या घरचे तिला लाडाने ''बबली'' म्हणत. अगदी साजेसं टोपणनाव होतं नै?? तिच्या टपोर्‍या डोळ्यांना पाहून अन ते अजीबोगरीबरित्या फिरवण्याच्या कलेमुळे ( राजामधलं अखिया मिलाऊ गाणं नैतर तेजाबमधला अनिल कपूर मंदाकिनीला हिच्या समोरून सायकॉलॉजी शिकवायला नेतो, तेव्हाचा''मोहिनी अब घर जाके भजन करो'' हा सीन आठवा Happy ) तेजाबमध्ये तिच्या भुमिकेला ''मोहिनी'' नाव दिले गेले असावे असे मला नेहमीच वाटत आले आहे.

दोन वर्षापूर्वी हुकलेली बाजी अखेर तिने १९९० मध्ये जिंकलीच! ''दिल'' साठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. साजन मध्ये ही दोन-दोन चिकने-चुपडे नायक असतानाही न पाहिलेल्या शायरवर निस्सीम प्रेम करणारी पूजा भाव खाऊन गेली. याच वर्षात आलेला सैलाब आणि त्यातली '' हमकोssss आजकल हैsss, इंतजाssर'' म्हणणारी ती लाखो दिलो की धडकन बिडकन बनली! Proud त्यामागोमाग १९९२ च्या ''बेटा'' मधल्या ''धक धक करने लगा'' मधल्या सेन्शुअस ''तिला'' पाहून चाहत्यांनी तिला ''धक धक गर्ल'' ची पदवी बहाल केली. याच चित्रपटासाठी तिला पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावाजलं गेलं.......अन त्यापुढेही हा सिलसिला सुरू राहिला. सर्वाधिक नामांकनं मिळवणारी अभिनेत्री म्हणून तिचं नामकरण झालं!

अजाणत्या वयात हिने पोरापोरींना ''चने के खेत मे'' गुणगुणायला लावलं....आजही सनकी शाहरुखपेक्षा बदल्याच्या आगीत झुरणारी पत्नी जास्त आठवते. ''गजगामिनी'' (२०००) आणि ''लज्जा'' (२००१) सारखे स्त्रीप्रधान चित्रपटही तिच्या वाट्याला आले. यातला ''गजगामिनी'' तिच्या चाहत्यांपैकी प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांनी तिच्यासाठी काढला होता...असाच एक चित्रपट रामगोपाल वर्मा ने काढला--अंतरा माळीचा ''मै माधुरी दिक्षित बनना चाहती हू!'' तेव्हा काश आपण थोडे मोठे असतो तर!--असं कुठेतरी वाटून गेलं. Proud
१९९० पासून सुरू असलेला तिचा ''इंतजार'' संपुष्टात आला १९९९ मध्ये....आणि ही सिनेतारका कुठल्याही नायकाशी धागेबांधे न जुळवता विवाहबद्ध झाली ती चक्क एका कार्डिऑलॉजिस्टशी...आणि ती सौ. श्रीराम नेने झाल्याने तिच्या लाखो चाहत्यांनी त्यादिवशी वेट डे (ड्राय डे च्या विरूद्धार्थी Proud ) साजरा केला! ती नुसतीच बोहल्यावर चढली नाही तर चित्रपट्सृष्टीला तात्पुरता राम राम म्हणत...डेन्वरात स्थायिक झालीसुद्धा!
तिचा चंद्रमुखी आणि चा परफॉरमन्स लक्षणीय होता. त्यात अवजड दागिने अन पेहराव घालून काय नाचलेली बया! BHIaKi.jpgसरोज खानने तिला ''मोस्ट व्हर्सटाईल डान्सर'' चा किताब देऊ केला. तिच्या त्या भरजरी रूपापासून ते ''एक्स्पर्ट हायजिनिक डिश वॉश बार'' च्या तिच्या '' गंगुबाई बोलत्ये...इनिस्पेक्सन करत्ये....'' या झटक्यापर्यंत ती मला प्रचंड आवडली आणि कायम आवडत राहील.

तिचे मला आवडलेले आणखी काही चित्रपट म्हणजे पुकार,लज्जा, प्रहार, दिल तो पागल है, ये रास्ते है प्यार के इत्यादी. विशेष म्हणजे पुरेसं अंगप्रदर्शन करूनही तिने आपली ''सादगी'' आजतागायत जपली! Madhuri-dixit-250712120725134251.jpgआता वाट पाहत्ये ती फक्त तिच्या ''डेढ इश्किया'' (इश्किया सिक्वल) आणि ''गुलाब गँग'' ची! पुन्हा एकदा 55.jpgहा चार्म पडद्यावर झळकून प्रेक्षकांना बेहोश करायला सज्ज झालाय...तेव्हा तिच्या चाहत्यानो तयार व्हा! पुन्हा एकदा ती तिच्या साजनला साद घालत म्हणणार आहे.... तू शायर है मै तेरी शायरी!

लोक्स सर्व प्रचि आंतरजालावरून घेतले आहेत.
तिच्या चाहत्यांना आवडेल असं एक कलेक्शन आहे माझ्याकडे! Happy प्रताधिकारमुक्त नसल्याने इथे टाकू शकत नै...कुणाला हवं असल्यास विपू करावीच Happy
टोकू----- Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! मस्त गं Happy
>>>माझ्या भावाने तर रोज आईसक्रीम मिळणार म्हणून डायरेक्ट तिच्याशी विवाहबद्ध होण्याचा पणच करून टाकला <<< Lol

मस्त लिहिलय.
माधुरी मलाही भारीच आवडायची शाळा-कॉलेजात असतांना. माझा भाउ- माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठा - त्याला श्रीदेवी आवडायची. मग आमचं भांडण व्हायचं. आता आठवलं की हसु येतं Happy

वा टोके जिंकलस, माधूरी वा क्या बात है
Madhuri-Dixit-walking-the-ramp.jpg
तू फुलाचा गोडवा
तू प्रभातचा पारवा
रात्रीच्या गारव्यातही
तू चमकणारा काजवा.

तू रंगीन स्वप्न
तू लुकलुकत चांदण
तू रानातील एकट माळ
तू मोकळ आभाळ.

तू चंद्राची कोर
संगे चांदण्याची नाव
तुझे नी:श्बद डोळे
दिसे प्रेमाचे भाव

तू मनाची असूया
यु स्वप्नाचे गाव
प्रेमाने भारावलेल्या मनात
फक्त तुझे आणि तुझेच नाव........... अंतरजाल साभार

मला ही माधुरी आवडायची. तिचा स्टेप कट, सुंदर स्माइल.आताची भरमसाठ मेकप केलेली नाही आवडत. बळेबळेच वाटते.
m2.jpg

Happy Happy

माझ्या नवर्याला माधूरीचे प्रचंड वेड होते. आमच्या लग्नाआधी त्याचे जे कपाट होते ते माधूरीच्या फोटोंनी (Stamp Zize to Poster Size) भरून गेले होते. कपाटाची दारे, आतली बाजू सगळीकडे माधूरीचे फोटो.

छान आहे....... मधुबाला नंतर निखळ हास्य माधुरीचेच फक्त...............लोकसत्ता मधे एक लेख आलेला त्यात नविन नाव दिलेले तिला.....माधुरीबाला

टोकूरिका,
लेख छान आहे, पण अजुन विस्त्रुतपणे (?) लिहिला असता तर अजुन मजा आली असती. तिच्या काही रिअ‍ॅलिटी शोज बद्द्ल वगैरे. माधुरी सोनी वर तो कुठला शो करायची, काहीतरी लग्न जमवण्याबाबत?
तिची डोळ्यांची अदा म्हणजे खरचं 'मार डाला'!!
अवांतर - माझे लग्नाच्या आधीचे आडनाव दिक्षित होते, तेव्हा बरेच जण मला माधुरी दिक्षित म्हणायचे!! असलं भारी वाटायचं Happy

माधुरी बोले तो मोहीनी...
एक दो तीन..
ती माझ्यासाठी इतर हिरोईनपेक्षा फार वेगळी होती..
म्हणजे इतर हिरोईन आवडायच्या तेव्हा त्या माझ्या क्रश असायच्या..
पण माधुरीबाबत एक आदर वाटायचा..
अजूनही कायम आहे..
आणि तिने जी सेकंड इनिंग सुरू केली आहे ते पाहता वाढतच जाईल..:)

माधुरी माझी भरमसाठ फेवरीट.

लेख अजून विस्तृत चालला असता खरंच! आंतरजालावरून मिळविलेली माहिती शेअर करणे ह्या उद्देशाने लिहिल्यासारखा वाटला. खास जिव्हाळ्याचा असा पर्सनल टच लिखाणाला यायला हवा होता. तो इथे नाही जाणवला. Sad कदाचित "माधुरी" हा माझ्यासाठी खास टॉपिक असल्याने असे वाटले असेल.

अस्खलित अभिनयाने >>>
अभिनयाला उद्देशून "अस्खलित" हे विशेषण असते का? "अस्खलित वाणी" असा शब्दप्रयोग माहीत आहे!

या चित्रपटानंतर मी तिची खरोखर दिवानी झाले>>>
दिल की धडकन >>>
अजीबोगरीबरित्या>>>
आणि अजून बर्‍याच ठिकाणी हिंदी शब्द अनावश्यक वाटले. Sad

मा-धु-री Happy
मला आठवतंय 'एक दो तीन' पहिल्यांदा कटिंग सलूनमधे ऐकलं होतं.
तेव्हा वाटलं च्यायला असं काय गाणं असतं का?
पण मग जेव्हा माधुरीला त्या गाण्यात पाहिलं तेव्हापासून मा-धु-री Happy
देवदासच्या 'मार डाला' आणि ''डोला रे डोला'साठी आख्खा सिनेमा पुन्हा बघायची सहनशक्ती दाखवू शकतो Happy
कॉलेजच्या पायरीवर काही मित्र गप्पा करत होते. माधुरी की श्रीदेवी हा तेव्हा अत्यं जिव्हाळ्याचा विषय आणि प्रत्येकाला वाटायचं की आपलं मत म्हणजेच एकमत व्हायला पाहिजे Happy तर, बराच वाद झाल्यावर तोपर्यंत शांत बसलेला एकजण एकच वाक्य म्हणाला, "श्रीदेवीने 'धक धक' केलंय का?" Happy

माधुरी जितकी ग्लॅमरस दिसते, नाचते इ. तितकीच ती 'मृत्युदंड', 'प्रहार'मधेही आवडते!!
'डेढ इश्किया'ची वाट बघतोय!

रच्याकने -- अ‍ॅवॉर्ड फंक्शन्स, टीवीवर डान्स स्पर्धा इ. माधुरीच्या गाण्यांना हात घालणर्‍या सगळ्यांच्या वेड्या आत्मविश्वासाचं लै म्हणजे लै कौतुक वाटतं. परमेश्वरा! त्यांना माफ कारण ते काय करतायत ते त्यांना माहिती नाही!! Happy

कपाट होते ते माधूरीच्या फोटोंनी (Stamp Zize to Poster Size) भरून गेले होते. कपाटाची दारे, आतली बाजू सगळीकडे माधूरीचे फोटो. >>>>>>> +१००००० अजून आहेत

काय मस्तं लिहीले आहे. टोकुरिका मला विपु करणार का प्लीज? मी पण तुमच्यासारखी माधुरीभक्त Happy