Submitted by सतीश देवपूरकर on 30 August, 2012 - 10:17
गझल
बघू ऐकून वा-याचे, बघू या काय होते ते!
धरू या बोट रस्त्याचे, बघू या काय होते ते!!
बनू बिनघोर अन् नौका करू स्वाधीन लाटांच्या;
म्हणू गाणे किना-याचे, बघू या काय होते ते!
किती लांबून हे आले इशारे माझियासाठी;
टिपू आवाज ता-याचे, बघू या काय होते ते!
असेही जायचे आहे, तसेही जायचे आहे....
पिऊ या जहर जगण्याचे, बघू या काय होते ते!
मला माहीतही नाही....मला माळून जाते ती!
खुडू या फूल गज-याचे, बघू या काय होते ते!!
कशी मी पोचवू माझी तिच्यापर्यंत बेचैनी?
बनू का फूल चाफ्याचे? बघू या काय होते ते!
मनाच्या जंगलामध्ये स्मृतींचा केवढा भडका!
जगू आयुष्य वणव्याचे, बघू या काय होते ते
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्दर....अप्रतिम गझल !
सुन्दर....अप्रतिम गझल !
धन्यवाद शुभानन!
धन्यवाद शुभानन!
धन्यवाद किरणजी,
धन्यवाद किरणजी, विस्मयाजी!
आपण काढलेल्या भावपूर्ण उद्गारांमुळे क्षणभर डोळे पाणावले!
लगेच आम्ही आमच्या पांडुरंगाचे आभार मानले, ज्याने आमच्या दुबळ्या झोळीत असे दोन चार शेर टाकले!
अवांतर: या वृद्ध, मायबोलीवर दोनवेळा विनाकारण हुतात्मा झालेल्या प्राध्यापकाच्या कानांना निदान मायबोलीवर असे भावपूर्ण उद्गार प्रतिसादातून ऐकण्याची सवय नाही राहिली हो! म्हणून घडीभर हे क्षीण डोळे डबडबले! पण आम्ही भरून पावलो!
समस्त मायबोलीकरांचा हितचिंतक,
..............गझलप्रेमी(दगडधोंड्यांचा प्राध्यापक)
सतीशजी: गझल आवडली नाही.
सतीशजी:
गझल आवडली नाही. बाळबोध नाही मात्र बहुतेक शेरात complexity , subtlety मिसिंग आहे.
लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जायेगा
तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जायेगा
ह्या रचनेशी साधर्म्य जाणवले.
वरील रचना कोणाची आहे हे माहीत नाही.
असे एखादे प्रसिध्द फिल्मीगीत असण्याचीही शक्यता आहे.
रचनाकाराने आपल्या रचनेवरून घेतले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मात्र काही वर्षांपूर्वी उर्दूतली मोठ्या रदीफांच्या वा आशयाच्या नाटकी सामान्य गझला मराठीत आणण्याची एक लाट आली होती . सुदैवाने, आत्ता लिहिली जाणारी गझल बरीच बरी आणि प्रामाणिक आहे, असे वाटते. असे व्याधी तिला जडू नये ही मनापासून इच्छा.
समीरजी आपल्याला काय म्हणायचे
समीरजी आपल्याला काय म्हणायचे आहे ते सहज लक्षात येते आहे
अतीशय महत्त्वचा मुद्दा उपस्थित केलात धन्यवाद
मला तरी ही देवसरांची गझल दुसर्या एखाद्या रचनेशी (हिंदी/ उर्दू) अशाप्रकारे साधर्म्य साधत असेल असे यापूर्वी कधीच जाणवले नव्हते नव्हते
आता तशी शक्यता असू शकते असे वाटते आहे
रचनाकाराने आपल्या रचनेवरून घेतले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.>>>>>>> असे म्हणालात ते बरे झाले नाहीतर वादंगाला निमित्त झाले असते
सोचना क्या, जो भी होगा देखा
सोचना क्या, जो भी होगा देखा जायेगा
हे घायल (१९९०) मधलं गाणं चांगलंच गाजलं होतं. या रद्दीफीचा ट्रिगर त्यात असेलही किंवा स्वतंत्रपणेही सुचलेली असेल. असं विधान करणं शक्यही नाही. पण सध्या जी गझल समोर आहे ती छान आहे हे मात्र म्हणता येतंय.
गझल आवडली !
गझल आवडली !
डोळे बिळे डबडबू देऊ नका
डोळे बिळे डबडबू देऊ नका प्रोफेसर.
आंतरजालावरच्या प्रतिक्रियांनी इतके भावविवश होऊन कसे चालेल.
विदिपा
विदिपा
कणखरजी तुमचा एक मस्त शेर
कणखरजी तुमचा एक मस्त शेर आठवतो आहे...............................
हे नाते तुटल्याचेही मी किती मनाला लावुन घेतो
आंतरजालावरची ओळख आंतरजालावरचे भांडण
धन्यवाद वैभव! शेराची आठवण
धन्यवाद वैभव! शेराची आठवण ठेवल्याबद्द्ल!
त्यांचे डोळे डबडबून येणे ही
त्यांचे डोळे डबडबून येणे ही मार्मिक असते !
म्हणुन तर जग म्हणते दिसते तसे नसते !
गझलप्रेमी ह्या आयडीच्याही
गझलप्रेमी ह्या आयडीच्याही अवलोकनात जाता येत नाहीये? मला एक विपू लिहायची होती त्यांना
ह्यावेळी काय केलेत प्रोफेसर?
गझलप्रेमी आयडीच्याही अवलोकनात
गझलप्रेमी आयडीच्याही अवलोकनात जाता येत नाहीये? मला एक विपू लिहायची होती त्यांना
>>>>>>>>
हो ना मीही प्रयत्न करून पाहिलाय
विठ्ठला .....अरेरे हे काय झालं रे
केवढा हा उमाळा? कोणती नस
केवढा हा उमाळा?
कोणती नस तोडली गेली कळेना.....
कैक लोकांना किती आला उमाळा!इति कर्दनकाळ
Pages