विषय क्र. १: प्यार इश्क और मोह्होबत

Submitted by आयडू on 30 August, 2012 - 09:09

प्यार इश्क और मोह्होबत - हे समीकरण हिंदी सिनेमात इतकं फिट बसलं आहे की प्यार, इश्क ह्या भावनेला केंद्रस्थानी ठेवून कितीतरी चित्रपट गल्ला भरून घेतात. लोकांना रडवतात, हसवतात, व्हर्चूल रिल लाईफ रिअ‍ॅलिटी वाटावं इतकं खरं वाटतं प्रत्यक्षात ते तसं नसेलही कदाचित पण, पण ह्या सगळ्यातून जर घेता आली तर एनर्जी घ्यावी ती मी घेतो अर्थात "चांदनी चौक टू चायना", " कॉकटेल", "नमस्ते लंडन" ह्या सिनेमांची कॅटॅगिरी वेगळीच आहे! [नमस्ते लंडन वर फार मोठा लेख लिहावा लागेल पण आज, इथं नाही.] "प्यार इश्क और मोह्होबत" ह्या नावाचा सिनेमाही येऊन गेला विशेष काही कथा नाही तेच ते अन् तेच ते प्रेमाचे त्रिकोण, चौकोन अन् षटकोन... त्रिकोण तर हवेतच त्याशिवाय मजा नसावी! डीडीएलजे, हम दिल दे चुकेतला त्रिकोण अन् जब वी मेट मधला त्रिकोण (?) ह्यातल्या कोनांमध्ये बरंचसं अंतर असलं तरीही त्रिकोण आहेतच! कथा, पैसा, लॉजिकच्या अनुषंगाने लिहायला गेलो तर बराच मोठा लेख होईल आणि सध्या ते सगळं शब्दात मांडणं होणे नाही.

तरीही...
जब वी मेटची कथा फार भारी वाटण्याचा काळ होता तो... सिनेमागृहात हा पिक्चर मी १३ वेळा पाहिला. दरवेळी गाण्यांतून, संवादातून फार काही उलगडत गेलं, असंही काही होतं, वाटत असतं [फेझ होती] त्यात काही फार विशेष नाही असं आता वाटतं. एमबीए करतानाची गोष्ट आहे ही. जबवीमेटला गेलेलो... त्यातली करिनाची जी बबली, लाईव्हली भुमिका आहे तशीच अगदी तशीच माझ्या मैत्रिणीची रिअल लाईफ मधली भुमिका आहे असं राहून राहून वाटत होतं... त्या संपूर्ण सिनेमात जर काही आवडलं असेल तर माझी मैत्रिण सिनेमा पहाताना कैच्यकै सुंदर दिसत होती... तिच्याकडेच लक्ष होतं Happy त्यामुळे दुस र्‍यांदा सिनेमा पहावा लागला तेंव्हा करिनाची बकबक पाहून वैताग आला.. सिनेमात काही राम नाही - लॉजिक नाही असं वाटलं... आणि त्याच आठवड्यात तिस र्‍यांदा पाहिला अन् मी प्रेमात पडलो Happy करिनाच्या संवादांच्या, गाण्यांच्या. "जो भी तुम रिअल में चाहतें हो, अ‍ॅक्च्युअल में तुम्हें वहीं मिलता है" ह्यावर विश्वास बसला.

"तुमसे ही" गाण्या नंतर ह्या सारखं गाणं होणे नाही असं बराच काळ वाटलं अर्थात तसं ते खरं नाही हे आता जाने तू , रॉकस्टारच्या गाण्यांवरून पटतं. पण तरीही दरवेळी हा सिनेमा पाहून जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ती इतर कुठून मिळते का ह्याचा शोध अजून घ्यावासा वाटत नाही! खून खराबा नाही, त्रिकोण आहे ही अन् नाहीही आणि तरीही तद्दन बॉलिवुडी सिनेमांतील हा एकच सिनेमा मला वाटतं परत एकदा चित्रपटगृहात दाखवला तर बघायला मजा येईल. फार काही भला मोठा मेसेज हा सिनेमा देत नाही, बस्स - "जो दिल कहता है वहीं करों"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्यार इश्क मोहोब्बत नावाचाही एक टुक्कार चित्रपट होता... पहिला मला वाटले त्यावर लिहिले आहे की काय..

अजून लिहा जब वुई मेट वर... आणि करीना नको.. तर शाहिद कपूरवर लिहा... त्याच्या आयुष्यातीलच नव्हे तर हिंदी चित्रपटांतील गेल्या दशकातील काही सर्वोत्तम रोलपैकी एक होता तो.. अर्थात ही माझी आवड, माझे मत झाले..

अजून लिहा जब वुई मेट वर... आणि करीना नको.. तर शाहिद कपूरवर लिहा... त्याच्या आयुष्यातीलच नव्हे तर हिंदी चित्रपटांतील गेल्या दशकातील काही सर्वोत्तम रोलपैकी एक होता तो.. अर्थात ही माझी आवड, माझे मत झाले >>> माझे अनुमोदन... Happy

आयडू, फारच कमी लिहिलस रे. अजुन लिही.
माझा अजुन एक आवडता पिक्चर म्हणजे सोचा ना था किती वेळा बघितला ते मोजणं सोडलयं Happy

इम्तियाज अलिचे सगळेच चित्रपट (उतरत्या क्रमाने) अप्रतिम आहेत. सोचा न था, जब वुई मेट, लव्ह आज कल आणि रॉकस्टार.

'प्यार, इश्क और मोहब्बत' सिनेमावरचा वरचा लेख असेल असेच मलाही आधी वाटले. मला वाटते, हा अर्जुन रामपालचा पहिला सिनेमा होता. आम्ही थेटरात पाहिला होता, अतिभंकस आहे. त्यामुळे त्याच्यावरचा लेख उत्तम होईल. श्रद्धा, फारेन्ड यांच्यासाठी उत्तम कच्चा माल आहे. Wink