चाल : 'जय गणराय नर्तन करी' (संदर्भ - घाशीराम कोतवाल)
जय गणराय नर्तन करी
'मायबोली' त्याला वंदन करी
वंदन करी हो वंदन करी
मायबोलीचे हे वारकरी
लिहा लेख, चढवा ची रंग
बाप्पाच्या सुंदर चित्रावरी
चित्रावरी हो चित्रावरी
मायबोलीचे हे वारकरी
मिसळम् गट्टम् पाककृती,
खादाडी होता, गाणी की गाती
सभासदांनो झब्बू द्यावा
मायबोलीवर किरपा ठेवा
किरपा ठेवा हो किरपा ठेवा
उत्सवाच्या खेळा यश द्या देवा
यश द्या देवा हो यश द्या देवा
मायबोली आहे तुमचाच 'ठेवा'
------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मंडळी,
दरवर्षीप्रमाणे, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९३४, दिनांक १९ सप्टेंबर २०१२ रोजी श्री गणेशाचे मायबोलीवर आगमन होणार आहे.
ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना वेळ लागणार आहे आणि पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. उपक्रम, स्पर्धांचे विषय, त्याचे नियम आणि प्रवेशिका कुठे व कशा पाठवायच्या हे तुम्हाला निळ्या शब्दावर टिचकी मारल्यावर कळेल.
स्पर्धांची सुरुवात गणेश चतुर्थीच्या दिवशी, १९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाण वेळ) होउन, अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेची पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) तुम्ही त्यामधे भाग घेऊ शकता.
ध्यानात असू द्या...
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतीरिक्त, तुम्ही गणेशोत्सवानिमित्त काही खास लेख लिहून आम्हांस पाठवावे ही आपणांस आग्रहाची विनंती. तसेच स्वरचित आरत्या सुद्धा (मायबोलीवर पूर्व प्रकाशित न झालेल्या) पाठवावयास विसरू नका.
साहित्याबरोबरच आता मायबोलीवर सांगितीक संस्कृतीही रुजते आहे. आपल्या कलाप्रेमी बाप्पाच्या सेवेत तुम्ही स्वतः गायलेली (वा चाली दिलेली) गाणी, श्लोक, आरत्या, छान छान चित्रं-रेखाटनं आमच्याकडे पाठवलीत तर आणखी बहार येईल...
चला तर मग... कुंचल्यानी रेखाटायला, शब्द वेचायला, सूर आळवायला सुरुवात करा.
हे सर्व आम्हाला sanyojak@maayboli.com वर पाठवा.
तसेच, मायबोली सभासदांनो, तुमच्या घरच्या बाप्पाचे दर्शन, फोटोरुपात, घडवायला विसरु नका. बाप्पाचा थाटमाट, सजावट, देखावे, नैवेद्य आणि काय काय... आरास निश्चित करतानाची प्रक्रिया, पर्यावरणाचा व नाविन्याचा विचार, त्यासाठी केलेली धडपड हे सगळं मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.
तुमच्या गावातील, शहरातील, देशा-परदेशातील गणपतीबाप्पांचे दर्शन समस्त मायबोलीकरांना घडवा.
धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.
हे बघीतलं का?
दवंडी पहिली
दवंडी दुसरी
लोकहो, तिसरी दवंडी आली हो
लोकहो, तिसरी दवंडी आली हो ssssssss
पोस्टर खूपच सुरेख. ही दवंडीही
पोस्टर खूपच सुरेख. ही दवंडीही मस्त आहे.
आली का, तिसरी दवंडी? मस्तच!
आली का, तिसरी दवंडी? मस्तच!
गणपती बाप्पा मोरया, वाजत गाजत
गणपती बाप्पा मोरया, वाजत गाजत लवकर या!
मस्तच !! एकदम कल्पक आहे
मस्तच !! एकदम कल्पक आहे नांदी.