"ए शंभ्या, खातोयस काय वर्गात?"
"सर! खूप भूक लागलीय"
"जेवून नाही का आलास?"
"नाही! सर, आई किनई आज माबोच्या तोंपासु स्पर्धेसाठी पदार्थ करतीय."
"कोणासाठी काय करतीय?"
"मायबोलीच्या, इ-गणेशोत्सवाच्या, 'तोंडाला पाणी सुटणे' स्पर्धेसाठी न-पदार्थ बनवतीय."
"न-पदार्थ?"
"हो सर! न-पदार्थ! म्हणजे काय की हस्तकलेच्या माध्यमातून, खाद्य पदार्थासारखी दिसणारी पण खाता येणार नाही अशी वस्तू बनवायची."
"अरे, वा! आणखी काय काय आहे म्हणे त्या इ गणेशोत्सवात?"
"सर खूप! 'गर्जा महाराष्ट्र माझा' ही गट-लेख स्पर्धा! मायबोली सभासदांचे विविध विषयांवरचे लेख, त्यांची सुश्राव्य गाणी, झालंच तर फोटो झब्बू, गणपतीची आरास, मुलांसाठी गाणी-गोष्टी उपक्रम, चित्रकला काय काय आहे. मी पण एक गोष्ट आणि गाणं रेकॉर्ड करुन पाठवणार आहे."
"वा! वा! धन्य आहे ही मायबोली! बरं ते खाणं संपव! हात धुवून ये आणि त्या मायबोलीच्या 'इ-गणेशाला' वंदन करुन अभ्यासाला सुरुवात कर बरं!"
------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मंडळी,
दरवर्षीप्रमाणे, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९३४, दिनांक १९ सप्टेंबर २०१२ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) श्री गणेशाचे मायबोलीवर आगमन होणार आहे.
ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना वेळ लागणार आहे आणि पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. उपक्रम, स्पर्धांचे विषय, त्याचे नियम आणि प्रवेशिका कुठे व कशा पाठवायच्या हे तुम्हाला निळ्या शब्दावर टिचकी मारल्यावर कळेल.
स्पर्धांची सुरुवात गणेश चतुर्थी, १९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाण वेळ) या दिवशी होऊन, अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेची पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) तुम्ही त्यामधे भाग घेऊ शकता.
ध्यानात असू द्या...
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतीरिक्त, तुम्ही गणेशोत्सवानिमित्त काही खास लेख लिहून आम्हांस पाठवावे ही आपणांस आग्रहाची विनंती. तसेच स्वरचित आरत्या सुद्धा (मायबोलीवर पूर्व प्रकाशित न झालेल्या) पाठवावयास विसरू नका.
साहित्याबरोबरच आता मायबोलीवर सांगितीक संस्कृतीही रुजते आहे. आपल्या कलाप्रेमी बाप्पाच्या सेवेत तुम्ही स्वतः गायलेली (वा चाली दिलेली) गाणी, श्लोक, आरत्या, छान छान चित्रं-रेखाटनं आमच्याकडे पाठवलीत तर आणखी बहार येईल...
चला तर मग... कुंचल्यानी रेखाटायला, शब्द वेचायला, सूर आळवायला सुरुवात करा.
हे सर्व आम्हाला sanyojak@maayboli.com वर पाठवा.
तसेच, मायबोली सभासदांनो, तुमच्या घरच्या बाप्पाचे दर्शन, फोटोरुपात, घडवायला विसरु नका. बाप्पाचा थाटमाट, सजावट, देखावे, नैवेद्य आणि काय काय... आरास निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा व नाविन्याचा विचार, त्यासाठी केलेली धडपड हे सगळं मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.
तुमच्या गावातील, शहरातील, देशा-परदेशातील गणपतीबाप्पांचे दर्शन समस्त मायबोलीकरांना घडवा.
धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.
इथे बघा
दवंडी पहिली
दवंडी तिसरी
आज दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिन,
आज दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिन, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मायबोली गणेशोत्सव संयोजन मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा!
झक्कास!
झक्कास!
वा ! छान कल्पना !
वा ! छान कल्पना !
अरे वा
अरे वा
झक्कास..
झक्कास..
एकदम हटके स्पर्धा आहेत या
एकदम हटके स्पर्धा आहेत या वर्षीच्या!
बुद्धीदाता गणराय! मस्त
बुद्धीदाता गणराय!
मस्त कल्पना.