Submitted by Adm on 27 August, 2012 - 00:43
वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन आज पासून सुरु होते आहे. अग्रमानांकीत रॉजर फेडरर, गतविजेता नोव्हाक जोकोविच आणि ऑलिंपीक विजेता अँडी मरे ह्यांना पुरुष एकेरीत तर अग्रमानांकीत व्हिक्टोरिया अझारेंका, गतविजेती सॅम स्टोसुर, ऑलिंपीक विजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती मारिया शारापोव्हा ह्यांना महिला एकेरीत विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे.
माजी विजेत्या किम क्लाईज्टर्सची ही शेवटची स्पर्धा असणार आहे. नदालने यंदा दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
मानांकनांनुसार संभाव्य उंपात्यपूर्व फेर्या :
पुरुष एकेरी :
फेडरर वि बर्डीच
मरे वि त्सोंगा
टिपसार्विच वि फेरर
डेल पोट्रो वि जोको
महिला एकेरी
अझारेंका वि स्तोसुर
शारापोव्हा वि क्विटोव्हा
वॉझनियाकी वि सेरेना
कर्बर वि राडाव्हान्स्का.
हा धागा यंदाच्या युएस ओपन बद्दल चर्चा करण्यासाठी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मरेचं अभिनंदन .. मी ज्योको
मरेचं अभिनंदन ..
मी ज्योको ला कायमच पाठींबा देईन .. नात्या, मेरी वफाई पर शक मत करियो!
कालची मॅच (for that matter
कालची मॅच (for that matter दोन्ही finals) एकदम भारी होत्या.
जिंकला एकदाचा अॅंडी.
जिंकला एकदाचा अॅंडी.
रेडियोवर एक काकू म्हणाल्या, "७६ वर्षे प्रयत्न करायला लागला म्हणजे कमाल आहे. आता रिटायर्ड हो म्हणावं. या वयात निवांत चहा पीत बसायचं सोडून उगीच काय धावपळ! तसा दिसायला चाळीशीचाही दिसत नाही हो."
एकूण दोन दिवस सगळ्या बातम्या मरेमय झाल्या आहेत. नवीन कर, मंत्रिमंडळातले बदल वगैरेच्या आधी पहिली बातमी यूएस ओपनची.
मरे हरायचा तेव्हा तो
मरे हरायचा तेव्हा तो ब्रिटिश/इंग्लिश खेळाडू होता. काल जिंकला तर लगेच स्कॉटिश झाला.
उलट आहे मयेकर.. तो हरला की
उलट आहे मयेकर..
तो हरला की ब्रिटीश मिडीया तु.क. टाकून म्हणायचे.. जाउ द्या हरला तर हरला तसाही स्कॉटीश अहे.. आता म्हणतायत ब्रिटीश आहे म्हणून !
for that matter दोन्ही finals) एकदम भारी होत्या. >>>> अनुमोदन.
यंदा बर्याच मॅचेस चांगल्या झाल्या.. इथून लाइव्ह बघणं जमत नाही पण 
तसा दिसायला चाळीशीचाही दिसत नाही हो." >>>>
नॉन-ब्रिटेश समालोचकांनी मग
नॉन-ब्रिटेश समालोचकांनी मग तीच काडी परत फिरवली का? काल स्टार स्पोर्ट्सवर सामना संपल्यावर स्कॉटिश हा शब्द तीन्-चार वेळा ऐकू आला. नाइलाजाला ब्रिटिशही म्हटले.
Pages