Submitted by Adm on 27 August, 2012 - 00:43
वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन आज पासून सुरु होते आहे. अग्रमानांकीत रॉजर फेडरर, गतविजेता नोव्हाक जोकोविच आणि ऑलिंपीक विजेता अँडी मरे ह्यांना पुरुष एकेरीत तर अग्रमानांकीत व्हिक्टोरिया अझारेंका, गतविजेती सॅम स्टोसुर, ऑलिंपीक विजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती मारिया शारापोव्हा ह्यांना महिला एकेरीत विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे.
माजी विजेत्या किम क्लाईज्टर्सची ही शेवटची स्पर्धा असणार आहे. नदालने यंदा दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
मानांकनांनुसार संभाव्य उंपात्यपूर्व फेर्या :
पुरुष एकेरी :
फेडरर वि बर्डीच
मरे वि त्सोंगा
टिपसार्विच वि फेरर
डेल पोट्रो वि जोको
महिला एकेरी
अझारेंका वि स्तोसुर
शारापोव्हा वि क्विटोव्हा
वॉझनियाकी वि सेरेना
कर्बर वि राडाव्हान्स्का.
हा धागा यंदाच्या युएस ओपन बद्दल चर्चा करण्यासाठी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अत्ता पर्यंत एकही मॅच
अत्ता पर्यंत एकही मॅच बघीतलेली नाही. वोझनियाकी १ ल्या राऊंड मधे बाहेर आणि मरे स्ट्रगल्स इन फर्स्ट राऊंड अस वाचल. वोझनी फॉर्म मधे नाही की दुखापत ग्रस्त आहे? विम्बलडन नंतर परत पहिल्या राऊंड मधे बाहेर.
फेडरर फुल्ल
फेडरर फुल्ल फार्मात...........बाकी नदाल नाही आहे......तर इतकी मज्जा नाही येणार...
वॉझ्नियाकी पहिल्याच
वॉझ्नियाकी पहिल्याच राऊंडमध्ये हरली.. स्किव्होनी पण हरली..
स्टोसुर फॉर्ममध्ये दिसते..
बाकी पब्लिक ऑलिंपीक मुळे दमलं की काय ?
पग्या काही पण बरका..
पग्या काही पण बरका.. ऑलिम्पिकमुळे कसले दमायला... ऑलिम्पिक खेळली तर एखादी मधली स्पर्धा खेळली नाही की झाली की एनर्जी रिस्टोअर..
हिम्या.. मी खेळाडूंबद्दल नाही
हिम्या.. मी खेळाडूंबद्दल नाही इथे बाफवर येणार्या लोकांबद्दल म्हणतोय.. :|
किम हरली आणि तिच्या
किम हरली आणि तिच्या कारकिर्दिची सांगता झाली.. ! ़किम सेकंड इनिंग मध्ये भारी खेळली एकदम. २००९ मध्ये अमेरिकन ओपन च्या बक्शिस समारंभाला तिची मुलगी होती.. मस्त बोलली होती तेव्हा ती...
कालची मॅच मिस झाली. पण
कालची मॅच मिस झाली. पण पहिल्या मॅचमध्येच असं वाटलं होतं की अडखळत खेळतेय किम.
त्सोंगा पण बाहेर. क्लिझान
त्सोंगा पण बाहेर. क्लिझान त्सोंगाच्या बरोबरीने जोरात मारत होता. त्याचा मारणं बघुन माला महिला एकेरीतल्या आरवान रेझाईची आठवण झाली.
लॉरा रॉबसन ताई जोरात आहेत.
लॉरा रॉबसन ताई जोरात आहेत. काल ना ली ला हरवलं..मरेला आज फारच फाइट द्यायला लागली.
कालच्या इव्हिनिंग सेशनच्या
कालच्या इव्हिनिंग सेशनच्या दोन्ही मॅचेस भारी झाल्या !
शारापोव्हा ३ सेटर जिंकली नंतर.. इजनर ५ सेटर हरला.. इजनरची ५ सेट्सची आवड लक्षात घेता इतक्या उशीरा त्याची मॅच कशाला ठेवली काय माहित
इव्हॅनोविकला युएस ओपनमध्ये फार डिमांड दिसत्ये. तिच्या बर्याच मॅचेस आर्थर अॅशवर असतात.. !
बर्डिच !!!! यंदा डेल पोट्रो
बर्डिच !!!!
यंदा डेल पोट्रो किंव मरे चान्स मारणार का ? की ज्योको सर्वांना पुरून उरणार ?
पोवाने सही फिरवली काल मॅच. दोन्ही राऊंड्समध्ये पाऊस कामी आला चांगलाच. चारमधल्या तिघी आहे सेमी फायनलला..
अरे काय हे? अँडी रॉडिकची
अरे काय हे? अँडी रॉडिकची कारकिर्द्र संपली यावर इथे कोणाचेच भाष्य नाही?
एकाच शब्दात रॉडिकबद्दल सांगायचे तर म्हणजे सुपर अंडर अचिव्हर! सगळ्यात वेगवान सर्व्हिस असुनही निव्वळ केअरलेस अॅटिट्युड्मुळे व चिकाटी हा गुण अंगात नसल्यामुळे तो मल्टिपल ग्रँड स्लॅम विनर होउ शकला नाही. एकदा सामना हरायला लागल्यावर तो पुष्कळ वेळा अजुन जिद्दीने खेळायच्या ऐवजी सामना फेकुन देत आहे असेच वाटायचे. कॉनर्स त्याचा कोच झाल्यावरही कॉनर्सारखा अल्टिमेट वॉरिअरही त्याचा तसा खेळ बदलु शकला नाही हे रॉडिकचे खरच दुर्दैव!
२००३ यु एस ओपन जिंकल्यावर तो ३ विंबल्डन फायनल्समधे खेळला पण त्याच्या दुर्दैवाने त्या तिनही फायनल्स्मधे त्याची गाठ त्यावेळी सुप्रिम फॉर्ममधे असलेल्या फेडररशी पडली. २००९ ची विंबल्डन फायनल कोण विसरु शकेल?
पण त्याच्यातल्या खिलाडुपणाची व सेंस ऑफ ह्युमरची चुणुक तो वेळोवेळी दाखवुन देत असे हे मात्र सगळेच मान्य करतील..
पोस्ट सँप्रास इरामधला एक उत्तम अमेरिकन टेनिसपटु म्हणुन नाव कमावलेल्या या अँडी रॉडि़कला मी नक्कीच मिस करीन...:(
राफा नसल्यामुळे यंदाच्या यु एस ओपनला ग्रँड स्लॅमचा दर्जा द्यावा की नाही असा प्रश्न मला पडला आहे.....:(
काय हे मुकुंद फक्त राफा नाही
काय हे मुकुंद फक्त राफा नाही म्हणून डायरेक्ट ग्रँडस्लॅमच म्हणायचे नाही.. असं कसं चालेल... राफा रिटायर झाल्यावर कुठलीच स्पर्धा ग्रँडस्लॅम नाही असे म्हणाल मग...
फेडेक्स पण स्पर्धेतून बाहेर.. जोकोला परत एकदा जिंकायची संधी... अर्थात वाटेत मरे आणि डेल पोट्रोचा अडथळा...
मुंकूंद.. सही पोस्ट एकाच
मुंकूंद.. सही पोस्ट
एकाच शब्दात रॉडिकबद्दल सांगायचे तर म्हणजे सुपर अंडर अचिव्हर! >>>> अनुमोदन !
आज सकाळची डेल पोट्रो आणि ज्योकोची मॅच मस्त झाली एकदम ! दोघही जणं एकदम क्वालिटी टेनिस खेळले. दुसरा सेट तर लय भारी होता. डेल पोट्रो दुखापतीतून बाहेर आल्यावर परत फॉर्ममध्ये यायला लागलाय. त्याने खेळ वेळीच अजून उंचावायला हवा. त्याचा रॉडीक होऊ नये म्हणजे झालं !
पेस मेन्स डबल्सच्या फायनलमध्ये पोचला आहे. आज त्याची पहिली मॅच.
फायनलचं तिकिट विकायल काढलं
फायनलचं तिकिट विकायल काढलं आहे एवढ्या एकाच वाक्यात मी माझी निराशा जाहीर करु इच्छिते
सशलचा घोडा जिंकणार यंदा (असं म्हणून नाट लावायचा क्षीण प्रयत्न).
अँडी रॉडिक वि फेडरर यु एस ओपन फायनल लाइव्ह बघितली होती आम्ही. लाइव्ह मॅचेस बघताना सर्व्हिस फास्ट आहे म्हणजे काय ते एकदम सही कळतं.
एक भा प्र .. खेळताना
एक भा प्र ..
खेळताना चित्कारण्याने खरंच जोर येतो का फटके लगावताना? मला नेहेमी वाटतं की त्या चित्कारण्यात एनर्जी एक्स्पेन्ड होत नाही का जास्त?
पण हल्ली टेनीस मध्येच असं नाही पण ईतरही काही वर्क-आउट्स च्या क्लासेस मध्ये मुद्दाम ओरडायला (चीअर करायला) एन्करेज करतात आणि तिकडेही मला प्रश्न पडतो की आधीच दम लागलेला असतो त्यात आणखी ओरडत बसले तर लक्ष आणि एनर्जी त्या ओरडण्यातच व्यर्थ होईल ..
सशल - ते स्ट्रेस
सशल - ते स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी जरूरी असते. मानसिकतेच्या दृष्टीने अपायकारक टॉक्झिन्स बाहेर पडतात.
काही लागल्यावर किंवा तापात जसे कण्हल्याने थोडे बरे वाटते तसेच.
धन्यवाद चमन ..
धन्यवाद चमन ..
आजच्या अझारेंका वि.
आजच्या अझारेंका वि. शेरापोव्हा सामन्यात याबद्दल बरीच चर्चा झाली. ऐकलीत का?
हा सामना म्हणजे खेळ पाहतो की युद्ध असंच ग्रंटींग
सशल.. ग्रंटींग रिअली
सशल.. ग्रंटींग रिअली हेल्प्स..
पण हल्ली टेनिसपटूंमध्ये लहानपणापासून ग्रंटींगची सवय मोडून काढयचे प्रयत्न करतात कारण तुम्ही नियमितपणे ग्रंटींग करायला लागलात की तो सवयीचा भाग होऊन जातो आणि मग त्याचा फायदा होत नाही.
(असं आमच्या टेनिस कोचने सांगितलं होतं)
सशल आहे का? ़ज्योकोने सेकंड
सशल आहे का? ़ज्योकोने सेकंड सेट जिंकला.. फोरहँड विनर कसले म हा न मारतोय..
चुका टाळायलाहव्या फक्त..म्हणजे फार दमायला होणार नाही आज..
बघतेय की .. पण आजचा पहिला आणि
बघतेय की .. पण आजचा पहिला आणि मॅचचा दुसरा सेट बघून वाटत होतं की ज्योको खिशात घालणार मॅच पण डव्ही फेरेअर एकदम स्मार्ट खेळतोय .. :|
खेळतोय खरा.. पण ज्योकोने
खेळतोय खरा.. पण ज्योकोने घेतला शेवटी तिसरा सेट..
फेरर खूप मस्त खेळतोय ह्या स्पर्धेत.. ज्योको मधेच चुका करतोय पण सावरतोही आहे.
फायनलसाठी मरेला एक दिवस जास्त विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे ही मॅच पटकन संपली पाहिजे.
फरेअर परत चुका करायला लागला
फरेअर परत चुका करायला लागला ..
<फायनलसाठी मरेला एक दिवस
<फायनलसाठी मरेला एक दिवस जास्त विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे ही मॅच पटकन संपली पाहिज>
हा फरेरवर अन्याय आहे.
आता कसला अन्याय ? घे म्हणं
आता कसला अन्याय ? घे म्हणं हवी तितकी विश्रांती..
सेरेनाचं अजुन एक विजेतेपद ! कालची मॅच हायलाईट्सवरून तरी जोरदार झाली असं वाटतय. अझारेंका पण काही कमी नाहिये अर्थात दुसरा सेट खेचला तिने आणि शिवाय एकदा सर्व्हिंग फॉर मॅच होती म्हणे तिसर्यात..
सेरेना हल्ली अजूनच जोरदार खेळायला लागली आहे!
आज ज्योको वि मरे.. !
पहाताय कि नाही कोणी ?? भारी
पहाताय कि नाही कोणी ?? भारी चालली आहे मॅच !! आमच्या इथे लाईट नाहीयेत रात्रभर :|
मी जाग येईल तेव्हा मोबाईल वर अपडेट करून करून मॅच पहातोय..
मरे सर्व्हिंग फॉर मॅच !
मरे जिंकला.. पहिलं ग्रँडस्लॅम
मरे जिंकला.. पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद.. अभिनंदन मरे..
सशल सांत्त्वन..
सशलने ज्योकोचा पाठींबा काढुन
सशलने ज्योकोचा पाठींबा काढुन घेतल्याने मर्या जिंकला.
भारी झाली मॅच. अभिनंदन मरे )
भारी झाली मॅच. अभिनंदन मरे )
Pages