Submitted by यशस्विनी on 24 August, 2012 - 04:17
मी आणि मायबोलीकर वर्षा यांना चित्रकलेबाबत एखादा धागा असावा असे वाटले ज्यावर चित्रकलेच्या संदर्भात,त्यासाठी वापरत असलेली वेगवेगळी माध्यमे जसे तैल रंग, जलरंग, रंगीत पेन्सिल्स, ऑईल पेस्टल्स तसेच चित्र काढण्यासाठी वापरायची साधने यावर चर्चा करता यावी, एकमेकांबरोबर चित्रकलेसंदर्भातील आपले अनुभव शेअर करता यावेत म्हणुन या धाग्याचे प्रयोजन..... यामुळे सर्व माहीती एकत्र राहील आणि या ग्रुपमधील सदस्यांना त्याचा फायदा होईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप चांगला विचार आहे.
खूप चांगला विचार आहे.
१. डार्क बॅकग्राउंड असलेल्या
१. डार्क बॅकग्राउंड असलेल्या चित्रांसाठी कोणत्या प्रकारचा कागद वापरला पाहीजे ज्यावर पेन्सिल रंग उठुन दिसतील......
२. पेन्सिल आर्टसाठी ज्या जलरंग पेन्सिल्स वापरल्या जातात त्या वापरताना मी पाण्याचा वापर करत नाही परंतु अश्या पेन्सिल्स वापरताना पाणी वापरणे आवश्यक असते का?
३. पेन्सिल आर्ट साठी कागद कि़ंवा कॅनव्हॉस कोणत्या प्रकारचा वापरला पाहिजे तसेच हि चित्रे जतन करुन ठेवायची असतील तर ती कश्या प्रकारे ठेवता येतील
४. मी हल्लीच ४ बॅटरीवर चालणारा इलेक्ट्रिक शार्पनर घेतला आहे, अजुन वापरायला सुरू केले नाही तरी अंदाजे नवीन बॅटरीज घातल्यावर तो किती दिवस चालतो व नक्की तो वापरायचा कसा म्हणजे बॅटरी घातल्यावर त्यात फक्त पेन्सिल घातली की तो आपोआप सुरू होउन टोक काढतो का? मला त्या शार्पनरचे जे माहीतीपत्रक मिळाले आहे त्यात फक्त बॅटरीवापरा संबधीत माहिती दिली आहे कदाचित ते वापरणे सोपे असेल म्हणुन त्यांनी ते दिले नसेल. बॅटरी टाकुन वापरायला सुरू केल्यावर मलादेखील अंदाज येइल म्हणा तरी आधी कोणी वापरत असेल तर माहिती दिली तर बरे होईल
५. पेन्सिल आर्ट्ससाठी अजुन कोणते साहित्य आवश्यक असते का?
.
.
ह्या प्रकाराविषयी माहिती
ह्या प्रकाराविषयी माहिती नाही.
जल्रन्गा विषयी काही माहिती हवी असल्यास नक्कीच मदत करु शकेल
धन्स चिखल्या..... जलरंगाविषयी
धन्स चिखल्या..... जलरंगाविषयी काही माहिती हवी असल्यास नक्की विचारेन ......
बिझी असल्याने आधी वेळ मिळाला
बिझी असल्याने आधी वेळ मिळाला नाही त्यामुळे सॉरी गं.
१) क्राफ्ट पेपर न वापरता टिन्टेड पेपर वापरावा. काळा, ग्रे, यलो ऑकर, ब्राऊन अशा शेड्समध्ये मिळतात.
२) माझ्या मते पाणी वापरलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही त्याच पेन्सिली नॉर्मल कलर पेन्सिल्स म्हणूनही वापरु शकता. मी माझ्या केळफुलाच्या चित्रात याच (स्टेड्लर) वापरल्यात.
३) अॅसिड फ्री, जाड, साधारण २००gsm (or g/m2) जाडीचा (थीकनेस) असावा. स्केचिंग पेपरसाठी इटालियन ब्रँडचे पेपर चांगले समजले जातात. (ब्रँड नंतर बघून सांगीन)
४) मी बॅटरी ऑपरेटेड शार्पनर अजून वापरलेला नाही. पण गुणगान फार ऐकलंय (रादर वाचलय). त्यामुळे आता विकत घेणार आहे. सो, वापरायचा कसा ते मीही आत्ता सांगू शकत नाही.
५) बाकी अजून मी नीडेड इरेजर वापरते. साधारण खोडरबरासारखा खोडकाम करण्यासाठी याचा वापर करायचा नसून अतिरिक्त रंग उचलण्यासाठी, डार्क एरिया हायलाईट करायला वगैरे वापरावा. पेन्सिलकाम खोडून कागद पूर्ववत पांढरा करण्यासाठी हा वापरु नये. हा इरेजर सॉफ्ट असतो त्यामुळे हाताने मळून (मोल्ड करुन) वेगवेगळ्या आकारात वापरता येतो. (बारीक डिटेलींगमध्ये खासकरुन)
कलरलेस ब्लेंडरः माझ्याकडे हा पेन्सिल स्वरुपात आहे. (प्रिझमाकलर) याचा उपयोग करुन पेन्सिल रंगकामातील स्ट्रोक्स (रेषा)ची सुस्पष्टता अॅडजस्ट करण्यासाठी, दोन वा अधिक रंगांच्या युनिफॉर्म ब्लेंडींगसाठी, रंगकाम केलेल्या भागावर हा वापरावा. त्याला स्वतःचा कुठलाही रंग नसल्याने ज्या रंगावर चालवतोय, तो बिघडण्याची शक्यता नसते.
वर्षा धन्स ग....... नीडेड
वर्षा धन्स ग....... नीडेड इरेजर, ब्लेंडर बघीन इकडे मिळतात का...... शार्पनरमध्ये अजुन सेल नाही घातले अशीच पेन्सिल फिरवुन बघितली तर साध्या शार्पनरपेक्षा याने काढलेली टोक जास्त लांब, बारीक निघते..... पुढचे टोकही स्केच करताना तुटत नाही....
सध्या रंगांची दुनिया खुप एनजॉय करत आहे..... स्केचेस काढताना, रंग-शेडिंग करताना खुप मस्त वाटते..... मन एकदम रिलॅक्स, शांत, एकाग्र झाल्यासारखे वाटते...... चित्र चांगले जमले तर पुर्ण दिवस एकदम आनंदात जातो व नाही जमले तर कुठेतरी सतत टोचत राहते की हे चित्र कसे चांगले काढता येइल..... चित्रकलेमुळे मला खुप चांगली उर्जा मिळत आहे
>>चित्र चांगले जमले तर पुर्ण
>>चित्र चांगले जमले तर पुर्ण दिवस एकदम आनंदात जातो
अगदी. अगदी. काहीतरी क्रिएटीव्ह केल्याचा आनंद मिळतो. नाहीतर एरवी आहेच आपलं. आलेला दिवस जातो नुसताच.
तुझ्या शार्पनरचा ब्रँड कोणता आहे ते लिहिशील का?
वाचतेय
वाचतेय
मी टोयो कंपनीचा बॅटरी ऑपरेटेड
मी टोयो कंपनीचा बॅटरी ऑपरेटेड शार्पनर घेतला आहे.... गुगलिंग केले तेव्हा कळले की पॅनासोनिक कंपनीचे बॅटरी ऑपरेटेड शार्पनर सर्वात उत्तम आहेत...... मी आकाराने मोठा घेतला, टोयोचाच याच किंमतीत आकाराने लहान देखील मिळतो.
ओके. मला इथे ब्रँड चॉईस मिळेल
ओके. मला इथे ब्रँड चॉईस मिळेल अशातला भाग नाही. जो मिळेल तोच घेईन. नंतर माहिती टाकीन.
इलेक्ट्रीक शार्पनर मूळे
इलेक्ट्रीक शार्पनर मूळे पेन्सीलचे टोक तूटत जात. बरिचशी पेन्सील वाया जाऊ शकते. मी रेग्यूलर शार्पनर वापरतो.
नीडेड इरेजर हे पाहीजेच.
ब्लॅक बोर्डवर चित्र डायरेक्ट काढू नका. आधी ते रेग्यूलर स्केच पेपर वर काढून घ्या. स्केच पेपर ला मागून खडूने (चॉक) घासा आणी ते ब्लॅक बोर्डवर ट्रेस करा. ह्यात फायदा असा की रेगूलर पेपरवर चूक झाल्यास इरेजरने चूक दुरुस्त करता येते.
धन्स कंसराजजी..... खुप चांगली
धन्स कंसराजजी..... खुप चांगली माहिती दिलीत......
मी Accademia FABRIANO या
मी Accademia FABRIANO या ब्रँडचे स्केचपॅड घेतलेय. (मेड इन इटली). छान जाड आहे कागद.
कागदाची जाडी: 200g/m2 (gsm) (या आधीचे स्केचपॅड 94 g/m2 चे होते. त्यामुळे चांगलाच फरक जाणवतोय.)
हा अॅसिड फ्री असून पेन्सिल्स, चारकोल, पेस्टल्स, कलर्ड पेन्सिल्स आणि इंक या माध्यमांसाठी सुयोग्य आहे.
>>>इलेक्ट्रीक शार्पनर मूळे
>>>इलेक्ट्रीक शार्पनर मूळे पेन्सीलचे टोक तूटत जात. बरिचशी पेन्सील वाया जाऊ शकते. मी रेग्यूलर शार्पनर वापरतो.
रेग्युलरमध्ये प्रिझमाच्या पेन्सिल्स तुटत नाहीत का? त्या तर किती सॉफ्ट असतात...
वर्षा, माझ्या पेन्सिल
वर्षा,
माझ्या पेन्सिल इलेक्त्रीक शार्पनर मधे तूट्ल्या म्हणून मी रेग्यूलर शार्पनर फार काळजीपूर्वक वापरतो.
मी आतापर्यंत साधं स्केचबूक,
मी आतापर्यंत साधं स्केचबूक, कॅनव्हास आणि चक्क माऊंट बोर्ड वर चित्र काढली आहेत. रंगांमध्ये कलर पेन्सिल्स, 2B / 4B/ 6B पेन्सिल्स, पोस्टर कलर्स वापरले आहेत.
विविध प्रकारच्या रंगांत आणि पेपर्स / काच वगैरे बेस वर काम करण्याचा अनुभव असलेल्या कलाकारांनी त्या बद्दल इथे माहिती दिली तर माझ्यासारख्या चित्रकलेत 2nd inning (हौशी पातळीवर) सुरु करायची इच्छा निर्माण झालेलीसाठी किंवा नव्याने सुरुवात करणार्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
चारकोल पेंटिंग्ज कुणी केली असतील तर तीही माबोवर पब्लिश करा लोकहो !
माझी सख्खी आत्तेबहिण उत्तम चारकोल पेंटिंग्ज करते पण ती घरातल्या भिंतींवर टांगण्यापुरतीच. माझे वडिल आणि आत्याही उत्तम चित्र काढू शकत. तो वारसा कदाचित आमच्यात आला असावा. आत्याने त्या काळातही ४ वर्षं कॉलेज करुन कला डेव्हलप केली. बाकी आम्ही सगळे कला फारच लाईटली घेतल्याने आहोत तिथेच राहिलो. असो... गेले ते दिन गेले...
चारकोल हे माध्यम फारच सुंदर
चारकोल हे माध्यम फारच सुंदर आहे कामासाठी.
माझ्याकडे आत्ता नाहीत ही पेंटिग्स. नवीन केल्यावर नक्की टाकेन.
मी पेन्सिल स्केच पूर्ण
मी पेन्सिल स्केच पूर्ण झाल्यावर fixative स्प्रे करते, माझ्याकडे krylon चे आहे.
अजुन रंगीत पेन्सिली वापरल्या नाहीत. इलेक्ट्रिक इरेजर वापरते, अतिशय बारीक रेषा, केस इ. करायला नीडेड इरेजरपेक्षा जास्त उपयोगी वाटले. कधी कधी मोठा भाग ब्लेंड करायला टिश्शू वापरते.
वाचतेय. आवड आहे, गती फारशी
वाचतेय. आवड आहे, गती फारशी नाही. पण वाचायला आवडतंय.:)
अरे वा हे पाहिलच नव्हतं.
अरे वा हे पाहिलच नव्हतं. मस्त धागा
अरेच्चा मी ही पाहिलच नव्हतं..
अरेच्चा मी ही पाहिलच नव्हतं.. हे छानच आहे. धन्यवाद वर्षा असा बाफ काढल्याबद्दल
खालच्या पोस्टीतलं स्केच आणि
खालच्या पोस्टीतलं स्केच आणि या पोस्टस आधीच जाहीर केल्याप्रमाणे संपादीत करत आहे. फक्त शंका विचारण्यासाठीच ते इथे पोस्ट केलेलं.
संपादीत
संपादीत
संपादीत
संपादीत
मी काल Derwent Artists Colour
मी काल Derwent Artists Colour Pencils आणल्या आहेत ३६ शेड्सच्या. ठाण्यातल्या मँगो स्टोअरमध्ये मिळाल्या. अजून वापरुन पाहिल्या नाहीयेत. इथे प्रिझमा मिळत नाहीत त्यामुळे कधीतरी त्यांना पर्याय शोधायलाच हवा होता.
मला काळा, पांढरा, ग्रे आणि इंडिगो ब्ल्यू या लूज पेन्सिल्स हव्या होत्या. त्या काही मिळाल्या नाहीत. (अफाट शोधाशोध केल्यावर माझं नशिब चांगलं म्हणून डेर्वेन्टचीच चायनीज व्हाईट पेन्सिल मिळाली फक्त)
आपल्याकडील निदान कॅम्लीनसारख्या ब्रॅंड्जच्या पेन्सिल्स लूजली मिळायला काय हरकत आहे. त्यासाठी अख्खा सेट विकत घ्यायचा म्हणजे....!
बाकी खालील गोष्टींबद्दल काही प्रश्नः
१) पेस्टल बोर्ड
२) ब्रिस्टल ब्रश (ब्लेंडींगसाठी)
३) निओकलर २ वॉटरसोल्यूबल क्रेयॉन्स
यापैकी १ आणि २ आपल्याकडे मिळत असणार असं वाटतंय पण इथे वेगळ्या नावाने मिळत असतील. वरील नावं सांगितल्यावर दुकानदाराला काहीही अर्थबोध झाला नाही.
३) दुकानात पहायला मिळाले. पण एकेक क्रेयॉन भलताच जाड होता. त्याने डिटेलींग कसं करता येईल? कुणी वापरुन पाहिले आहेत का ते?
कुणालाही माहिती असल्यास प्लीज शेअर करा!
एका कॅनव्हासवर अॅक्रेलिक
एका कॅनव्हासवर अॅक्रेलिक कलर्सनी रंगवायला घेतलंय. पण हे चित्र बहूतेक बिघडण्याची शक्यता आहे. यदा कदाचीत चित्र बिघडलंच तर कॅनव्हासवर परत प्रायमर लावून नविन पेंटींग करता येवू शकतं का?
मला पेन्सील स्केचेस काढण्याची
मला पेन्सील स्केचेस काढण्याची आवड आहे. त्या अनुशंघाने थोडी माहिती.
पेन्सील सेटः 2H, HB, 2B, 4B, 6B, charcoal pencils (for deep dark shading). टोक करण्यासाठी शक्यतो regular sharpner or scalpel वापरा.
kneaded eraser: shading साठी. खोडरबरासारखा उपयोग करू नका.
Tortillons: कागदाच्या गुंडाळीसारखे रोल असतात. भारतात कुठे मिळतात ते माहिती नाही. पण वेगवेगळ्या shades blend करण्यासाठी खूप उपयोग होतो.
Tissue paper/cotton swabs: Shades blend करण्यासाठी
कागदः शक्यतो acid free, heavy weight. माझ्याकडे strathmore चा artist grade कागद आहे. जाडी १३० g/m2
अजून काही आठवले तर नंतर add करीन.
अल्पना तु अॅक्रिलिक्स वापरत
अल्पना तु अॅक्रिलिक्स वापरत असशील तेव्हा जर चित्र बिघडले तर प्रायमर मारुन किंवा तुझ्या नविन चित्रासाठी जो बॅकग्राउंड रंग/शेड हवा तो देउन तु पुन्हा त्या कॅनव्हासवर नविन चित्र काढु शकतेस. मी अजुन कधी असे ट्राय केले नाही. पण अॅक्रिलिक्स हे माध्यम खुप युजर फ्रेंडली आहे. तुम्ही यामध्ये खुप प्रकारे काम करु शकता.ऑईल, जलरंग दोन्हीचा इफेक्ट या माध्यमाने साध्य करता येतो. तसेच स्वतःचे देखील याचे खुप चांगले गुण आहेत. जे आपण वेगवेगळ्या प्रकारे हाताळु शकतो. शुभेच्छा
थँक्स यशस्विनी. कोणी
थँक्स यशस्विनी.
कोणी सिरॅमिकवर पेंटींग केलं आहे का? माझ्याकडे बरेच जुने हॉबी आयडीयाजचे बेकेबल सिरॅमिक कलर्स आहेत. सिरॅमिक, ग्लास, मातीची भांडी, टाइल्सवर रंगवून २४ तासांनी ओव्हनमध्ये १८० डिग्रीजवर अर्धा तास बेक करा अश्या सुचना आहेत त्यावर. मी काल पहिल्यांदाच एका मगवर ट्रायल घेतली. बर्यापैकी रिझल्ट मिळतो. पण यावर लिहिलंय की हे रंग जरी नॉन टॉक्झिक असले तरी अन्न पदार्थाच्या डायरेक्ट काँटॅक्ट मध्ये येवू नयेत.
तुम्हाला कुणाला सिरॅमिकवर घरी काम करता येतिल असे फुड सेफ कलर्स माहित आहेत का? पॅबिओचे सिरॅमिक कलर्स आणि पेन मिळतात असं ऐकलंय पण ते फुड सेफ असतात का? (ते सुद्धा यच प्रकारे बेक करायचे असतात) का घरच्या ओव्हनमध्ये बेक करणारे रंग कमी तापमानावर बेक केल्याने फुड सेफ नसतात असं काही आहे?
सध्या माझ्याकडे असलेल्या हे रंग मला जर टेराकोटावर वापरायचे असतिल तर आधी प्रायमर लावावे लागेल ना? त्याचप्रमाणे सछिद्र मातीच्या भांड्यांवर वापरणं सेफ होणार नाही ना?
Pages